समाजाची देशातील आजची स्थिती- Prof. Madhukar Pawar

एकोणीसाव्या शतकात बंजारा समाजाचे आद्य समाज सुधारकांचे विशेष उल्लेखनीय योगदान आहे. म्हणून सन 1901 पासून 1 जुलै 2010 या 10 वर्षात भारतीय बंजारा समाजाच्या इतिहासात महात्पुरुषांचे योगदान आहे. त्यामध्ये सर्वश्री स्व. दगडुसिंग नाईक राठोड, स्व. हिरामण पाटील (राठोड), स्व. फुलसिंग नाईक राठोड, स्व. हिरामण पाटील (राठोड), स्व. फुलसिंग नाईक, स्व. बाबुसिंग दगडुसिंग राठोड, स्व. बाबासाहेब उर्फ राजुसिंग फुलसिंग नाईक या नंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव उर्फ हाजुसिंग फुलसिंग नाईक, स्व. बळीराम हिरामण पाटील राठोड, स्व. हिरासिंग सदा पवार, स्व. सखाराम मुडे गुरुजी, स्व. वसराम पाटील, स्व. प्रतापसिंग रामसिंग आडे, मु. वरांगली, जि. यवतमाळ, पद्मश्री पाटील, बाबुसिंग भाऊ राठोड, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रधानमंत्रीची पदवी प्राप्त करणारे स्व. उत्तमराव राठोड मु. मांडवी ता. किनवट जि. नांदेड, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविणारे क्रांतिकारक (1983 ते 1985) यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकर नाईक, अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे माजी अध्यक्ष स्व. रणजित नाईक, माजी खा. हरिभाऊ राठोड, यवतमाळ ज्यांनी भारताच्या इतिहासात संसदेच्या लोकसभेच्या अधिवेशनात दिल्लीच्या बंजारांची 300 एकर शेती होती आणि अनेक तांडे होते.

त्या संसदेच्या जागेवर रायसिना नायकांचा तांडा होता. लखीशा बंजाराचा इतिहास त्या तांडय़ासोबत जोडला आहे त्याचा इतिहास 1 तास संसदेत मांडला. माजी मंत्री तथा ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे कार्याध्यक्ष मखराजी पवार तथा, नाईक घराण्याचे वंशज असे म्हटल्या जाते. महाराष्ट्राचे अन्न व प्रशासन मंत्री मनोहरराव राजुसिंग नाईक, प्राचार्य मधुकर रंगलाल पवार ज्यांनी एका तांडय़ाची यशोगाथा हे आपले आत्मचरित्र प्रसिद्ध करुन समाजाची माहिती उपलब्ध केली. या सर्व महाराष्ट्राबाहेरील आद्य समाज सुधारकात भगत चंपा नायक (1905 ते 1959) मु. नागीनाथाची चेव्हेयू तांडा ता. पेनगेंडा, जि. अनंतपूर (आंध्रप्रदेश), के.जी. बंजारा राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा सेवा संघ, सहसचिव गुजरात सरकार तथा संचालक समाजकल्याण विभाग ओबीसी/व्हिजे/एनटी/अल्पसंख्यांक, स्व. जाठर नाईक चित्रदुर्ग (कर्नाटक) स्व. मंधसिंग बुगीया (उत्तरप्रदेश), गुजरात सरकार आग्रोच माजी आ. स्व. महाराजसिंग, आ.स्व. तेजसिंग राठोड, गुलबर्गा (कर्नाटक), स्व. गोपालदेव भेंडसू (कर्नाटक), मंडळ आयोगाचे सदस्य कर्नाटकाचे माजी खासदार तथा भारत सरकारचे लंडनमध्ये उच्चायुक्त पदावर काम करणारे स्व. एल.आर. नाईक बेंगलोर, तथा ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. एम. शंकरनाईक बेंगलोर (कर्नाटक), स्व. भालसिंग पटेल खंडवा (मध्यप्रदेश) या सर्व महापुरुषांनी जे योगदान दिले आहे त्या योगदानाला बंजारा समाजाने कधीही विसरु नये. वसंतराव नाईक आमचे दैवत आहे. माझे वडील सांगायचे तु वसंतराव नाईकांच्या इतका शिक व समाजाची सेवा कर. माझ्या मोठय़ा भाऊंनी किसनरावांनी मला एल.एल.बी. शिकण्याकरिता नागपूरला पाठविले. त्यावेळेस बाबुसिंगांनी जी गोष्ट त्यांच्या शब्दात मला सांगितली. ती वसंतरावांनी त्यांना सांगितली होती. ‘भ्या म आपणे समाजेन महाष्ट्रेम दिसाल आंगच इंदिरा गांधी परवानगी लेतानी आपले समजेन विमुक्त जातीम करतांनी चार टक्का आरक्षण मळा देणछू इ व्हेगी एक वात, दूसर वात कुछू भ्या मतोन…,’

आजपर्यंत देशात पहिला बंजारा स्टडी टूर बंजारा समाजात बाबुसिंग राठोडांनी 1969 मध्ये केला. त्यानंतर आठ राज्याचा दौरा ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे माजी अध्यक्ष माजी मंत्री स्व. रणजित नाईक यांनी केला. तिसरा अभ्यास दौरा 14 मे 2010 ला पोहरादेवीपासून संत सेवादास महाराजांनी जगदंबा देवी, उमरीमध्ये जेताभाया, शामकी माता, गहुली महाराष्ट्राचे स्व. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या समाधीला नतमस्तक होऊन 24 दिवसांचा बंजारा समाजाचा अभ्यास दौरा नंदूरबारपासून गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि 6 जून 2010 ला याचा समारोप राजाभोज धारनगरी या गावात शाम नाईक यांचे घरी झाला. माझे भाषण झाल्यावर एक व्यक्ती उठला, ज्याचे नाव हिरालाल रतनलाल चंदेल आहे, त्यांच्यासोबत श्री सुरेंद्रसिंग बंजारा, गोपीलाल गरासिया हे उपस्थित होते. तेव्हा हिरालाल बंजारा म्हणाला, बंजारा अधिवेशनाला बंजाराचे 25 हजार लोक जमा झाले होते. 1969 पासून आता 2010 पर्यंत अशी सभा झाली नाही. त्यावेळेस वसंतरावांनी उज्जैनच्या सभेत म्हटले होते की, इंदिराजींच्या सोबत माझे चांगले संबंध आहेत, त्यांच्यासोबत शेतकर्यांबद्दल चर्चा करतो, जोपर्यंत देशातील शेतकरी सुधारणार नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. इंदिराजींनी माझे ऐकले व म्हणाल्या मी शेतकर्यांसाठी तुम्ही म्हणाल ते करीन.

त्यावेळेस जर आम्ही वसंतरावांचे म्हणने ऐकले असते, तर आज उत्तर प्रदेशाचा बंजारा समाज अनुसूचित जनजातीच्या यादीत समाविष्ट असता. आज वसंतराव नाईकांच्या 97 व्या जयंतीवर शपथ घेतो व सांगतो की, आपले जे 1969 मध्ये बंजाराचे अनुसूचित जनजातीचा दर्जा देण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मधुकर पवार बंजारा समाजातर्फे सुप्रीम कोर्टात केस दाखल करील. त्यासाठी कितीही खर्च आला तरी चालेल, पण बंजारा समाजाला न्याय मिळवूनच देईन. 1931 मध्ये इंग्रजांनी जी सुची तयार केली. त्यालाच आधार मानल्या गेला. जाती वर्गाची सुची तयार करीत असताना अनेक जातीचा यामध्ये उल्लेख केल्या गेला नाही. त्यामुळे ही जात वंचित राहिली. त्याप्रकारे 1931 मध्ये जी जनगणना तयार केली त्याच्या सुद्धा या समाजाला काहीच फायदा झाला नाही. त्याचप्रमाणे भारत सरकार अधिनियम 1935 च्या अंतर्गत मागासलेल्या जाती जमातीचे विवरण तयार केल्या गेले, त्यामध्येसुद्धा बंजारा समाजाला विचारात घेतल्या गेले नाही. म्हणून आम्ही भारत सरकार, सर्वोच्च न्याय देवता, सुप्रिय कोर्टात आमच्या समस्येचे निवारण होऊ शकते. विश्वासनेच माझा हा छोटासा प्रयत्न का होईना, बंजारा समाजाच्या उत्थानासाठी केलेले हे कार्य नक्कीच बंजारा समाजाच्या विकासात मैलाचा दगड ठरेल. प्राचार्य मधुकर पवार मो. 9823364032

Leave a Reply