​”पुन्हा एक 15 वर्षाच्या  दामिनी चा लैंगिक अत्याचार करुन हत्या करण्यात आली”

“पुन्हा एक 15 वर्षाच्या  दामिनी चा लैंगिक अत्याचार करुन हत्या करण्यात आली”अजुन किती दामिनी व निर्भयाचे लैंगिक अत्याचार करुन हत्या करे पर्यंत आपण गप्प बसणार आहोत? – अँड. रमेश खेमू राठोड

         प्रिय माझ्या भारतीय बंधू भगिनींनो,अजुन किती दामिनी व निर्भयाचे लैंगिक अत्याचार करुन हत्या करे पर्यंत आपण गप्प बसणार आहोत? कोपार्डी प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होतो न होतो लगेच हणुमंतखेडा,तालुका-कन्नड,जिल्हा-औरंगाबाद येथील 10 वीत शिकणारी 15 वर्षाच्या दामिनीवर चार राक्षसरूपी हैवानाने त्या चिमुरडीचा लैंगिक अत्याचार करुन जिव घेतला व घाटनंदरा या घाटेत नेवुन फेकून दिले..!अशा नाराधमाचे अत्याचार अजुन किती वेळा सहन करुन गप्प बसायचे जर असे आपण निमुटपणे सहन करीत राहिलो तर असे सैतानरूपी नराधम भरपूर पैदा होतील व स्वर्गरूपी या दुनियेला नरक बनविल्याशिवाय  सोडणार नाहीत..!

         माझ्या बंधू बगिनिंनो,मानवतेला काळिमा फसणारी आणि लोकशाहीच्या देशाला कलंकित करणारी हि घटना आहे.सदर घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी व पिडित कुटूंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आमदार हरिभाऊ राठोड,प्रल्हाद राठोड,नंदभाऊ पवार,प्रकाश राठोड,विकास जाधव,लक्ष्मण राठोड इत्यादी बांधव घटनास्थळी जावून  संपूर्ण हकिकत जाणुन घेतली त्या वेळेस असे लक्षात आले कि ‘सदरील घटना हि हृदयाला हेलावुन टाकणारी असताना देखील संबधित पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी हे हलगार्जिपणा केल्याचे व करित असल्याचे दिसून आले आहे.ज्या पद्धतीने त्या चिमुरडीचा खून करण्यात आले आहे ते पाहिले असता,भारतीय दंड सहिंता कलम आणि लैंगिक अपराधापसुन बाल संरक्षण अधिनियमा नुसार जे कलम लावण्यात यायला पाहिजे होते तसे कलम आता पर्यंत लावण्यात आले नाही तसेच घटनेची सविस्तार व अचूक माहिती पीडित कुटुंबियाला देण्यास टाळाटाळ करीत आहे..!

         चिमुरडी दामिनीचा लैंगिक अत्याचार करुन खून करणाऱ्या चार सैतानरूपी नराधम व त्यांना मदत करणाऱ्यावर कठोर कारवाई करुन तात्काळ फाशीची शिक्षाच झाली पाहिजे.या साठी आपण सर्वांनी कायद्याचे अधीन राहुन त्या पिडिताना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहु या आणि हैवानरूपी विचार असणाऱ्या दुनियेला संपवु या आणि स्वर्गरूपी दुनियेला वाचवु या….!

         चला तर बंधू आणि भगिनिंनो सर्वांनी जात-धर्म-पक्ष-संघटना विसरून क्रांतिदिनाच्या औचित्य साधुन लोकशाही मार्गाने राक्षसरूपी नाराधमाना तात्काळ फाशी द्यावी व झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला व पोलिस प्रशासनला “हिच तुमची सुरक्षितता का” हे जाब विचारण्यासाठी तसेच त्यांना जागा करण्यासाठी दिनांक 09/08/2017 रोजी औरंगाबाद येथे आक्रोश मोर्चात सहभागी होवू या आणि आपली बहिण दामिनी हिला भावपूर्ण श्नध्दांजली वाहु या….!आपला मित्र बंधू:-अँड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404

Gajanan D.Rathod

प्रमुख प्रतिनिधि – गजानन डी. राठोड

9619401377

Leave a Reply