महानायक माझाचं..! – Kavita

(आधुनिक भारताचे जाज्वल्य व्यक्तीमत्व महानायक वसंतराव नाईक साहेबांचे आज मुख्यमंत्री शपथविधी दिन अर्थात वंचिताचा गौरवदिन या प्रसंगी..)

*महानायक माझाचं..!*

*महानायक..!*
येथल्या श्वासाला श्वास तूम्ही पुरवले असताना,
आठवणीचा अन्
कर्तृत्वाचा हिमालय दृष्टीस येतो.
अन् *आम्हा वसंतसैनिकाचा*
*प्रत्येक श्वास आता* *महानायक*
*महानायक म्हणून बोलू लागतो…*

येथल्या निर्बाड भूमीत
हरितक्रांतीचं रक्तविहिन क्रांती घडवीणारा
अन् मानवी उत्थानाचं
बीजे पेरणारा *महानायक माझाच…!*

मर्कटलेल्या मेंदुत
पुरोगामीचं प्राणवायू पेरून
माणसातला ‘माणूस’ जागवणारा
अन् शेवटच्या घटकालाही सन्मान बहाल करणारा
*महानायक माझाच..!*

गल्ली असोत की दिल्ली
महाराष्ट्र असोत की राष्ट्र
येथल्या प्रत्येक पावलावर
मानवी उत्थानाचा ध्यास जपणारा
अन् लोकशाही मूल्याचा
विद्यापीठ *महानायक माझाचं…!*

येथे सर्वसामान्याचे पडद्याआड
लक्तरे ओढणारे…
येथे शोषिताच्या वेदनाचे लिलाव करणारे…
येथे वंचिताच्या वेदनाचे रोटी शेकून कर्तृत्वाचा शिरच्छेद करणारे..
आपला भांडवल अन् स्वार्थी भांडवलावर बुरखे उभारणारे ,
लोकशाहीचे,समाजवादाचेअन् समस्त न्यायवंचिताचे मारकरी ठरत आहेत…
परंतु असे आले- गेले कित्येक
अन् येतील-जातील कित्येक
आता
*तांड्याचा अन् राष्ट्राचा गौरव फक्त महानायक माझाचं…!*

– एकनाथ पवार, नागपूर
(प्रस्तुत लेखक,”वसंतविचारधारा”चे मुख्य प्रसारक व अभ्यासक आहेत.)
# 9850131368
????????????????????????????????????

Vasantrao Naik - 5 December oath ceremony

 

Tag: Vasantrao Naik 5 December oath ceremony Maharashtra, Banjara Gourv day, Banjara Nayak, Maharanayak Kavita

Leave a Reply