पुण्याजवळ उभी राहते आहे अत्याधुनिक सेफ्रॉन फिल्मसिटी- किसनराव राठोड़

पुणे (प्रतिनिधी) : रिअल्टी मार्केटमध्ये लँड बँकर म्हणून ओळखल्या जाणार्या आणि आता चित्रपटनिर्मितीत उतरलेल्या ए.आर. क्रिएशनने पुण्यात अत्याधुनिक फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केली आहे. पुण्यापासून 10 किलोमीटरवर निसर्गाच्या कुशीत हिंगडाजवळ ही फिल्मसिटी उभी राहणार आहे. इथल्या 500 एकर जमिनीवर सेफ्रॉन फिल्मसिटी उभारली जाईल. संपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन इथे स्टुडिओ, फिल्म प्रोसेसिंग लॅब तर उभारली जाईलच, पण निर्मितीशी, पोस्ट प्रॉडक्शनशी संबंधित इतरही अनेक तांत्रिक सुविधा उपलब्ध होतील.Kisanrao Rathod पुण्यातला हा एकमेव स्टुडिओ असेल, जिथे चित्रपटाची कथा घेऊन जाणारा निर्माता थेट संपूर्ण तयार झालेला चित्रपट घेऊनच बाहेर पडेल. पुण्याजवळच्या या फिल्मसिटी बाबतच माथेरानजवळ हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात एक आऊटडोअर स्टुडिओही उभा राहणार आहे. 700 एकर जागेवर उभ्या राहत असलेल्या स्टॉर व्हॅली टाऊन सिटीच्या आत हा आऊटडोअर स्टुडिओ असेल. व्हिडीओ आल्बम, मालिका, रिऍलिटी शो, चित्रपट यांच्या चित्रीकरणासाठी इथे सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. छोटे किंवा लो बजेट चित्रपट किंवा मालिका करणार्यांसाठी हा स्टुडिओ उपयुक्त ठरणार आहे. ए.आर. क्रिएशनचे सीएमडी के. डी. राठोड यांनी सांगितलं की, सेफ्रॉन फिल्मसिटीत चित्रपट प्रशिक्षण संस्थाही उभी राहणार आहे. त्यात दिल्ली, कोलकता, चेन्नई आणि देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून तज्ञ आणि तंत्रज्ञ प्रशिक्षण देण्यासाठी येणार आहेत. कथालेखनापासून निर्मिती. दिग्दर्शनापर्यंत सर्व प्रकारचे कोर्सेस इथे उपलब्ध असतील.