संत श्री सेवालाल महाराज यांचा जन्म दिवस शासकीय पध्दतीने साजरा करण्याबाबत राज्य शासनाकडे मागणी राज्यमंत्री महसूल, श्री.संजय राठोड

प्रेस नोट

प्रति,
मा.संपादक,
सामना, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, सकाळ, देशोन्नती, पुण्यनगरी, संध्यानंद, रायगड टाईम्स, नवाकाळ, नवशक्ती, प्रहार, वार्ताहार, तरुण भारत, नवभारत, संध्याकाळ, राज्योन्नती, महासागर, मुंबई चौफेर

विषय :- संत श्री सेवालाल महाराज यांचा जन्म दिवस शासकीय पध्दतीने
साजरा करण्याबाबत राज्य शासनाकडे मागणी राज्यमंत्री
महसूल, श्री.संजय राठोड

महोदय,
उक्त विषयान्वये कळविण्यात येते की, राज्यमंत्री महसूल, श्री.संजय राठोड यांनी दिनांक 03.02.2016 रोजी मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना सदर विषयी विनंती केली होती. त्याअनुषंगाने अशा प्रकारे एकूण 28 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या असून संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या सुट्टीचा समावेश नाही याव्यतिरिक्त प्रत्येक रविवार व दुसरा चौथा शनिवार कार्यालयांना सुट्टी असल्याने तथापि, 2016 करिताच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्याने संत श्री सेवालाल महाराज यांच्याबद्दल शासनास अत्यंत आदर असूनही त्यांची जयंती शासन स्तरावर साजरी करणे अथवा सुट्टी देणे प्रशासकियदृष्ट्या शक्य होत नाही असे कळविले असता मा.राज्यमंत्री महसूल यांनी संत श्री सेवालाल महाराज यांचे कार्य व बहुजनांची मागणी व अनुयायी यांचा विचार करता संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सर्व शासकिय कार्यालयात साजरी करण्याबाबत आदेश निर्गमित व्हावेत, अशी विनंती केली आहे.
सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करावी, अशी विनंती आहे.
आपला,
(निलेश राठोड)
स्वीय सहायक
9892333233

2 Comments
  1. Avatar
  2. Avatar

Leave a Reply