Sunil Rathod

मनरेगा प्रकरणातील आरोपींना अटक करा
      – निवडणुक काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो .

मुखेड( प्रतिनिधी ) दि. 22 सप्टें
       मुखेड तालुक्यातील मनरेगा योजनेत भ्रष्टाचार केल्या प्रकरणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्तेच्या तक्रारीवरून मा. न्यायालयाने दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले पण त्या सर्व आरोपींना आजपर्यंत अटक झाली नाही व त्याचा जामीन देखिल मा. न्यायालयाने वेळोवेळी फेटाळला असुन,  त्यांनी केलेल्या गुन्ह्याला माफी दिली नाही.  असे दिसते तसेच आता काही दिवसांवर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने मुखेड तालुक्यात हे संबंधित आरोपी तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात. व याचा परिणाम निवडणूक दरम्यान विचित्र होण्याची दाट शक्यता आहे.
>    तेव्हा मुखेड तालुक्यातील विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्या यासाठी मनरेगाच्या सर्व आरोपींना अटक करण्यात यावी. आशी लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुनिल राठोड वसुरकर यांनी  पोलीस अधीक्षक यांच्या कडे दिली.