भ. बुद्धानुयानी संत सेवालाल महाराज

भारत देश हा साधू संतांनी गजबजलेला देश आहे. आजच्या घडीला देशात किसी साधू संत आहेत हे सांगणे शक्य नसले तरी सर्व जाती जमातीचे मिळून अडीच ते तीन कोटी साधू-संत, भगत-भोपे, फकिर, अवलिया, मुनीगण, भिक्कू साध्या असतीलच असा माझा अंदाज आहे. विशेष म्हणजे साधू संतांची भगतभोप्यांची, समाज सुधारक विचारवंतांची संख्या महाराष्ट्र प्रदेशात सर्वाधिक असावी. कारण या देशात आतुलेदार, बलुतेदार, कुणवी, मराठा, मुस्लिम, जैन, मारवाडी, शिख, सिंधी, गुजराती, आदिवासी, अनुसूचित जाती, जामाती, भटके, विमुक्त, वगैर सर्वच समाजातून भजन, किर्तन, प्रवचन, प्रबोधन, जागृती करणारे प्रतिनिधी दिसून येतात. हे सर्व प्रतिनिधि संत-विचारवंत, प्रबोधनकार या श्रेणीत मोडतात, या सर्व साधूसंत व विचारवंतां ध्ये भटक्या-विमुक्त, गोर, बंजारा समाजाचे संत स्मृतीशेष सेवालाल महाराज हे आठराव्या शतकात होऊन गेले. त्यांचा जन्म 15 जानेवारी 1739 मध्ये व मृत्यू म्हणजे त्यांनी 2 जाने 1773 रोजी समाधी घेतल्याची नोंद आहे. ते केवळ 33 वर्ष 10 महिने 16 दिवस जगले त्यांच्या आईचे नांव धर्मणी व वडिलांचे नाव भीमा नायक होते. संत सेवालाल यांचा जन्म डोंडी तांडा, ता. गुत्ती, जि. अनंतपूर (आंध्रप्रदेश) येथे झाला ते लदेणीचा धंधा करीत होते. म्हणून सेवालाल महाराज सुद्धा लदेणीचाच धंधा करु लागले. वैदिक काळापासून मनुस्मृति ग्रंथानुसार सर्वच बहुजनांना शिक्षण, श्रवण, लेखन, पाठांतरापासून वंचित केले गेले होते. गोर बंजारा समाज तर गांवशहरापासून दूर डोंगर कपारीत राहत होता.Sant Sevalal Maharaj

मनुस्मृती ग्रंथाचे बंधन आणि सुसंस्कृत वस्तीपासून अतिदूर डोंगरपर्वतांच्या पायथ्याशी राहून जीवन जगत असल्यामुळे संपूर्ण समाजच अशिक्षित होता. म्हणून अशिक्षित समाजाचा सुधारक, पुढारी, नेता, नायक असलेला संत सेवालाल महाराज सुद्धा अशिक्षितच होते. त्या काळात मुस्लिमांची, अन्य लोकांची सत्ता भारतात होती. त्यांचे हस्तक सर्व ब्राह्मण मंडळी होती. तेव्हा संत सेवालाल महाराजांनी लपून छपून कुठूनतरी अक्षर ओळख करुन घेतली असावी. अक्षर ओळखी शिवाय अधिक शिक्षण सेवालाल महाराजांचे नव्हते. ज्या समाजात त्यांचा जन्म झाला तो समाज देखील पूर्ण निरक्षर, अंधारात, अंधश्रद्धेत व दरिद्रीपणाने गांजलेला होता. समाजाचा धंधा लदेणीचा सुद्धा भटकंतीचा होता. चोहेकडे अज्ञान, गरीबी अंधःकार पसरलेला असताना संत सेवालाल महराजांचा जन्म झाला. समाजाची अवस्था पाहून ते व्यथित, दुःखी, अस्वस्थ झाले. झोपलेल्या शोषित, निरक्षर गरीब समाजाला जागृत कसे करावे याचा ते रात्रं- दिवस विचारकरु लागले. याच विचारातून त्यांनी पुढे लदेणीचा धंधा करता करता जनजागृतीचे काम सुरु केले. त्यांच्या एकुण विचारात भगवान बुद्धांच्या विचाराचेच प्राबल्य दिसून येते या विचार प्राबल्यामुळेच ते बुद्ध विचारांचे अनुयायी निश्चितपणे सांगता येते. भगवान बुद्ध हे मानव समाजाच्या दुःखाचे कारण शोधण्यासाठी संसार त्याग करुन घराच्या बाहेर पडले अनंत हाल अपेष्टा सोसून चिंतनाच्या माध्यमातून त्यांनी खर्या ज्ञानाची प्राप्त व दुःखाचे कारण शोधले संत सेवालाल महाराजांची सुद्धा गोर बंजारा समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनारोग्य, दारिद्रय, असंघटितपणा वगैरे बाबी पाहून ते दूर करण्यासाठी अविवाहित राहून सेवा करण्याची प्रतिज्ञा केली. लग्न करुन घेण्याची अनेकांनी त्यांना विनंती व आग्रह केला. परंतू ते समाधिस्त होईपर्यंत अविवाहितच राहिले. भ. बुद्ध व संत सेवालाल महाराजांची तुलना कधीच शक्य नाही. भ.बुद्ध हे एक महान ज्ञानी, त्यागी, तत्त्वज्ञ, संपूर्ण मानव समाजहित चिंतक, महामानव होऊन गेले. परंतू सेवालाल महाराजांवर त्यांच्या विचाराची, आचाराची आणि तत्त्वज्ञानाची जबरदस्त पकड होती, हे त्यांच्या समाज प्रबोधनातील कार्य व वचनावरुन सहज सिद्ध होते. याच कारणामुळे ते भ. बुद्धांचे अनुयायी होते असे माझे पक्के मत आहे.

गोर बंजारा समाजात भ. बुद्धाच्या काळात संपूर्ण जगात लदेणीचा व्यापार करणारे तपासू व भल्लिक नावाचे दोन मोठे अनुभवी व्यापारी होऊन गेल्याचा उल्लेख जातक कथेमध्ये सापडतो या दोन्हीं व्यापार्नीं भ. बुद्धाला सुकामेवाचा आहार देऊन स्वागत केल्याचे व बुद्धांनी या दोघांनाही बुद्ध धम्माची दीक्षा सर्वप्रथम दिल्याचा सुद्धा उल्लेख प्रा. मोतीराज राठौड यांनी लिहिलेल्या ‘गोर बंजारा लोकांचा इतिहास’ या पुस्तकात आहे. तेव्हा गोर बंजारा समाजामध्ये बुद्ध काळापासूनच बुद्ध अचार विचाराची व तत्त्वज्ञानाची पेरणी झाली होती. हे वरील प्रमाणावरुन सजह प्रमाणित होते. एवढेच नव्हे तर गोर बंजारा समाजाची एकूण जीवनशैली ही बुद्धांचा आचार विचारानुसारच असल्याचे आजही स्पष्टपणे दिसून येते. वैदिक आणि सनातनी हिंदू संस्कृतिकच्या अनेक समाजघातक, अन्यायकारी, रुढी परंपरांचे चलन बंजारा समाजात आदी काळापासून नव्हते व आजही नाही. तेव्हा गोर बंजारा समाजास हिंदू न मानता बुद्ध धम्म अनायी मानने, समजणे हेच सर्व दृष्टीने योग्य व सत्य आहे. पण दीर्घकालीन हिंदू अर्थात वैदीक संस्कृती, सभ्यताच्या संस्कारामुळे ते स्वतःळा वैदिक सनातनी हिंदू समजून घेत आहेत. याचे कारण तो आपला मूळ इतिहास पूणर्तः विसरून गेलेला आहे. निसर्ग नियम असा आहे की जो समाज आपला इतिहास विसरतो तो दुसर्या शासक समाजाचा गुलाम, नोकर बनतो, व लाचारीचे परावलंबी जीवन जगतो. म्हणूनच सांगितले जाते की, ‘राजा कालस्य कारणम्’ अर्थात ‘जसा राजा तशी प्रजा बनते’.

बुद्ध धम्माच्या परनानंतर पुन्हा एकता सनातनी वैदिक हिंदू संस्कृती सभ्यता आणि साहित्याची शक्ती, संस्कार, दबाव, दहशत वाढल्यमुळे व बुद्ध धम्माची सनातन्यांनी भारतातूनच हकालपट्टी केल्यामुळे हळूहळू गोर समाजा बुद्ध जीवनशैली विसरुन गेला. कालांतराने सततच्या संबंधामुळे, सनातनी संस्कृती, सभ्यता आणि साहित्यिक कडक नियम, बंधन आणि नियंत्रणामुळे गोर समाज सनातनी वैदिक अर्थात हिंदू मध्ये ममावून गेला व आज तो स्वतःला मूळ बुद्ध धम्मी न मानता गुलामगिरी मुळे हिंदू धर्म अभिमानी बनून वागत आहे. हा सर्व काळशचा व त्या काळातील राजाचा परिणाम व पराक्रम आहे. एका संस्कृत सुभाषिताप्रमाणे वरील तथ्य तंतोतंत अचूक आहे. ‘ग्रहानुग्रह राजा ईoशरः’ जगात ईoशर नाही. दया दाखविणारा, करणारा दयाळू राजा व दंड देणारा, निर्दय, क्रूर राजा हा ईoशरच असतो. राजाच्या आज्ञेप्रमाणे, आदेशाप्रमाणे व संपूर्ण राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, संस्कार सर्व काही घडून येतात. आज भारतात बुद्धानंतर सनातनी, अभिमानी, जातीवर्णवादी, धर्मवादी, परोपजीवी, शोषक अशा ब्राह्मण समाजाचीच सर्वत्र सत्ता असल्यामूळे सर्वच लोक ब्राह्मणमय झालेले आहे. ब्राह्मण सांगेल तेच खरे असे समजून त्यांचे गुलाम बनलेले सर्वचे सर्व त्यांची गुलामी करण्यात धन्यता मानत ओ. गुलामीची तिव्रता, दाहकता, मर्यादा वाढल्याशिवाय गुलामाला त्यांच्या गुलामीची करणे समजणार नाही. गुलामीची तिव्रता, दाहकता सध्या प्रथम अवस्थेत आहे. येत्या एका दशकात ही तिसर्या अवस्थेला पोहोचणार आहे. तिसरी अवस्था संपल्यानतरच गुलामीची दिशा व गुलामाची दशा ठरणार आहे. तो पर्यंत मौन धारण करुन प्रतिक्षा करण्यापलीकडे दूसरे काहीही करता येणे शक्य नाही. कारण नेते, उद्योगपती, व्यापारी, भांडवलदार हे सर्व खाजगीकरणाच्या घोडय़ावर बसून सुसाट प्रवास करीत आहेत. त्यांची बरोबरी पायी प्रवास करुन शकणार नाही. हेच आजाच्या घडीला सत्य आहे. गोर समाज बुद्ध धम्मापासून कसा दूरावला हे समजावून देत असताना थोडे विषयांतर झाले आहे. समजावून देण्यासाठी ते आवश्यकही होते. आता मूळ मुद्दाकडे वळूया.

चिंतन केल्यानंतर व ज्ञानप्राप्तीनंतर अनुयायांना व जनतेला उपदेश करताना सर्वप्रथम बुद्धांनी सांगितले की, ‘अत्त दीप भव’ स्वयंप्रकाशित व्हा. स्वतः प्रयत्न करा. स्वतः अथवा स्वतःची उन्नती करा. तुम्ही स्वतः प्रकाशमान होऊ शकता, उन्नती करुन शकता, मोठे होऊ शकता, सुखी बनू शकता. फक्त स्वावलंभी बना. परावलंबी राहू नका. परावलंबी राहिल्याने तुम्ही सुखी बनणार नाही. दुःखे कमी होणार नाही. हेत बोल, हेच वचन संत सेवालाल महाराजांनी साररुपांनी गोर बंजारा समाजाला समजावून देताना, उपदेश करताना सांगितले आहे की, ‘तम सौता आपणे जीवनमे दिवो लगा सको छो.” अर्थ असा की, प्रत्येक माणूस प्रयत्नाअंती आपले जीवन सुखी, समृद्ध व आनंदी बनवू शकतो. त्याला फक्त प्रयत्नांची, कष्टाची जोड हवी. जगात अशक्य काहीच नाही. फक्त प्रत्येकाने दूसर्यार अवलंबून राहू नये, प्रयत्न हाच परमेश्वर आहे. हेच वचन संत तुकारामांनी सुद्धा सांगितले आहे.

‘असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे, आणखी एक सुभाषि आहे की, ‘वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ संत सेवालाल महाराज भटक्या समाजातील एक निरक्षर समाज सुधारक होते. भ. बुद्धांसम किंवा संत तुकाराम महाराजांसम ते महान किंवा तत्त्वज्ञ नव्हते. परंतु वरील महापुरुषांच्या विचारांचे ते जाणकार होते. म्हणून या सूत्रांच्या माध्यमांनी त्यांनी गोर समाज जागृतीचे कार्य केले. ‘आपणे पाल आपणच ठोक लो’ असाही उपदेश त्यांनी गोरभाषेत केला आहे. दूसर्यावर विसंबून राहू नका. स्वावलंबी बना. ‘जो दूसर्यावरी विसंबला, त्याचा कार्यभार बुडाला’ हेच त्यांना या गोर वचानाद्वारे समाजावून द्यायचे होते. हे प्रखरपणे जाणवते.भ. बुद्धा हे पूर्णतः अनईoशरवादी म्हणजे नास्तिक होते. त्यांनी देव, दैव,धर्म, जातीव्यवस्था, पूजा, प्रार्थना, पूर्वजन्म, पूनरजन्म, अवतार, मोक्ष, स्वर्ग, नरक, धार्मिक ग्रंथ वाचन, धार्मिक कर्मकांड, पूजा, प्रार्थना, अभिषेक, क्षेत्रदर्शन, नामस्मरण, यज्ञयाग, मंत्र, तंत्र, शुद्ध- अशुभ, मूहुर्त, तीथ, वर्ग, गण,कुंडली, भूत, भानमती, करणी, कवटाळी, चेटूक, चकवा, चमत्कार, जादूटोणा,टिळामाळा, त्रिशूळ, कमंडलू, पादुका वगैरे सर्वांचा निषेध केलेला आहे. या सर्व बाबींना भ. बुद्धांनी अमानवी, घातकी, अकल्याणकारी, शोषक, बौद्धिक गुलामीच्या अज्ञान, अंधश्रद्धेच्या, अंधकाराच्या व काल्पनिक ठरविलेल्या आहेत. या बाबींमुळे माणसा माणसांत भेदभाव, परकेपणा, पक्षपात, वाद, भांडणे, अन्याय, अत्याचार, मानवशक्ती, संपत्ती, वेळेचा दुरुपयोग, शोषण, लुटमार, ज्येष्ठ-कनिष्ठपणा, जातीवाद, धर्मवाद, संप्रदायवाद, यामध्ये वाढ होऊन मानवाचे जीवन अति कष्टमय, वेदनामय झाल्याचे सांगितले आहे.

या सर्व वेदना, कष्ट अन्याय, अत्याचार वगैरे बाबीतून मुक्त होण्यासाठी बुद्धांनी धम्माची (नीतिसूत्रांची) निर्मिती केली आहे. या धम्माच्या माध्यमातून, नीतिसूत्रांच्या माध्यमातून बुद्धांनी मानवांनी मानवाशी कसे वागावे, बोलावे, कसा व्यवहार करावा, कसे आचार विचार ठेवावे, कोणत्या नियमांचे पालन करो, चारित्र्य, करुणा, प्रज्ञाचे स्वरुप कसे असावे, वगैरे पक्षपातरहीत मानव कल्याणाच्या नितीतत्वाचाच उहापोह केलेला असून यात हिंदू धर्मातील कर्मकांडाप्रमाणे कोणत्याही शोषक, गुलामगिरीच्या, पक्षपाती, अन्याय, अत्याचारांच्या तत्वाचा समावेश नाही. बुद्धाचा धम्म रहा संपूर्ण मानव समाजाचा कल्याण करणार व न्याय देणारा समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधूभाव विकसित करुन सर्वांच्या सुखात, आनंदात, समृद्धीत, एकतेत, शांततेत भर घालणारा एकमात्र मार्ग अथवा तत्त्वज्ञान, जीवनसूत्र आहे. 33 कोटी देवांनी बनवलेली हिंदू संस्कृती, सभ्यतेची खिचडी बद्धाच्या धम्मात नाही. बुद्धाचा धम्माचा संबंध केवळ मानवाच्या मन, बुद्धी, शील, चरित्र, नीतिमत्ता, यांच्याशी येतो. शेवटच्या श्रमिक, असहायक, संसाधनरहीत, अनाथ, अपंग माणसाला न्याय मिळावा, व सर्वांना सुख शांती, समृद्धी प्राप्त व्हावी, हाच धम्माचा प्राण, गाभा, हेतू अथवा केंद्रीय तत्व, सुत्र आहे. संत सेवालाल महाराज हे काही फार मोठे विद्वान, तत्वज्ञ, वा बुद्धासम, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे समाजसुधारक नव्हते. ते अल्पसंख्यक गोरबंजारा या भटक्या समाजाचे प्रमुख होते.

समाजप्रमुखाच्या नात्याने त्यांनी आपल्या अल्पसंख्यक भटक्या समाजाला त्यांच्या पतन अवस्थेतून वर उचलण्यासाठी बुद्धांचे विस्तृत तत्वज्ञान अतिशय संक्षिप्त रुपात, शब्दात, बोलीत समाजासमोर ठेऊन त्यांचे बुद्धीचातुर्य सिद्ध केले आहे. अल्पशिक्षित माणूस ही केवळ अनुभवाने, चिंतनाने, विचार केल्याने किंवा संतसंगतीने किती बुद्धीवान होतो, त्याचे संत सेवालाल महाराज हे एक अप्रतिम प्रतिक, आदर्श नमुना आहे. गोर बंजारा समाजाला उपदेश करताना त्यांनी आपल्या बोली भाषेत सांगितले की, ‘तम सौतार वळख सौता कर लिजो। कोई केनी भजो-पूजो मत, कोई केती कामी छेनी। भजे-पूजे ा वेळ घालवेणपेक्षा, करणी करेरो सिको। मारी सिकवाडीपर धेन दिजो। जाणजो, छाणजो अन पछज मानजो।

एका पाण्याच्या भांडय़ात समुद्राचे पाणी भरुन घेतल्याप्रमाणे संत सेवालाल महाराजांनी वरील गोर बोली भाषेतल्या सुभाषितामध्ये भगवान बुद्धांचे तत्त्वाज्ञान गोर बंजारा समाजाच्या डोक्यात बसवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धांनी हिंदू संस्कृतीती अनेकविध कर्मकांडाच्या ज्या प्रमारे निषेध व त्याग केलेला आहे. त्या सर्व कर्मकांड त्यागाचं सार संत सेवालाल महाराजाच्या वरील सुभाषितामध्ये समावलेला आहे. सुभाषिताचा अर्थ विस्तृत रुपात खालील प्रमाण आहे. तुम्ही दूसर्या कोणापेक्षाही कमी अथवा तुच्छ नाही. दूसर्यापेक्षा कमी अथवा तुच्छ, कनिष्ठ असल्याच्या न्युनगंडातून तुम्ही बाहेर पडा. तुम्ही दूसर्या इतकेच श्रेष्ठ किंवा त्यांपेक्षाही वरचढ आहात. केवळ तुम्ही तुची स्वतःची ओळख करुन द्या. घाबरु अथवा भिऊ नका, प्रत्यनांची पराकाष्ट करा. यश तुम्हाला हमखास मिळणार आहे. कोणालाही कोणाला भजण्याची, नामस्मरण करण्याची, प्रार्थना, पूजा, प्रशंसा, कमरण्यासाठी गरज नाही. भजन, पूजन, कथा-किर्तन, क्षेत्रदर्शन, ग्रंथवाचन करुन मोलाचा वेळ, पैसा, शक्ती, खर्च करण्यापेक्षाकर्तव्य करुन दाखवा. मी हे जे काही तुम्हाला सांगत आहे, त्याकडे मनातून, अंतः करणातून लक्ष द्या. त्याबाबत चिकित्सपणे चर्चा करा. सत्य काय आहे, त्याचा शोध घ्या आणि नंतरच सत्यावर अंल करा. सत्याचा स्वीकार करुनच जे असत्य आहे. त्याचा त्याग करा. बुद्धांनी देवाची कल्पना, अस्तित्व नाकारल्यामुळे देवाशी संबंधित सर्वच कर्मकांडाला संत सेवालाल महाराजाचा सुद्धा पूर्णपणे विरोध होता. गोर बंजारा समाजाला जागृत करीत असताना महाराजांनी समाजाची निरक्षरता, अडाणीपणा ध्यानात ठेऊन उपदेश केलेला आहे. प्रबोधन करताना त्यांनी गोर अनुयायींना जाणीव अथवा कल्पना करुन दिली आहे की, ‘आपण गोर काळे माथेर लोक छा.’ सत्यकाम फत्य करे, भलेती भेट रखाडो,’ अर्थ असा की, आपला संपूर्ण गोर बंजारा समाज अशिक्षित, अडाणी, अज्ञानी, अंधश्रद्ध आहे. ‘काळे माथेर’ म्हणजे अंधार पडलेल्या डोक्याचे, बुद्धीहीन लोक आहोत. तेव्हा सत्यकामच हाथी घ्या व ते यशस्वी करा. पार पाडा. एवढेच नव्हे तर वाईट संगत टाळून, भल्या, चांगल्या माणसांशी संबंध वाढवा. असे केल्याने तुची फसगत होणार नाही. पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही, असे ते समजवून सांगत होते.

याशिवाय ते म्हणत की, ‘छाती करीय, ओन साथ मळीय, हाय नाकीय ओर ढेर पड नाय’ अर्थ जो हिम्मत करुन कार्य हाती घेईल, त्याला यश आवश्य मिळेल. पण जो हिंमत सोडून, घरी बसून राहिल, त्याचा सर्वनाश होईल, घरी बसून राहिल, त्याचा सर्वनाश होईल, करीता घाबरून, हिंमत सोडून, भिऊन कोणतेही काम हाती घेऊ नका. पूर्ण हिंमतीने काम करा. यश निश्चितच मिळत असते. हिमत करणार्यांचीच किंमत होत असते. असा उपदेश करुन ते भटक्या समाजाला धीर व हिंमत देत होते. संत सेवालाल महाराजांनी समाजाला जागृत करण्याचे काम तर केलेच पण समाजातील लोकांना सुद्धा त्यांनी स्त्री-पुरुषांना जागृत ठेवण्याचे आवाहन गोरभाषेत केले.

ते म्हणत, ‘मारे गोरभाई, नगारा थाळीरे घोरेरि जो’ माझ्या गोर बांधवांनो, नगारा म्हणजे पुरुष व थाळी म्हणजे स्त्री, बाई या दोन्हींना, जोडीला सतत जागृत, सावध ठेवत राहा.

माध्यमाने प्रबोधनाचे जागृतीचे काम चालू ठेवा. असा ही या सुभाषिताचा अर्थ होते. त्या काळात नगारा-थाळी शिवाय दूसरे कोणतेही प्रचार प्रसिद्धीचे साधन नव्हते. म्हणून नगारा थाळीचा उपयोग करा असे आवाहन त्यांनी केलेले आहे. देवाच्या भजन किर्तनासाठी त्यांनी नगारा थाळीचा उपयोग करा म्हणून सांगितलेले नसून समाजाला संघटीत, जागृत, सावध करण्यासाठी सांगितले आहे. ‘भजे-पूजा वेळ घालणेपेक्षा करणी करन दखाळो’ असे उपदेश देणारे संत सेवालाल नगारा थाळी घेऊन भजन किर्तन करा असे विसंगत मार्गदर्शन समाजाला करणार नाही. संत सेवालाल महाराज बुद्धाप्रमाणेच अनईoशरवादी नास्तिक होते. म्हणूनच त्यांनी काल्पनिक देवाच्या सर्व कर्मकांडाचा विरोध करताना ‘भजे-पूजे येळ घालेपेक्षा, कर्तव्य करुन दाखवा असे ठासून सांगितले आहे. पण आज सेवालाल महाराजांचे सर्वचे सर्व अनुयायी भजन, किर्तन,व्रत-उपवास, वार्या, दिंडय़ा, तीर्थयात्रा, दर्शन आणि अर्थहीन भजन-किर्तन-नामस्मरणाचा जयघोष करीत मोला वेळ, पैसा, शक्ती, वाया घालवित आहेत. संत सेवालाल महाराजांनी देऊळ बांधा म्हणून देखील सांगितलेले नाही. पण आज सेवालाल महाराजांचे चेलेचपाटे आणि चमचे जागोजागी भव्य मंदिरे बांधत असून मंदिराला खोटय़ा घालत आहेत. चकरा मारीत आहे. हेच मंदिर बांधणारे लोक भ्रष्टाचार मद्यप्राशन, बोकडे व कोंबडय़ाचा बळी देऊन संत सेवालाल महाराजांच्या उपदेशाचा अपमान करीत आहेत. मंदिर बांधकामासाठी अनेक गैर वसूली मार्गाचा सुद्धा अवलंब केला जातो. मधले दलाल देखील अपहार करतात. आज कोणत्याही गरीब मागासलेल्या समाजाला, गरीब मुला- मूलींच्या शिक्षणासाठी वस्तीगृहाची, त्यांच्या लग्नाच्या खर्चाची, त्यांच्या आजारवरील खर्चाच्या तरतूदीची गरज आहे. मंगल कार्यालय, धर्मशाळा, वाचनालय, व्यायामाशाळा, क्रिडामैदान, सभागृह, वैगरे अनेक बाबींची गरज असताना निरुपयोगी, लूटारु, गैरव्यवहारी मंदिरात गुंतवणूक करणे अविचारीपणाचे लक्षण आहे. शिवाय कोणत्याही देवाने मंदिराची मागणी केलेली नसताना स्वार्थी, अंधश्रद्ध, अडाणी, व्यवसायी लोकांच्या आग्रहाखातर मंदिरबाधणे देखील अविवेकीपणाच मानावा लागेल. संत सेवालाल महाराज अंधश्रद्धा आणि शोषणाच्या विरुद्ध होते. म्हणूनच त्यांनी अनुयायांना सांगितले की, ‘म धूजेवाळो, पूजेवाळो अन खेलेवाळो माहेरो संत छेनी’ मी अंगात देव आणणारा, मंदिरातील निर्जीव मूर्तीची पूजा प्रार्थना करणारा, मुंडकी हलवून, घू वून, फिरवून होरा, भविष्य सांगणारा संत नाही. मी केवळ गोरगरीबांची सेवा करणारा व समाज उपयोगी काम करणारा मार्गदर्शन करणारा संत अथवा समाजसुधारक आहे. समाजातील शोषणाविरुद्ध आवाज उठविताना त्यांनी अनुयायांना बजावले की,

‘गोर गरीबेनजो दांडन खाय, ओरी सात पीढ़ी नकरमे जाय। वंशपर ओरे कोई कोणीर, पायरीरो भाटा बन जाय।

सामान्यजन व अनुयायी हे शोषणाच्या मार्गापासून दूर रहावेत,म्हणून त्यांनी उपदेश केला की, जो गरीब दुबळ्यांना त्रास देईल, त्यांनी पुढील पिढी दुःख भोगेल, त्यांना संतती होणार नाही. तो पाया खालचा दगड बनून राहील. प्रतिकात्मक अर्थ असा की, जो गरीबाची लुट करील, शोषण करील, अडवणूक करील त्यांच्या पुढील पीढील ा लोक सोईची वागणूक देणार नाही. दगडाचा ज्याप्रमाणे निर्दयपणे वापर केला जातो. तशी निर्दय वागणूक त्यांना लोक देतील. या शिवाय, जो चोरी, व्याभिचार, मद्यप्राशन करील, हिंसा करील, खोटे बोलेल, त्यांना सरकार शिक्षा देईल त्यांचे कोणीही संरक्षण करणार नाही. करिता गोर बंधू-भगीनींनो तुम्ही या सर्व दुष्कृत्यापासून दूर रहा. वरील चूका करुन दुःख नका भोगू या बाबत गोर भाषेतील त्यांचे बोल खालील प्रमाणे आहे.

“करीय चोरी, खाय कोरी, धरे मुंढांग रीय एकच मोरी। सरकारी डंडा पडीय, हिंडीय ओन डोरी डोरी।

दुष्कर्म करणार्याची दोषातून सुटका नसतेच. म्हणून दुष्कर्म करुन विनाकरण हालअपेष्टा भोगू नका. पण आपण आज पाहत आहोत की, देवभक्त गण काल्पनिक निर्जीत दगडीमूर्तीची मंदिरात जाऊन पूजा प्रार्थना करतात. पण वरील वाईट काम करण्याचे मात्र सोडत नाही. दुष्कर्म, दुर्व्यसन, दुर्व्यवहारातून सुटका हीच खरी देवभक्ति किंवा सेवा आहे. पण अंधश्रद्ध माणूस आपल्या अंतःकरणातील देवाला विसरून मंदिरात भटकत आहेत. ही एक शोकांतिकाच आहे.

संत सेवालाल महाराज एका अल्पसांख्य भटक्या समाजाचा नेता होता. पण जातीवादी, विषमतावादी नव्हता. तो समतेचा प्रखर समर्थक होत. गोर समाजाला उपदेश अथवा मार्गदर्शन करताना तो गोर भाषेत उपदेश करी की,

‘गोर कोई दोंइरो कल्याण व, जीवजंतु अन किडीमकोडारो कल्याण व खुटा मुंगरीन सुद्धा न्याय मळ, ’ अर्थ गोर बंजारा समाजाच्या आणि कोर म्हणजे गोरेतर लोकांचा सुद्धा कल्याण, समृद्धी, विकास, भल होवो. गोर बंजारा व गोरेतर समाजाशिवाय जीवजंतु, मुंगी-मुंगळा, आणि निर्जीव खुटा-मुंगरीला सुद्धा न्याय मिळो, कोणावरही अन्याय अत्याचार ना घडो. अशी त्यांची समतावादी दृष्टी होती. अन्यायवृत्ती विरुद्ध लढा देण्याची लढावू वृत्ती सुद्धा संत सेवालालकडे होती. प्रसंग निर्माण झाल्याबरोबर संत सेवालालनी त्यांच्या अनुयायींना व लदेणीवाल्या समव्यवसायी समाज बांधवांना बरोबर घेऊन हैद्रबादच्या निजामाच्या शेरबहादूर या नवाबाच्या व दिल्लीचा बादशाह नवाब गुलाबखाँ विरुद्ध लढा देऊन त्यांना नमविले व त्यांच्या कडून काही सवलती व मागण्या मंजुर करुन घेतल्या. या वरुन तो अन्यायविरुद्ध लढणारा एक बहादूर लढावू संत सुद्धा होता हे दिसून येते. या दोन्ही लढाईत त्यांची जीव व वित्तहानी सुद्धा झाली. पण त्यांनी होत असलेला अन्याय सहन नाही केला. यावरुन तो एक स्वाभिमानी संत होता हे देखील सिद्ध होते.

संत सेवालाल महराज एक अभ्यासूवृत्तीचे आणि दूरदर्शी संत होते. सध्याचा काळ कसा आहे आणि भविष्यकाळ कसा येणार आहे, याचं अचूक अंदाज त्यांनी त्या काळात प्रबोधन करताना व्यक्त केलेले आहे. त्यांच्या या अचूक आणि तंतोतंत कथानावरून ते अभ्यासू व दूरदर्शी तर होतेच, पण महान चिंतक होते. हे सुद्धा कळून येते, भावी काळात भारतीय कुटूंबाची, पशु,अन्नपाणी, आजार, स्त्रीसुधारणा, धार्मिक कर्मकांड, वगैरेची अवस्था कशी होणार याचं चित्रण त्यांनी त्यांच्या प्रबोधन केलेल्या सुभाषिताद्वारे हुबेहूब केलेलं आहे. भावी काळाचा चित्र रंगविणारा त्या काळात सेवालाल महाराजांना वगळून दूसरा कोणीहीं नसावा. ही एक गोर समाजासाठी अभिमानाची व विचार करण्यासारखी बाबा आहे. भविष्याचा वेध घेणारं त्यांचं सुभाषित खालील प्रमाणे आहे.

ई सतयुग छ, येरेबाद कलीयुग आय।

कलीयुगमे कल्लोळ चालीय, मायेन बेटा भारी विय।

रपिया कटोरे पाणी वक जाय, रपियार तेरं चना वक जाय।

वाणवाणावर दुःख आय, घर घण वैदू आय।

वैदू दखेर परिक्षा करिये, ओन दख लाभ कोणी।

रंडि रो रानआय, सोनेर सिंग गौवा बक जाय।

गोवा धनेन चारों कोणी मळ, हाडकरी ढेर पड जाय।

रपिया लेन गल्ली गल्ली फरियं, ओन अन्न कोणी मळं।

बोलतू, बोलतू मनख्या मर जाय, घर घर भक्त वीयं।

गल्ली गल्ली नंगारा वाजलाय, घर घर नायक वीयं।

घर घर काळं शिरजाय, भाई-भाईर पट कोणी।

बापा बेटा रं, पट कोणी, मां बेटीरं पट कोणी।

सासु बोडी रो पटकोणी, धण्णी गोण्णीरों पट कोणी।

घरेघरे कल्लोळ चालीय, पापीरों साल रियं।

पापी घर रपीया रडी रडी हिंडीय, लाबे तांडेर

मलकेन गोरबंदा जाय।

मार गोरबंदा करीय छंद, घर घर नांदीय मुसळकंद।

वरील श्लोकात वर्णन केल्याप्रमाणेच तंतोतंत आजच्या सर्व घटना घटत आहेत. तेव्हा संत सेवाभाया खरोखर एक महान चिंतक व दूरदर्शी समाज सुधारक होते हे सर्वांना पटते. वरील श्लोकातील कथनाशिवाय संत सेवालालचे आणखीही काही बोल आहेत. त्या बोला प्रमाणे घटना घडून येण्याची शक्यता आहे. पण त्या घटना घडून येण्यासाठी सेवालालच्या अनुयायांना संघटीत होऊन येण्याची शक्यता आहे. पण त्या घटना घडून येण्यासाठी सेवालालच्या अनुयायांना संघटीत होऊन प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची नितांत आवश्यकता आहे.

ह्या घटना घडवून आणण्याची खरी जबाबदारी सामान्य जनाची नव्हे तर समाजातील समर्थ आणि शिक्षित वर्गाची आहे. पण शिक्षित वर्ग अतिशय उदासीन आणि स्वकेंद्रीत असल्यामुळे संत सेवालालचे स्वप्न साकार होण्याचे चिन्ह दिसून लागलेले नाही. कारण हा शिक्षित वर्ग संत सेवालालच्या विचारतत्वानुसार वागत नसून हिंदू धर्मीय साधू-संताच्या नादी लागून आपली बुद्धी त्याच्याकडे गहाण ठेवत आहे. जो पर्यंत शिक्षित व सधन समाज हिंदू संस्कृती, सभ्यता व धार्मिक कर्मकांडाचा त्याग करीत नाही, तो पर्यंत ते संत सेवालाल महाराजांच्या स्वप्नांची पायमल्ली, अवहेलना, आणि अपनाम करीत आहे. असे विचारवंतांनी समजावे. संत सेवालाल महाराज हे अनईoशर वादी, नास्तिक, भ.बुद्ध, संत कबीर, म. फूले, छ. शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, रामास्वामी पेरियार, गाडगे महाराज यांच्या विचारांचे वाहक होते. संत कबीर ते संत गाडगे महाराजांपर्यंतचे सर्व संत समाज सुधारक हे भ. बुद्धांच्या धम्म म्हणजे नीति, तत्त्वाचे वाहक होते. संत सेवालालनी ह्या नीति तत्त्वाच्या प्रचार-प्रसार या संत समाज सुधारकांच्या पूर्वीच अठराव्या शतकात गोर समाजात केला. पण गोर बंजारा समाजाला त्यांच्या विचार तत्त्वाची वास्तव्य जाणीव नाही, ही दुःखाची बाबा आहे. त्यांचे अनुयायी, भक्त, त्यांच्या नावाने पोट भरणारे त्यांचे पुजारी हे सर्व मात्र त्याचे बुद्धीप्रामाण्यवादी, वैज्ञानिक, तर्कशुद्ध विचारांवर अमंलबजावणी न करता सेवालाल महाराजाच्या नावाने अनेक चमत्कार जोडून त्यांना चमत्कारी सिद्ध करण्याचा आणि लोकांना अंधश्रद्ध बनविण्याचा सतत रात्रं- दिवस प्रयत्न चालविलेला आहे.

या सर्व चमचांना समजून तरी कोणी व कसे द्यावे हा एक चर्चेचा विषय बनलेला आहे. सवंगडय़ांना भाकर चोरून नेल्यानंतर. मातीचा शिरा बनवून सर्वांना खाऊ घातला., देवींनी दिलेल्या मळाच्या गोळीपासून माता धर्मणीला गर्भ धारणा होऊन संत सेवालालचा जन्म झाला, सेवालालनी आपल्या शक्तिसामर्थ्यांनी चिंगर्या मुलाची चिंगरी या मूलीमध्ये रुपांतर केले. झाडाच्या पानाचा नगारा व दगडाचा टाळ बनवून जागृती केली, एक मोराला वाचविल्यामुळे मोरांनी दगडांखाली धन दाखविले. मोर मारायला येणार्या शिकारींना एका दगडाखालून पाणी काढून त्यांची तहाण भागविली, एक निःसंतान पाटलाला आशिर्वाद देऊन त्याला संतती दिली, सेवाभायनी देवीचे न ऐकल्यामुळे देवीने गायी व भाऊ यांना मारले व पुन्हा जिवंत केले, शापामूळे एका माणसाचा तोंड धूताना डोळा गळून पडला, सेवाभायने आपल्या सामर्थ्यबळावर एका भोपळ्यातून लागेल तेवढे गहू पाडले. एका विधवेला अष्टपूत्रभवचा आशिर्वाद दिल्यामुळे तिचा पती जिवंत झाला, विषारी मिठाई ध्ये अंगारा टाकून खाल्यामुळे विषबाधा झाली नाही, पंचवटीला जाऊन प्रत्यक्ष रामाचे दर्शन सेवांनी घेकले, रुईगडला त्यांच्या डोली उचलली गेली नाही, सेवालालनं अमक्या अमक्याच्या नावाने तीन चार अवतार घेतले असे एक ना अनेक चमत्कार लोकांनी, लेखकांनी त्यांच्या नावे दाखविलेले आहेत. अशा सर्व लोकांना अविचारी, अविवेकी,बुद्धीहीन, अंधश्रद्ध समजावे की, बिनामेंदूचे समजावे हे विचारी लोकांनी ठरवावे. आशा प्रकारचा चमत्काराचा प्रचार-प्रचार ही सेवालालची भक्ती नव्हे तर हा अप्रचार आहे. त्यांची बदनामी आणि अपमान आहे. ‘सौ सुनार की, एक लोहार की’ अशी हिंदीत म्हण आहे. या म्हणीप्रमाणे संत सेवाला महाराजांनी बारीक सारीक अनेक कथा, गोष्टी, श्लोक, दोहे, भजन वगैरेच्या आधारेच ज्ञानाचा खजिना त्यांच्या भक्तांना अर्पण केलेला आहे. ‘सौतार वळख सौता कर लो। आपण पाल आपणच ठोक लो। कोई केणी भजो मत, कोई केणी पूजो मत। कोई केती कमी छेनी। भजे-पूजे येळा घाले पेक्षा, करणी करन दखाळो। अर्थ मनुष्य पुरुषार्थी आहे. पुरुषार्थहीन बनून राहू नका, देवादेवीच्या भरवश्यावर राहण्यापेक्षा, मनगाटाच्या भरवशावर जीवन जागा. आपले सर्व काम आपणच स्वतः करुन घेत जा. कोणी कोणापेक्षा लहान मोठा नाही. यास्तव कोणी कोणाची पूजा-प्रार्थना करायची नाही. पूजा, प्रार्थना वगैरचा त्याग करो, कर्तव्य पार पाडा, कर्म करुन दाखवा. याच शिकवणुकीमुळे सेवालाल कर्मकांडी, ईoशरवादी, धर्मवादी, जातीयवादी नसून ते एक सच्चे अनईश्वरवादी, नास्तिक, इहवादी होते म्हणूनच सर्वांनी अनईoशर वादी बनने, कर्मकांडाचा त्याग करणे ही संत सेवालाल व संतसेवालाल अनुयायांची खरी भक्ती व पूजा आहे. ।

जय भारत, जय जगत।
लेखक : ग.ह. राठोड (कचनेरकर) / औरंगाबाद

2 Comments
  1. Avatar
  2. Avatar

Leave a Reply