गोर बंजारा गौरव दिन सोहळ्याची (५ डिसेंबर २०१७) तयारी सुरु

५ डिसेंबर २०१७ मंगळवार रोजी गौरवभूमी (गहुली) – भक्तिधाम पोहरागड येथे पार पडणाऱ्या *गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याची* जय्यत तयारी चालू असून हा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी शेकडो स्वयंसेवक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
*कार्यक्रमाची रूपरेषा*
———————————-
*१* . दिनांक ४ डिसेंबर रोजी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत *भक्तिधाम* पोहरागड येथे सांस्कृतिक कार्यक्रम.
*२* . दिनांक ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता भक्तिधाम ते गौरवभूमी (गहुली) भव्य रैली निघणार असून यामध्ये १२५ मोटरसाइकली आणि ५० कार चा समावेश असणार आहे.
*३* . सकाळी ९ वाजता *गौरवभूमी (गहुली)* येथे वसंतराव नाईक साहेबांच्या स्मृतिस्थळी त्यांना अभिवादन करुन पुन्हा ही रैली *भक्तिधाम* येथे येईल.
*४* . सकाळी ११ वाजता मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत *भक्तिधाम* पोहरागड येथे पुढील कार्यक्रम सुरु होईल.
सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येते की, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नाईक साहेब आणि समाजाच्या अस्मितेसाठी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे .
विनीत.
*गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळा आयोजन समिती*

Gor Banjara samaj gourav din

गजानन धावजी राठोड

प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव्ह

9619401377

Tag: Gor Banjara Samaj Gourav Din, Vasantrao Naik, Banjara Live News, Poharadevi, Bhaktidham, Gahuli, Wasim

One Comment
  1. Avatar

Leave a Reply