पिंपळगांव कमानी ग्रामपंचायत निवडणूकीत सौ.अनुसया अशोकराव चव्हाण यांची बिनविरोध निवड.

(वार्ताहर प्रतिनिधी)-ः पहूर,ता.जामनेर येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी(तांडा) या ग्रामपंचायत च्या पंचवार्षिक निवडणूकीत बंजारा समाजाचे युवा कार्यकर्ते,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे मुंबई विभागीय अध्यक्ष,समाजसेवक-अशोकराव चव्हाण यांच्या पत्नी-सौ.अनुसया चव्हाण यांची बिनविरोध निवडणूकीसाठी उमेदवारी दाखल झालेली होती.
शेवटी,आज दि.४’जानेवारी रोजी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने सौ.अनुसया चव्हाण यांच्या विरोधात वार्ड क्रमांक-२ मधे एकही उमेदवारी अर्ज दाखल नव्हता.त्यामुळे,सौ.अनुसया चव्हाण यांची आज बिनविरोध निवड झाली.सौ.अनुसया चव्हाण या जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका तसेच जय सेवालाल महिला बचत गटाच्या अध्यक्षा असुन आजपर्यंत त्यांनी त्यांचे पती,बंजारा समाजाचे युवा समाजसेवक-अशोकराव चव्हाण यांच्या खांद्याला खांदा देऊन समाजकार्यामधे मा.अशोकराव चव्हाण यांच्या सहकार्याने अनेक समाजकार्य करीत असतात.तसेच,त्यांनी काही काळ ‘आशा स्वयंसेविका’ या पदावर देखील चांगली कामगिरी केलेली आहे.
समाजसेवक-अशोकराव अशोकराव चव्हाण यांचे सुरु असलेले समाजकार्य व गावातील तसेच विविध क्षेत्रातील समाजबांधवांशी असलेले संबंध आणि सौ.अनुसया चव्हाण यांनी केलेल्या कार्याची ओळख व पोहच म्हणून आज त्यांची या निवडणूकीत बिनविरोध निवड झाली आहे.


सौ.अनुसया अशोकराव चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याने-राज्याचे जलसंधारण मंत्री तथा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री-मा.ना.गुलाबरावजी पाटील,मा.ना.संजयभाऊ राठोड(वनमंत्री,महा.राज्य),मा.ना.अब्दुलजी सत्तारसाहेब(महसूल राज्यमंत्री,महा.राज्य),जामनेर तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री-आ.गिरीषभाऊ महाजन,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते-मा.संजयदादा गरुड,शिवसेना जिल्हाप्रमुख-मा.आ.चंद्रकांत पाटीलसाहेब,माजी खासदार तथा भटक्या-विमुक्त व ओबिसी समाजाचे राष्ट्रीय नेते मा.आ.हरिभाऊ राठोड,शिवसेना उपजिल्हा प्रमुख-मा.डॉ.मनोहरदादा पाटील,मा.जि.प.सदस्य-मा.प्रदिपभाऊ लोढा,मा.श्यामभाऊ सावळे(उपसरपंच-पहूर पेठ),दलितमित्र-मा.मोरसिंगभाऊ राठोड,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य-मा.मुलचंदजी नाईक,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष-मा.आत्मारामभाऊ जाधव,राष्ट्रीय उपाध्यक्ष-मा.मदनभाऊ जाधव,राष्ट्रीय सरचिटणीस-मा.अनिलभाऊ पवार,राष्ट्रीय खजिनदार-मा.राजेशजी नाईक, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक-मा.रतन चव्हाण(मा.सरपंच),मा.त्र्यंबक चव्हाण(मा.पो.पा.),मा.इंदलभाऊ चव्हाण,मा.काळू राठोड(मा.ग्रा.पं.सदस्य),मा.मोरसिंग राठोड मा.हिरामण चव्हाण,मा.राजु चव्हाण,मा.लखिचंद राठोड,मा.लाला राठोड,मा.भगवान चव्हाण,तुकाराम चव्हाण,ज्ञानेश्वर चव्हाण,मा.योगेशभाऊ राठोड(मा.ग्रा.पं.सदस्य),मा.आप्पा राठोड,मा.विठ्ठल राठोड,मा.परशुराम राठोड,मा.गणेशभाऊ राठोड,मा.संदिप राठोड,बबलू राठोड,मा.बळीराम चव्हाण,मा.विठ्ठल चव्हाण,मा.विकास चव्हाण,मा.कैलास चव्हाण,मा.गोविंद चव्हाण,यांच्यासह तालुक्यातील अनेक सामाजिक राजकीय,सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.


जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था-पिंपळगांव कमानी(तांडा),ता.जामनेर.