मैदान !!चलो आझाद मैदान ! चलो आझाद, मुंबई

✊✊
मैदान !!चलो आझाद मैदान ! चलो आझाद
( दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वा.)

मा. हरीभाऊजी राठोड ( माजी खासदार व माजी आमदार ) यांना आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र भरातील व भारताच्या इतरही राज्यातून अनेक संघटनाचे नेते, पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा व आशिर्वाद स्विकारत असतांनाही ; त्यांच्यात समाजासाठी व समाजाच्या प्रश्नांवर सतत विचार करत असल्याची आंतरीक तळमळ आजच्या दिवशी सुध्दा दिसून येत होती !!

आजचे हे स्पर्धेच्या युग आहे. सर्वच क्षेत्रात स्पर्धा चालू आहे, मग ते शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक असो अथवा राजकीय क्षेत्र असो ; येथून- तेथून सर्वत्र स्पर्धाच स्पर्धा दिसून येते ! आपण येथे राजकीय क्षेत्रा विषयी येथे विचार करूया. समाजाच्या भल्यासाठी, सरकार कडून कोणतेही काम करून घेण्यासाठी “सामाजिक एकजूट” फार फार महत्वाची बाब आहे. भलेही सामाजिक संघटना वेगवेगळ्या असू देत परंतु समाजाच्या “सामान्य कार्यक्रमवर” ( Common Agenda) सर्वांनी स्वंय स्फूर्तीने मनापासून एकत्र येऊन सरकार वर दबाव आणता आला पाहिजे ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. आपण हे समजण्या इतपत आपण सुज्ञ तसेच जागरूक असणेही गरजेचे आहे. समाजाची बाजू प्रभावीपणे सरकारकडे मांडणेही ओघाओघाने आलेच. त्यादृष्टीने आपली सामाजिक ताकत अधिक सक्षमपणे वापरण्याची आवश्यकता आहे ; अशामुळेच आपण कोणत्याही सामाजिक लढ्यात यशस्वी होवू शकतो . म्हणूनच “सामाजिक एकजूट” ह्याला अन्य दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही, व हेच शत् प्रतिशत सत्य आहे हे आपण सर्वांनी जाणले पाहीजे असे कळकळीने सांगावेसे वाटते !
मा. हरिभाऊंना , गोर समाजाबद्दल अतिशय तळमळ आहेच, गोरबंजारा समाजाचे त्यांचा खासदार म्हणून त्यांची कारकीर्द अभ्यासु व संसदेत बोलणारे खासदार अशीच होती. ते समाजाच्या प्रश्नांवर अनेकदा संसदेत प्रभावीपणे बोललेले आहे ; समाजाचे मुद्दे मांडलेले आहेत परंतु संसदेत इतर सांसदांचे सहकार्य न मिळाल्याने प्रश्नांची सोक्षमोक्ष पुर्णपणे होऊ शकली नाही तरी पण एक “अभ्यासु -उत्तम संसदपटू ” म्हणून त्यांचा नावलौकिक होता. महाराष्ट्र विधीमंडळातही मा. हरीभाऊजीनी अनेक सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणली व अनेक बाबतीत प्रश्न मार्गी सुध्दा लागलेले आहेत ! मग तो तांडा विकासासाठी असो, आरक्षण असो, प्रमोशनमधील आरक्षण असो , क्रीमीलेअर चा असो अथवा श्रध्देय वसंतरावजी नाईकसाहेब विकास मंडळाचा असो ; त्यांनी सरकारला जाब विचारलेला आहे व काही बाबतीत आपणास यशस्वीपणे न्याय मिळवून दिलेला आहे.
सामाजिक कार्यकर्ता ते देशपातळीवरची संघटना – राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाची बांधणी करून ,बंजारा क्रांती दलाचे माध्यमातून संपूर्ण देशभरातील गोरबंजारा समाज एकसुत्रात बांधून, बंजारा समाजात विश्वास व नवी उमेद निर्माण केली आहे. या उपर खासदार व आमदार म्हणून त्यांचा राजकीय क्षेत्रात कामाचा आवाका मोठा असल्या कारणाने गोरगरीब वंचित/ विमुक्त-भटके-बंजारा/ ओबीसी (ज्यामध्ये गोरबंजारा सुध्दा आहेत) अशा रितीने सर्वांना बरोबरीने घेऊन गेली २५ वर्षे गोरगरीब वंचित/ विमुक्त-भटक्यासाठी आझाद मैदान मुंबई असो किंवा दिल्ली याठिकाणी समाजाच्या संविधानिक हक्कासाठी आंदोलने केलीत त्यामुळेही सरकार मध्ये “हरिभाऊ राठोड” या नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे. शेवटी, यश-अपयश “नेत्याच्याच नव्हे तर समाजाच्या पाठबळ” वरही ठरते, हे ही विसरून चालणार नाही. मा. हरिभाऊच्या संवैधानिक अभ्यास व अनुभव निश्चितच गौरवास्पद आहे. सामान्य जनतेच्या चळवळीतील नेते असल्याने त्यांच्या अनुभवाचा व सरकारमधील वजनाचा फायदा उपयोग करून घेण्याची आवश्यकता आहे व त्यांनी पुढाकाराने करावा. सरकारामध्ये वजन असणारे तसेच बंजारा समाजाचे काम करण्याची जिद्द असणारे व धडाडीचे नेते मा. मंत्री महोदय यांचे सहीत इतरही सन्माननीय आजी- माजी आमदार व बंजारा संघटनाचे पदाधिकारी यांनी २७ फेब्रुवारी २१ रोजी “आझाद मैदान येथील आंदोलनात ” उपस्थित राहून यशस्वी करावे अशीच भावना समाज बांधवां कडून होत आहे !
समाज बांधवांनो ; सर्वांना नम्रपणे आवाहन करू इच्छितो की, येणारा काळ ओळखून , आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी म्हणा किंवा आपल्यावर होणा-या अन्यायाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी “सामाजिक -एकजूट” (सामाजिक -संघटन भलेही अनेक असू देत) अतिशय महत्त्वाची आहे ! आपल्या पुर्वजांनी-वडीलधारी मंडळीनी “वारसा” म्हणून आपल्याला एक मोलाचा सल्ला देवून ठेवलेला आहे . आणि म्हणून मी नेहमीच आग्रहाचे आवाहन सातत्याने करीत असतो …..
“” एक बणों — नेक बणों “”
याकरीता सर्व राजकीय नेते मा. मंत्री महोदय/मा. खासदार / मा. आमदार/ सर्वच संघटनांचे नेते – पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी , समाजाच्या भल्यासाठी आवश्यकतेनुसार एकत्रितपणे “एकजुटीनेच न्यायासाठी लढा” उभारला पाहिजे; जेणेकरून येणा-या भावी पिढीचे भविष्य सुरक्षित होइल , तसेच येणारी पिढी तुमचे बद्दल गौरवोद्गार काढतील व तुम्हाला धन्यवाद देतील !

नुकत्याच बंजारा समाजासमोर ओढवलेल्या प्रकरणावर, सरकार कडे दाद मागण्यासाठी गोरबंजारा समाजाने जागरूकता दाखवत एकजूटीनेच न्याय मिळविण्यासाठी एकत्रितपणे, एकाच मंचावर आपण जमलो पाहिजे ; असे नम्र आवाहन करतो ! येथे हे आवर्जून सांगावेसे वाटते ;गोर- बंजारा समाजाच्या महिलांच्या बाबतीत आपल्या कांदबरीत भालचंद्र नेमाडे याच्या अश्लील लिखाणामुळे, गोरबंजारा समाजाची मानहानी झालेली आहे. यापुढे असे भविष्यात घडू नये हीच सर्व समाज बांधवांकडून बोलले जात आहे ! यासाठी सरकार पुढे लोकशाही मार्गाने ;आपले गा-हाणे प्रकर्षाने मांडणे हेही तेवढेच गरजेचे आहे. आघाडी सरकार आपणास निश्चितपणे न्याय देईल व ताबडतोबीने कायदेशीर कारवाई करतील; असा आशावाद आम्हा सर्वांना वाटतो !
जय सेवालाल ! जय वसंत !!
आपलाच गोर समाजसेवक;
देवेंद्रभाऊ पवार मुंबई

Leave a Reply