१४ एप्रिल ला “राष्ट्रीय बंजारा कर्मचारी टायगर्स” या नवीन आघाडीची घोषणा – मा.आत्मारामजी जाधव

मुंबई, मुंबई न्यूज
देशातील वेगवेगळ्या क्षेत्रात नौकरी करणाञा सर्व बंजारा समाजातील कर्मचारी बांधवांना काम करत असतांना येणाञा अडीअडचणी बाबत “राष्ट्रीय बंजारा टायगर्स” या सामाजिक संघटनेने येत्या दि.१४ एप्रिल या दिवशी “राष्ट्रीय बंजारा कर्मचारी टायगर्स” आघाडी स्थापन करण्याची घोषणा RBT चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आत्मारामजी जाधव यांनी केली असुन,समाजातील कर्मचारी बंजारा बंधु-भगिनींनी या स्थापन करण्यात येणाञा आघाडीत सामिल होण्याचे आवाहन केले आहे.
          राष्ट्रीय बंजारा टायगर्स” ही सामाजिक संघटना महाराष्ट्र,आंध्र,कर्नाटक,गुजरात,उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश,राजस्थान,दमण-दीव, या ८ राज्यामधे समाजकार्य करीत अाहे.तसेच “राष्ट्रीय बंजारा कर्मचारी टायगर्स,महाराष्ट्र प्रदेश” च्या ‘कार्यकारिणी’ ची घोषणा करणार असल्याचे सांगितल
         RBT च्या बैठकीमध्ये मा.अशोक चव्हाण (महाराष्ट्र प्रदेश,सरचिटणीस),मा.अविनाश जाधव (राष्ट्रीय प्रवक्ता), मा गणपती राठोड (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष), मा.विरेंद्र राठोड (महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव) व कार्यकर्ते उपस्थित होते.
        समाजातील ज्या कर्मचारी बांधवाना “राष्ट्रीय बंजारा कर्मचारी टायगर्स” या संघटनेमध्ये कार्य करायची ईच्छा असेल त्यांनी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
मा. आत्माराम जाधव (राष्ट्रीय अध्यक्ष)
राष्ट्रीय बंजारा टायगर्स
संपर्क:- 09730622311
मा.अशोक चव्हाण. (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस)
संपर्क:- 09595423655
www.mumbainewssatish.blogspot.com

Leave a Reply