वसंतरावजी नाईक अवमान प्रकरणी आक्रोश मोर्चा – हरिभाऊ राठोड़

vasantrao-naik-morcha

बंजारा समाजाचे वसंतरावजी नाईक अवमान प्रकरणी आक्रोश मोर्चा 

दि, 1 जुलै, 2017 रोजी ,कृषी दिनी तसेच वसंतरावजी नाईक जयंती दिनी
आझाद मैदान मुंबई येथे दुपारी 12 वा,

वसंतराव नाईक अमर रहे…

महाराष्ट्र सरकार 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करत असतांना त्याच दिवशी मतदार दिन जाहीर करून हरितक्रांतीचे जनक, नव महाराष्ट्राचे शिल्पकार , दिन दुबल्याचे आणि शेतकऱ्याचे कैवारी, बंजारा समाजाचे भूषण वसंतरावजी नाईक यांचा अवमान केल्या प्रकरणी आक्रोश व्यक्त करण्यासाठी सर्व व्हॉट उप ग्रुप तसेच नाईक साहेबांनवर श्रद्धा असणाऱ्या बंजारा बंधू भगिनींनी या मोर्च्या मध्ये सामील व्हावे असे आवाहन सर्व समजाकडून करण्यात येत आहे.

चला तर बंजारा समाजाचा पदोपदी अपमान करणाऱ्या, अत्याचार आणि अन्याय करणाऱ्या या सरकारच्या पापाची लक्तरे मुंबईच्या वेशीवर टांगण्यासाठी सर्व समाज प्रेमी बंधू भगिनींनी आझाद मैदानवर धडक देऊन आपला आक्रोश व्यक्त करावा.

… हरिभाऊ राठोड़, आमदार

 

Banjara Live, Banjara News, jai sevalal, GorBanjara, Lamani, Banjara Music, Video, History

Leave a Reply