मी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod

✒️ प्रा.चंद्रकांत काळुराम पवार✒️
माननीय संजयभाऊ राठोड यांची सामाजिक कार्य मी गेल्या अठरा वर्षांपासून पाहात आलो आहे.जेव्हा ते सर्वसाधारण कार्यकर्ता होते तेव्हापासूनच ते गरीब,अडल्या-नडलेल्यांची वा अनेक समस्येने ग्रासलेल्या जनतेंची कामे करत आले आहेत. आमदार आणि त्यानंतर मंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या समाजसेवेच्या कामात कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला दिसून आला नाही.आणि आज मंत्रीपदावर नसताना सुद्धा त्यांच्या समाजसेवेच्या कामात कोणताही फरक पडला नसून तेवढ्याच आत्मीयता व चिकाटीने अविरत सुरू असलेल्या समाजसेवेच्या रथाची गती अधिकच तीव्र झालेली दिसून येते.खरंच संजयभाऊ राठोड MLA Sanjay Rathod यांना आमदार किंवा मंत्रीपदात जेवढे स्वारस्य नाही त्यापेक्षा जास्त स्वारस्य जनतेची सेवा वा त्यांची कामे करण्यामध्ये आहे.सध्या कोरोना या महामारीत स्वतःच्या जिवाची तमा न बाळगता त्यांच्या मतदारसंघांसह यवतमाळ जिल्ह्यात नियोजनबद्ध आरोग्यसेवेची कामे सुरू आहेत. संजयभाऊ राठोड MLA Sanjay Rathod यांनी त्यांच्या दिग्रस-दारव्हा-नेर मतदासंघांत जी सामाजिक व शासकीय कामे केलीत याबद्दल जर कोणा व्यक्तीला यतकिंचीतही शंका असेल तर मला सकाळी ९ ते रात्रौ ९ वाजेपर्यंत फोन करून विचारू शकता.संजयभाऊकडून प्रत्येक क्षेत्रात झालेली व होत असलेली सामाजिक कामे एवढी अफाट आहेत की,त्यांच्या या सगळ्या कामाचा आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र पुस्तक लिहावे लागेल.आणि तेही पुस्तक एक दिवस मी निश्चितच जनतेच्या हाती देणार आहे.म्हणूनच मी ठामपणे सांगू इच्छितो की,विरोधकांनी त्यांच्या विरोधात कितीही वादळे उठवली,कितीही रान पेटवले,कितीही गैरसमज पेरले तरीही अजून येत्या पाच पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करणे हे अशक्य आहे.

जो पर्यंत संजयभाऊ राठोड MLA Sanjay Rathod उमेदवार तो पर्यंत मतदासंघांतील जनता त्यांचीच साथीदार हे मी नाही सांगत तर त्यांच्या मतदासंघांतील तमाम जनता सांगते.आणि आता तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशीच नाही तर सोबत उभी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आपणास आलाच आहे.यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि कोरोना या महामारिने त्रस्त जनता व कामगार यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटीच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहेत आणि ते शंभरटक्के यशस्वी पार पडत आहेत याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे.८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारा आमदार संजयभाऊ राठोड यांची सामाजिक व राजकीय कारकीर्द दिवसेंदिवस अशीच तेवत राहो हीच महाराष्ट्रातील जनतेची सदिच्छा आहे.कारण कोणताही राजकीय वारसा नसलेल्या संजयभाऊ राठोड यांनी त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्यावर महाराष्ट्र राज्यसरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पदापर्यंत मजल मारणे हीच त्यांच्या जनसेवेची पावती आहे. म्हणूनचं तर या लाखोंच्या पोशिंद्याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे असे मनोगत सर्व सामान्य जनतेचे आहे.आमदार संजयभाऊ राठोड यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल महाराष्ट्रातील जनतेसह माझ्याकडून सुद्धा कोटी कोटी शुभेच्छा !
धन्यवाद !

MLA Sanjay Rathod


-: आपला स्नेहांकित :-
प्रा.चंद्रकांत काळुराम पवार,वसई,मुंबई.
Prof. Chandrakant Kaluram Pawar, Vasai, Mumbai
(लेखक/चित्रपट निर्माता व दिग्दर्शक)
मो.9323543522
मंगळवार दिनांक ११ मे,२०२१.