Kailash D.Rathod

ग्रुप मधे पोरांच्या वायफळ
गप्पा चालु असताना त्याच ग्रुप
मधील एकाचे वडिल समोरुन
येताना दिसतात, ज्याचे वडिल आहेत
तेच पोरग म्हणत “आमचं म्हातारं आल
बघ”. यावर सगळे जण हासतात. तो पण
हासतो कारण त्यानं मोठा जोक
मारलेला असतो. वडिल नजरे आड
होतात
. पुन्हा यांच्या गप्पा सुरु होतात,
तोच तिथून एका भ्रष्ट व
चारित्र्यहिन
नेत्याची गाडी निघालेली असते.
मगाशी ज्या मुलानं
जन्मदात्याला म्हातारा म्हणून
संबोधल होतं तेच पोरग
त्या चारित्र्यहिन नेत्याला “आपले
साहेब निघाले बघ” अशा गोंडस
शब्दात संबोधतं
तेव्हा त्या हरामखोराला सगळे
ग्रुपवाले
उत्स्फूर्त प्रतिसाद देतात.
संत सेवालालच्या या बंजारा समाजात,
जन्मदात्या वडिलांना म्हातारं
आणि लायकि नसलेल्याला साहेब
म्हणनार्या आवलादी जन्मतात याचचं
दु:ख आहे.
वडिलांनी लहान पणीच हातात
संत सेवालाल चरीञ दिलं असतं तर
आज ही वेळ त्यांच्यावर अन्
संत सेवालाल महाराज्या बंजारा समाजाला कधीच आली नसती.
जय सेवालाल 🚩
आई वडीलांची सेवा करा तिथेच ईश्वर आहे, “जुडो अन् जोडो”
मोठ्याचे आदर करा, लहानांना संस्कार द्या…जय सेवालाल..
श्री कैलास डी. राठोड
समाज सेवक,
गोर बंजारा संघर्ष समिती