“31 आँगष्ट हा विमुक्तत स्वातंत्र्य दिन आझाद मैदान येथे साजरा करूया”


​31 ऑगस्ट 2016 आझाद मैदान मुंबई येथे  विमुक्तांचे स्वातंत्र दिवस  साजरे करूया

   जागे व्हा गोर बंधुनो,
“षंड होऊन थंड राहण्यापेक्षा

  अन्याया विरोधात गुंड होऊन बंड केलेले कधीही चांगलेच ”

      गोर माटी सळसळू दे धमन्यातील रक्त

आणि हो पुढे आपले अस्तित्व व् अस्मिता च्या रक्षणा साठी  आजाद मैदान येथे विमुक्त दिनी रासत्यावरची लढाई लड़न्या करिता

दाखव जे वेळोवेळी बोलतो ते शौर्य आहे.
     मुळात बंजारा हा समाज धर्मनिष्ठ, संस्कृती रक्षक असूनही 1857च्या स्वातंत्र्य युध्दानंतर सुद्धा या मंडळींना आवर घालण्यासाठी इंग्रजांनी 1871 साली जन्मजात गुन्हेगारी जमातीचा कायदा केला. आणि  भटके विमुक्त समाजाच्या माथी इंग्रजांनी जन्मजात गुन्हेगाराचा शिक्का मारला आणि काटेरी कुंपणाच्या गुन्हेगारी वसाहतीत डांबून ठेवले. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण या समाजाला स्वातंत्र मिळाले नाही.1949 साली अंत्रोळीकर समितीच्या अहवालानुसार 1952 साली भटके विमुक्तांची सेटलमेंन्टमधून (तारेचे कुंपण घातलेले कारागृह)मुक्ताची घोषणा झाली.असे सेटलमेंट्स जवळजवळ 50 फक्त महाराष्ट्रात होता. त्या नंतर तब्बल 13 वर्ष लागले मुक्ततेची पहाट यायला .1960 वर्ष वाट पहावे लागले पण आता नको.आता आपणच घडऊया समाजाला.महाराष्ट्रात आणि देशात भटके विमुक्त समाज आजही हीन-दीन अवस्थेत जगतो आहे. त्यांना आजही मुख्य प्रवाहात आणण्याची गरजआहे. त्याची जबाबदारी जे गोर नेते समाजात  हिरिरीने चळवळी मध्ये भाग घेतात त्यांची आहे  परंतु त्यांच्या पाठी समाज बांधवयाची

साथ असणे जरूरी किंबहुना आपले कर्तव्य

आहे .आज सरकारने असंविधानिक,बेजबाबदार पणे अनेक निर्बंध टाकून  समाजाची अक्षरशः दाणादाण उडवून दारिद्र्याच्या खाईत लोटून दिले ,क्रीम लेयर,1961 चा पुरावा, अशा जाचक अटी टाकून  विकासाच्या दिशेने जाण्याच्या मार्गात अनेक अडचणी  निर्माण केल्या ,सरकार ने भटके विमुक्त समाजाची  अवस्था पारतंत्रा पेक्षा हि

भयानक केली,  

  मला बुद्धिजीवी म्हणवणाऱ्या समाजातील

बांधवाना   प्रश्न आहे,.

 किती काळ तुम्ही अन्याय सहन करणार?

लढवय्या समाज ,ऐतिहासिक समाज, लखिशा

बाजाराचे वंशज,क्रांतिकारी सेवालाल महाराजाचे रक्त . हे रक्त दूषित झाले का? काय झालें ,कुठे गेला जोश? कुठे गेले शौर्य

 हे कि फक्त बोलण्या पुरतेच होते का ?आपण कधी झोपेतून जागे होऊ? किती दिवस दुसर्याचा द्वेष करू? कधी करू आपल्या

आया बहिणींचे संरक्षण ?कधी सोडवू माझ्या

दिन दुबळ्या समाजाचे प्रश्न? असे अनेक 

प्रश्न मना मध्ये चाबकाने फोडल्यावर घोड्याचने चौखूर  उधळून वेदनेने केलेल्या

किंचाळी सारखे  काहूर माजवत आहे.

   गोर बंधुनो वेळ अजूनही गेलेली नाही

जागे व्हा,मत्सर,द्वेष बाजूला करा व

31 ऑगस्ट 2016 या पवित्र व आपल्या

स्वातंत्र दिवशी आझाद मैदान येथे विमुक्त दिवस साजरा करण्या साठी गोर समाज म्हणून एकत्र या असे आवाहन व विनंती आहेे. याच दिवशी सरकार ने अस्वाशन देऊन हि

क्रीम लेयर ची अट शिथिल केली नाही त्या करिता  सरकार चा व समाजातील आमदार, मंत्री यांचा जाहीर निषेध करूया,परलंबीत 

मागण्यांचा निवेदन देऊ,आणि दाखवून देऊ

आमच्या पूर्वजांचे रक्त अजून धमण्यांमधून

सळसळते आहे, आम्ही पूर्वीही लाद्वैये होतो,

आजही आहे,उदया हि राहून आमच्या गती

करनवऱ्या च्या मानगुटी वर बसू

  फक्त आपले योगदान विसरू नका

षंडा सारखे चार भिंती त बसून काथ्याकूट

करू नका रस्त्या वर या आपल्या सारख्या

बुद्धिजीविकडून माझ्या गोर गरीब समाजास

खूप अपेक्षा आहे त्यांना निराश करू नका.

त्यांची हाय घेऊ नका .अन्यथा त्यांची हाय

आपणास लागल्या शिवाय राहणार नाही.

चला सज्ज होऊ या मा आमदार हरिभाऊ

राठोड यांच्या बरोबरीने जाऊ या.  आजााद

मैदान गाठुया. इतिहास घडवया.

दाखऊ एक जुट या स्वतंत्र दिनी एक दिवस

माझ्या गोर गरीब बांधवान साठी. समाजाचे

ऋण फेडण्या साठी.सर्व गोर संघटनांनी सर्व प्रयत्न करून मोर्चा करिता समाज बांधवाना घेऊन या.

आपलाच समाज शुभ चिंतक.
—सुखी चव्हाण, बदलापूर

     मोबाईल: 9930051865
गोर कैलास डी.राठोड

बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य.

web: www.goarbanjara.com

Leave a Reply