निदान स्वताच तरी स्वाभिमान बाळगा,

निदान पुढचे दोन दिवस तरी “स्वाभिमान”गहान ठेऊ नका..

मित्रहो, प्रचार संपला आता उमेदवार
तुमच्या घरी येइल विचारतील किती मेम्बर
आहे? चार मेम्बर असतील हजार ते पंधराशे
रूपये देतील आणि त्या थोडयशा पैश्यात
तुमचा आत्मसन्मान विकत घेतील
पाच वर्षातून एकदा मतदान करता तुम्ही,
हिशोब केला तर पाच वर्षाचे 1825 दिवसाचे
500 रुपयात तुमचे मत विकत घेत आहेत म्हणजे
तुमच्या मताची कीमत 27 पैसे होईल,
आजच्या परिस्थितीत जर
तुम्ही भिकारयाला जर यापेक्षा दुप्पट
म्हणजे 50 पैसे जरी दिले तर तुमच्या तोंडावर
फेकून मारेल आणि म्हणेल
“ठेव तुझ्याकडेच मयतीवर
फेकायला कामी येतील”
म्हणून मित्रहो, आपल्या मान
सन्मानाची लाज राखा
तुमच्या मताची कीमत
तुम्हाला अदयापही कळलेली नाही आहे,
तुमच्या या एका मतामुळ, तो जो भ्रष्ट
उमेदवार निवडून येतो ना, तो पाच वर्ष खूप
घोटाळै
करतो आणि तुम्हाला वाटलेल्या त्या पाचसे
रूपयाची परतफेड लाखो रुपयाने स्वत: च
स्वताच्या खिशात करतो कारण
त्याला माहीत आहे पुन्हा पाच वर्षाने
त्याला पैसे वाटावे लागेल,
मित्रानो हे चक्र असच चालु आहे वर्षानुवर्षे
आणि चालूच राहणार, कारण
त्या नेत्याला त्याचा धंदा करायचा आहे,
म्हणून मित्रानो आतातरी जागे व्हा
योग्य व्यक्तीलाच मत दया ,पैसे तर नेहमीच
कमवता एकदा आपला आत्मसन्मान कमवून
पहा, कारण तुम्ही तुमचे मत फक्त
तुमच्यासाठी नाही तर सम्पूर्ण मानव
समाजासाठी देत आहात, मी सकाळी 4
वाजता उठून माझी झोपमोड करून ही पोस्ट
लिहित आहे त्यात माझा काही स्वार्थ
नाही आणि कोणी मंत्री मला खुप मोठे
बक्षीस ही देणार नाही पण आपल्यामुडे
काही लोकांच्या डोक्यात थोड़ा प्रकाश
पडावा हेच उद्देश्य
तर पहा मित्रानो पटत असेल तर
करा आणि इतराना ही सांगा..
जय सेवालाल…
कैलास डी. राठोड

image

Leave a Reply