पुसद येथे बंजारा समाज उपवर-वधू परिचय मेळावा संपन्न

पुसद (प्रतिनिधी) – ऑल इंडिया बंजारा सेवा संघ आणि भारतीय कर्मचारी सेवा संस्था यांच्या वतीने बंजारा समाज उपवर-वधू परिचय मेळावा शिवकमल मंगल कार्यालय पुसद येथे संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मा.मनोहर नाईक होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आ.हरिभाऊ राठोड, ययाती नाईक, के.डि.जाधव, आर.डी.राठोड, बि.जि.राठोड, प्रा.शिवाजी राठोड, महिला बालकल्याण सभापती सौ.विमल चव्हाण, रमेश चव्हाण, Banjara vadhu-var parichaya melavaजि.प.सदस्या सौ.कमलाताई राठोड, पं.स.सदस्या सौ.आशा चव्हाण, सौ.सादना राठोड, सौ.उषा राठोड, सौ.गायत्री राठोड, बाबुसिंग राठोड, कैलाश जाधव, नवल किशोर राठोड, परशुराम राठोड, विकास नाईक, बळीराम चव्हाण, कैलाश राठोड, मनोहर चव्हाण, बाबुसिंग आडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या परिचय मेळाव्यात 125 उपवर-वधुनी प्रत्यक्ष परिचय दिला तर 225 उपवर-वधूंनी आपली नोंदनी केली. या प्रसंगी मनोहर नाईक यांनी समाजाने लग्नावरिल अवास्तव खर्च टाळा, लग्नात डिजेवर सार्वजनिक ठिकाणी नृत्य थांबवा, हुंडा घेऊ नका, मुलीच्या जन्माचे स्वागत करा असा सल्ला आपल्या अध्यक्षीय भाषनातुन दिला. हरिभाऊ राठोड यांनी आपल्या भाषणातुन परिचय मेळाव्याची गरज असुन त्रीभ्रुण हत्या थांबविण्याचे आवाहन केले. या प्रसंगी प्राध्यापक

4 Comments
  1. Avatar
  2. Avatar
  3. Avatar
  4. Avatar

Leave a Reply