सोशल आर्कीटेक्चर : किसनराव राठोड – ✍एकनाथ पवार,नागपूर

???? वाढदिवसाचे अभिष्टचिंतन…!

????????????????????????????????????????

*सोशल आर्कीटेक्चर : किसनराव राठोड*

        ✍एकनाथ पवार,नागपूर

Dt 14:8/Mon

11Am:
     विदर्भाच्या मातीत अनेकानी आपल्या सामाजीक बांधिलकीतून गौरवान्वीत केले आहे.

 विदर्भाच्या गौरवात सेवाग्राम,तपोवन,गूरूकुंज, आनदंसागर,आनंदवन, दीक्षाभुमी,ड्रॅगनपॅलेस, सेवाभुमी,उमरी-पोहरागड  अशी अनेक नावे जोडली जातात.

परंतु *सामाजीक बांधिलकीच्या ध्यासातुन* 

*विदर्भाच्या गौरवात जोडला गेलेला एक* *मानाचा शिरपेच म्हणजे भक्तीधाम होय.*

या भक्तीधामावरून गोरधर्मपिठाची संरचना आखणारे सोशल आर्कीटेक्चर म्हणजे समाजसेवक किसनराव राठोड होय.

समाजाला गौरव वाटावा,असा त्यांचा गतिशील व रचनात्मक कार्य समाजातील धनाढ्यासह उच्चस्थानाच्या मंडळीना खुप काही सांगणारा आहे

लोधीवली प्रोजेक्ट,सिलींक प्रोजेक्ट असो की पुण्यातील असो हे स्वातंत्र्यसेनानी विमूक्त बंजारासाठी प्रेरणादीप म्हटले तरी,काही वावगे ठरणार नाही,

*गावकुसाबाहेर फेकणार्या व्यवस्थेलाही ती सामर्थता जणु एक चपराकच आहे* पुण्यात गरजु विद्यार्थीसाठी उभी केलेली वास्तू असो अथवा अथणी आणि उमरी-पोहरागड येथिल सोयी-सुविधेनी सज्ज असलेली भक्तनिवास असो.आणि गरजूना दिली जाणारी मदत या सामाजीक बांधिलकीच्या  बाबी समाजासाठी हितकारीच आहे.

 यामागे त्यांचा परिश्रम आणि निष्ठा दखलपात्र आहे.शिवाय बंधुप्रेम आणि मातृभक्ती ही तितकीच बोध घेणारी आहे.

किसनराव राठोडाच्या या सह्याद्रीरुपी वलयात त्यांचे भ्राता ॲड पंडितभाऊ यांचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल.शांत स्मित हास्यानी सर्व जबाबदारी पेलणारा हा दुर्मिळ भ्राता.

येथे *महानायक वसंतरावराजे नाईकांच्या  बंधुप्रेमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.*

    धर्मपिठ भक्तीधाम म्हणजे विदर्भासाठीच नव्हे तर,दक्षिण-मध्य भारतातील स्वातंत्र्यसेनानी विमूक्त बंजारासाठी एक उभरता आशेचा किरण.ऐतिहासिक क्षात्रतेज संस्कृतीच स्वप्न फुलवणारा जणु नवोदित बेट.आणि नुसतं स्वप्न नव्हे तर प्रत्यक्षात ते साकारले जावीत अशी समाज आज अपेक्षाही करतो आहे.महंत जितेंद्र महाराजाच्या सेवेतुन प्रसन्नमय वातावरण आज बघायला मिळत आहे.

*भक्तीधाम म्हणजे केवळ सळोईमंच किंवा अन्नदान,स्वच्छतामंच पुरता मर्यादित राहु नये.*

भक्ताच्या शारिरीक विसाव्याची जशी सुसज्ज व्यवस्था होत आहे, त्याप्रमाणेच माझ्या भोळ्याभाबड्या वैचारिकतेपासुन दुरावलेल्या तांड्यासाठी  बौद्धीक खुराकाची,काळानुसार नव्या विचाराच्या मैफीलीची जर व्यवस्था झाली तर निश्चीतच धर्मपीठ भक्तीधाम म्हणजे *बंजाराची आधुनिक तक्षशिला* म्हणून पुढे येईल.जेथे चाणक्यचाही अन् क्षत्रियाचा क्षात्रतेज ही नव्याप्रतिरुपात समाजाला स्वाभिमान आणि प्रतिष्ठाही बहाल करणारा असेल.परंतु तशा पद्धतीची  सैद्घांतीक बांधणीचे आव्हान देखिल आहे.

धर्मपीठ किंवा भक्तीधाम म्हणजे एक धर्मांधतेचे केंद्र,किंवा समाजाला खाईत लोटणारा केंद्र असे बिरुदावली लावुन 

किसनराव राठोडावर टीकेची झोड उठवणारे अनेक ताकदिने पुढेही आलेत,पत्रकेही छापलीत.

परंतु त्याच्या सामाजीक बांधिलकीच्या  *किसनलिलामुळे* मात्र सर्व गडपही झाली.विरोध हा विचाराचा व्हावा,न की  आपल्या स्वार्थांधतेचा व्हावा.

काम करणार्या माणसाला अडथळा आणणारी कर्कसंस्कृती तशी भारताला काही नवीन नाही.परंतु *न्यायवंचित विमूक्त बंजारासाठी मात्र ही कर्कसंस्कृती अतिशय घातक आहे.*

न्यायवंचित बंजारा समाजाच्या पुनर्रूत्थानासाठी एक ग्लोबल व्हीजन घेऊन  *तांडेसामू चालो*सारखा लोकप्रिय लोकोत्तर अभियान कार्यरत आहे,अशा अनेक समर्पीत समुच्चयाचा जर मोटबांधणी धर्मपीठावरून झाली,तर निश्चीतच *गोर केसुलानायी मोरीयं*.

        जगाला अनादी काळापासुन *वसुधैव कुटुंबकम्* ची अर्थात *सेनं सायी हेस* ही शिकवण देणारी क्षात्रतेज संस्कृतीच्या ग्लोब्लायजेशन साठी *बंजारा साहित्य व संस्कृती अकादमी* ची भक्कम पायाभरणी होणे ही काळाची गरज आहे.

*गोरसंस्कृती,गोरवैभव आणि गोरप्रभाव या त्रिसेवाची उभारणी समाजसेवक किसनराव राठोड यांनी केल्यास नक्कीच भक्तीधाम येणार्या कालखंडात गोरप्रतिष्ठेचं अधिष्ठान बनल्या खेरीज राहणार नाही.*

समाजात आज अनेक धनाढ्य आहे,परंतु त्याला किसन रावासारखा काळीज हवं.

 समाजाच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या गोरप्रतिष्ठेसाठी उदंड आयुष्य लाभो. गोरमाटी मनाचा *सेवाध्वज* अभिमानाने देशाच्या सर्व पटलावर फडकवीण्यासाठी सेवाबापू,याडी सामकी अशीच शुभाशिष देत राहो.

या शुभकामनासह….!
   – *अ.भा.मराठी साहित्य परिषद,*

कार्याध्यक्ष, अमरावती व नागपूर विभाग

????9850131368        e-mail:[email protected] gmail.com.

***************************

Banjara News
www.goarbanjara.com

गजानन डी. राठोड

प्रमुख प्रतिनिधि – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल 

9619401377

Leave a Reply