सेवालाल महाराज जयंती भारतभर साजरी करा – मा. किसनराव राठोड

मुंबई (प्रतिनिधी) – बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची दि. 15 फेबुवारी रोजी 276 वी जयंती येत आहे. त्या निमित्ताने सर्व बंजारा समाज बांधवानी एकत्र मिळून आपआपल्या तांडय़ा -वाडी व शहरी भागात सर्व बंजारा बांधवानी मोठय़ा स्वरुपात सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करावी जसे सेवालाल महाराजांनी सर्व बंजारा बांधवाना ऐकत्र घेऊन भारतभर लदेनी चे काम केले आणि चांगले विचार देऊन त्यांना ऐकत्र आणुन बंजारा समाजाची ओळख इंग्रज व मुगल बादशहा यांना बंजारा समाज हा लढाऊ आणि सत्यवचनी समाज असल्याचे दाखऊन दिले आहे. संत सेवालाल महाराज यांच्या सत्यवाणी विचाराची आज समाजाला गरज आहे. Kisanrao Rathodत्यामुळे समाजातील युवा पिढिला सेवालाल महाराजाच्या चांगल्या विचारांची ओळख व्हावी आणि विखरत चाललेला बंजारा समाज एकत्र एक संघ, एक विचाराने जोडण्यासाठी भारत भरातील तमाम बंजारा बांधवानी सेवालाल महाराजांची जयंती सोहळा मोठय़ा उत्सहाने साजरी करावे असे अवाहण राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष मा. किसनराव राठोड यांनी बंजारा समाजाला केले आहे.