गोरमाटी समाजेम जांगड जांगड भेळेर रीत….जांगड भेळेरो..?

वाते मुंगा मोलारी
My swan song

जांगड….जांगड भेळेरो..?

जांगड व्यक्ती बाबत आर.व्ही रसेल आणि राय बहादूर हिरालाल,चाईल्डर्स अशा अनेक अभ्यासकांनी सांगोपांगी वढाळ विधाने ठोकून सत्याला कलाटणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे.चाईल्डर्सचा हवाला देऊन माझे मित्र डाॅ.जे.जे.राय बर्मन यांनी पूरविलेली माहिती अशी की,
When any child was stolen & brought in to the Tanda They were made it work as labourers But at time of their marriage an initiation ceremony was performed and is still done the boy’s tongue is pierced with a golden thread this is called “Bheler’
मूळात ही पुरविलेली माहिती चुकीची असून निराधार आहे.कारण कोर आणि गोर या सर्वावर सारखी कृपादृष्टी असू दे! अशी परमेश्वराकडे नित्या करुणा भाकणारा कोणताही गोरमाटी हा मुलं चोरुन आणून त्याला मजूरा प्रमाणे काम करण्यास भाग पाडून;लहान मुलांचे शोषण करण्याइतका क्रूर असूच शकत नाही.
गोरगणातील “जांगड भेळेरो” या प्रथेचा चुकीचा अर्थ लावून कंबरेज,रसेल,हिरालाल आणि चाईल्डर्स ई.अभ्यासकांनी गोर बनजारा गणांना हेतुपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पाश्चिमात्य इतिहासकारांचा संदर्भ घेऊन लिहिणार्या अभ्यासकांनी या पुढे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, *जांगड या शब्दाचा अर्थ परत बोलीचा माल,पसंत पडले तर ठेवायचा नाही तर परत करावयाचा अशा कराराने आणलेला माल,जोडणी,संबध असा होतो* यास वासुदेव गोविंद आपटे यांच्या ‘मराठी शब्द रत्नाकर’ या शब्दकोशाचा आधार आहे.
प्राचीन काळी दळणवळणाची साधने ही प्रामुख्याने गोर बनजारांच्या तांड्यांच्या अधीन असल्यामुळे अन्नधान्याचा भरपूर साठा गोरगणाकडे बारोमास असायचा.सतत पडणार्या दुष्काळामुळे म्हणा किंवा गरीब – श्रीमंत या विषमतावादी समाज रचनेमुळे म्हणा उपासमारीने वाताहत झालेली कुटुंबे अन्नधान्यासाठी आपल्या पोटच्या मुलामुलींना परत घेऊन जाण्याच्या बोलीवर गोर बनजार्यांच्या कुटुंबाच्या हवाली करीत म्हणजे गहाण ठेवीत असत.
गोर बनजारांचा तांडा सतत लदेणी व्यवसायात गुंतलेला असल्यामुळे परत यांची भेट होत नसे अशा परिस्थितीत गहाण असलेली मुलं परत करणे गोरमाटींना शक्य नसायचे.पुढे वयात आल्यावर अशा मुलामुलींना विधिवत त्यांच्या जिभेला तप्त सोन्याने थोडासा चीर देऊन आपल्या जमातीत समावून घेत आणि आपल्या मालकांचे कुळगोत्र अशा मुलामुलींना देऊन त्यांची लग्ने लाऊन त्यांचे संसार थाटून देत असत.मग मुलं चोरुन आणण्याचा प्रश्न उरतोच कुठे ?
या ठिकाणी इतिहासाचे गाढे अभ्यासक प्र.रा.देशमुख यांनी पुरविलेली माहिती या संदर्भात लक्षणीय ठरते “दुर्योन नावाचे तटबंधीचे शहर पुरुकुत्साने शुष्णाजवळून जिंकून घेतले.शुष्ण धान्नाचा फार मोठा व्यापारी होता.त्याचे धान्य लुटण्यासाठी पुरुकुत्साने स्वारी केली.त्याचे शृंगिण म्हणजे शिंगे धारण करणारा व कुयवाचः कापलेली जीभ असलेला असे वर्णन आहे. हे वर्णन ज्यांनी आपली पाच हजार वर्षाची परंपरा कायम राखली त्या बंजारालाही लागू पडते.बंजार्यांच्या डोक्यावर दिसणार्या शिंगाचा आर्यपूर्व लोकांच्या शिंगाशी संबंध दाखविण्यासाठी त्या दोन समाजाचा संबंध दाखवीणे जरुर असल्यामुळे बंजारी समाजाचे वेदातील आर्यांच्या शत्रूची जरा तपशीलवार तुलना करावी लागली त्यामुळे सामाजिक जीवनाच्या निकृष्ठावस्थेत असलेल्या अज्ञान व दारिद्र्यात खितपत पडलेल्या या समाजाचा भूतकाळ केवढा मोठा होता याची काहीशी कल्पना येइल”.
वैभवशाली अशा जगजेष्ठ संस्कृतीचा वारसा लाभलेला गोर बनजारा गणसमाज हा मुलं चोरुन आणू शकेल काय हो बंधू ?
प्राचीन काळी लढ्यामुळे वाताहत झालेल्या टोळ्यतील सापडलेली मुलं किंवा अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या अशा परक्या जातीतील सापडलेल्या मुलांना आणि परत बोलीच्या करारावर गहाण असलेल्या मुलामुलींना विधिवत त्यांच्या जिभेला तप्त सोन्याने थोडासा चीर देऊन गोर बनजारा गणात समावून घेण्याच्या प्रथेला “जांगड भेळेरो”म्हणत.
या प्रथे विषयी रसेलचे म्हणणे असे की,
“The tongue’s of boy’s were some time’s slit or branded with hot gold This last being the ceremony of initiation in the caste still used in Nimar”
या वरुन निर्विवाद सिध्द होते की,नागवंशीय गोर बनजारा गण समाज हा मूळनिवासी,नेटिव्ह सन्स Indigenous होय.
यांचे मूळत्व नाचण्यासाठी इथल्या समाज व्यवस्थेने या समाजाला चोरगुन्हेगार ठरवून समाजाच्या मुख्य प्रवाहा पासून कट कारस्थान रचले.हे निर्विवाद सत्य आहे.

संदर्भ-

१, एथनाग्राॅफी ऑफ ए डी.नोटी- फाईड ट्राईब द लमाण बनजारा
डाॅ.जे.जे.राय बर्मन
२, सिंधू संस्कृती ऋग्वेद व हिंदू संस्कृती
प्र.रा.देशमुख
३, मराठी शब्द रत्नाकर
वासुदेव गोविंद आपटे
४,गोरमाटी संस्कृती आणि संकेत
भीमणीपुत्र

भीमणीपुत्र
मोहन गणुजी नायक

सौजन्य: गोर कैलास डी राठोड

आॅनलाईन बंजारा न्यूज़ पोर्टल मुंबई महाराष्ट्र

7045870118