भटक्या विमुक्तांनी असा देश घडविला – Prof. Motiraj Rathod

भटक्या भुमिपुत्रांनी तन मन धन घामानी गुण कौशल्यानी एकेकाळी वैभवशाली सिंधु संस्कृति निर्माण केली. त्याचे वंशज आज भटके गुन्हेगार जमाती अश्या कलंकित अपमानीत नावानी ओळखली जात आहेत. देश स्वतंत्र होऊन आज तीन पीढ्य़ा झाल्या तरी यांच्या नावामागील कलंक दुर करु शकलो नाही. हे भारत देशाचे दुर्देव आहे कारण या देशात यांचा जन्म झाला आहे. त्यांच्या कला गुणांनी भारत देश कसा नावा रुपाला आला ते पाहु. ज्यांचा साक्षीदार इतिहास आहे दगडाला आकार देणारा – पाथरवट गाडी वडार माती वडारांच्या छन्नी हातोड्य़ातुन अजिंठा वेरुळ जग प्रसिध्द शिल्प निर्माण झाली. त्यांच्या छन्नी हातोड्य़ांनी छत्तीस कोटी निर्गुण देवाला सगुण त्यांनी रुपडे दिले. दगडात जीव ओतला तर पाथरवटानी धरतीच्या पोटातुन दगड काढुन बेलदार गवंडीनी देशातील गगणचुंबी इमारती घामानी ऊभ्या केल्या मोठ मोठी राजमार्ग तयार करुन धरणे बांधुन नद्या आडवुन देश सुजलाम सुफलाम केला.

जमीनीच्या पोटातील दगड काढुन त्याच दगडाला आकार देऊ शकतो. त्याचा सर्व प्रथम शोध वडार जमातीनी लावला ज्याचे नावाच गाडी वडार आहे त्यांनी सर्व प्रथम दगडाची चाक करुन देश गतिमान केला. माती वडारानी मातीसी बेईानी कधी केली नाही तो खरा भुमिपुत्र आहे. लोहार ज्यांचे नाव आहे त्या लोहारनी लेंखडाच्या शोध लावला, त्या लोखंडाला ऐरणीवर तापवुन शेती ऊपयोगी गृह ऊपयोगी वस्तु करण्यांचे तंत्र जगाला लोहार घीसाडी जमातीने दिले तर विभिन्न अंगरक्षक शत्रे ढाल तलवारी, भाले बंदुकाच्या नळ्या घीसाड्य़ानी बनविल्या त्यांच्या शध त्रिच्या धारने मोगलानी पानी पाजले तर त्यांच्या खंजीरानी अफझल खानचा खातमा केला. या सगळ्या इतिहासाचे साक्षीदार भटके विमुक्त आहेत. त्यांच्या परिश्रमानी गावगाढा त्यांनी ढकलित प्रगतिपथावर आणुन सोडला आहे.

कैकाडी जमातीनी गावगड्य़ाला टोपल्या कणगी दुरुडी झाडू तयार करुन दिली. तरी त्याच्या श्रमाला किंमत न देता आलुतेदार बलुतेदार म्हणून सुगी आल्यावर शेतकर्याकडे जाऊन अन्नधान्य देइल ते घेतले. लमाण – बंजारांनी तर या देशातील अति प्राचीन जमात ज्या जमातीचा इतिहास सिंधुघाटी संस्कृतिचा इतिहास आहे. बैलाच्या पाठीवर सामान लादुन दुष्काळाच्या काळात – देश विदेशातुन अन्नधान्य आणुन दुष्काळात भारतीयांना पोसले आहे. तर या देशातील रेल्वे मार्ग राजमार्ग जे आज तयार झाले आहेत ते प्रसिध्द लमाण मार्गावरुनच शॉटकट लमाण मार्ग ही देशाला बंजारांनी दिलेली देणगीच आहे. तर जग प्रसिध्द अजिंठा लेण्याचा शोध सर्व प्रथम जंगलात राहणार्या लमाण पारो नावाच्या तरुणीनी लावला. जंगली प्राण्याची शिकार करुन शिकार युगापासुन आजपर्यंत वाघरी पारधी जमातीनी कित्येक पशु प्राण्याला पाळीव केले तर काहीची शिकार करुन मांसाहार ऊपलब्ध करुन दिला.

मोहाच्या फुलांणी दारुची शोध आदिवासी बंजारा भील्ल समाजानी लावला. जंगलातील जडी बुटीचा अभ्यास करुन वैदु चितोडीया लोहार समाजानी आपल्या आरोग्याची काळजी घेतली आणि वनस्पती पासुन औषधी करण्यांचे तंत्र या आयुर्वेदिक देशाला आदिवासी जमातीने दिले. गोपाळ समाजानी गाई म्हैसी द्वारे दुध तुप धुपत्याची देशवासीयांची सोय केली आहे. हिन्दुच्या झोपलेल्या देवाला जागवून दिवटी (प्रकाश) गेंधळी समाजानी देवाला ऊजेडात आणले. नंदी बैलवाले माकडवाले ऊंटवाले अस्वलवाले केंचीकोरवा पामलोर डेंबारी बहुरुपी खेड्य़ा पाड्य़ातील जनतेची प्राण्याची खेळ करुन करमणुक केली. पशु प्राण्यांनी शिकविण्याची कला भाषा या जमातीनी देशाला दिली. बेरड रामोशी समाजानी गावाची शेती गावाच्या वाड्य़ा हवेलीच्या स्वरंक्षण करण्याची जबाबदारी पार पाडली इतकेच नाही तर मेल्यानंतर सुध्दा माणसाला मुठमाती देण्याचे काम मसनजोगी समाजाने केले आहे. पोटापाण्याची घरादाराची आर्थिक धार्मीक सांस्कृतिक कला शिल्प कला, संगित कला, चित्रकला इ. गरजा पूर्ण भटक्या विमुक्तांनी पूर्ण केल्या आहेत.

या भारत देशाला बहुरुपी बहुढंगी संस्कृति भटक्या विमुक्तांनी दिली आहे. प्रसंगी हातात तलवार घेऊन, भटके विमुक्त देशभक्तांनी शत्रुला पळो की सळो करुन सोडले आहे. अश्या जमातीना देशानी गुन्हेगार भटके ठरविले आहे. आजची परिस्थिती ः विमुक्त भटक्या जमातीना आजही गुन्हेगार जमाती म्हणून पोलीस खाते वागणूक देते कुठही चोरी झाली तरी आज ही गुन्हेगार जमातीच्या कुटूंबांना संशयित म्हणून पोलीस ताब्यात घेते. महाराष्ट्रातील पारधी जमातीची पाहणी केल्यानंतर असे दिसून येइल की महाराष्ट्रातील तुरुंगाची पाहणी केल्यास जवळपास 25 टक्के माजी गुन्हेगार जमातीचे लोक संशयित म्हणून जेलमध्ये सडत आहेत. एक तर वकीलाचा खर्च त्यात पुन्हा जामीन खर्च हे करु शकत नाहीत. जात गुन्हेगार म्हणून जेलमध्ये केंडल्या गेले आहेत. दुसरीकडे जात गुन्हेगार समजुन ब्रिटीश काळात पो.पाटील यांना जसे गुन्हेगार समजुन चोरी करणार्यास प्रोत्साहन देत असत.

त्याच प्रमाणे आज फासे पारधी वाघरी खरे सोने सांगुन खोटे सोने देऊन (ड्राफ) फसवितात त्यात पोलीसाच्या खबर्याचा मोठा सहभाग आहे. एका प्रकारे पुन्हा गुन्हेगार जमातीना बदनाम करण्यांचे काम चालु आहे. त्यात सामान्य पारधी सोनार खबरे आपलं नाव घेतील काय ? म्हणून भयभित जीवन जगत आहेत. महाराष्ट्रात आठवड्य़ात एक तर घटना वर्त ान पत्रात येते. पोलीस 420 चे कलम न लावता डाक्याची केसमध्ये त्यांना गोवतात. असी स्थिती माजी गुन्हेगार जमातीमध्ये दिसुन येते. दुसरीकडे कोणत्याही शहरात गेले तर मोकळ्या जागेवर बसस्टॅँन्ड रेल्वे स्टेशन शेजारी शेकडो पाल पडलेली दिसतात. त्यात बहुतेक भटक्यांना घरदार काहीना शेतीवाडी आहे. तरी वेगवेगळी बहुरुपे घेऊन एका प्रकारे भिक्षामागुन जीवंत जगतात या पालनिवासी लोकांचे शक्तीने पूर्नवसन शाशनानी करावे. त्याच बरोबर भिक्षा बंदीच्या कायद्यात पुन्हा दुरुस्ती करुन भटक्या लोकांना चिनी देशानी केलेल्या लेबर कस्टडी ऍक्ट प्रमाणे, यांना नागरी जीवन प्रवाहात आणण्याची संधी द्यावी. मानवी दृष्टिकोणातुन युरोपीयन देशानी जसे जिप्सी राचे पूर्नवसन केले. त्या धर्तीवर यांचे पुर्नवसन करावे. शाशन पशु प्राण्यांचे स्वरंक्षण करीत आहे. मानव प्राणी म्हणून यांचे सामाजिक जबाबदारी म्हणून पुर्नवसन करावे. –

प्रा. मोतीराज राठोड मो. 9423705977

Tag: Prof. Motiraj Rathod, Banjara, Bazigar, DNT, Lamani