भारतीय सेवा नाका कामगार संघटनाआयोजित पत्रकार परिषद

*भारतीय सेवा नाका कामगार संघटना*
आयोजित.
????????????
*पत्रकार परिषद*
????????????
दि. ३०/११/२०१७ रोजी.
*प्रेस क्लब किल्ला कोर्ट समोर* बृहन्मुंबई म.न.पा.जवळ येथे पार पडली,
यावेळी *संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. नरेश राठोड व संघटनेचे अध्यक्ष मा. सुभाष तंवर तसेच संघटनेचे सल्लागार मा. धनंजय शिंदे व आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी* हे पत्रकारांशीबोलताना सांगितले की, भारतीय सेवा नाका कामगार संघटना ही असंघटित कामगारांच्या न्याय व हक्कासाठी येत्या *१ डिसेंबर ते २ जानेवारी* राज्यव्यापी जनजागृती अभियान राबविण्याचे काम करणार असुन केंद्र व राज्य शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी *३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आझाद मैदान येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे*
येणाऱ्या काळात संघटनेतर्फे असंघटित कामगारांना संघटनेतर्फे ओळखपत्र, नाका प्रतिनिधी नेमण्यात येणार आहे त्याचबरोबर सरकार कडुन जीवन विमा योजना आणि आरोग्य विमा तसेच स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे यासाठी संघटन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कामगारांच्या संदर्भात ९० दिवसाची नोंदणीची अट ही रद्द करून ३० दिवसाची करण्यात यावी यासाठी देखील संघटन प्रयत्न करणार आहे.
या असंघटित कामगारांच्या जनजागृती अभियानात सर्व सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी सहभागीव्हावे व शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील असंघटित कामगारांच्या समस्या जाणून जनजागृती अभियान मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी *संघटनेचे अध्यक्ष मा. सुभाष तंवर* यांनी सांगितले.
उपस्थित मा. नंदुभाऊ पवार प्रचारक भारतीय बहुजन क्रांती दल, गोविंद राठोड कुलाबा, निलेश राठोड बदलापूर, निरंजन मुडे, रूपचंद राठोड, मुख्य संघटक, अनिल राठोड
उपस्थित सर्व कमिटी सभासद पत्रकार बांधव पत्रकार परिषदेत हजर होते.
सर्व उपस्थितींचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.
????????????????

टिप. प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर आपल्या जवळील गृपवर व फेसबुकवर पाठवावे.

धन्यवाद.
????????????????????????
*भास्कर राठोड.*
*संघटक*
*भारतीय सेवा नाका कामगार संघटना.*
*८१०८०२४३३२*

Gajanan Rathod

 

Tag: Bharatiya Seva Naka Kamgar Sanghathan, Banjara Naka Kamgar Sanghathan Janjagruti Abhiyan, Banjara Live News

Leave a Reply