​”गोर-बंजारा समाजावर पुरे झाले आता अन्याय व अत्याचार ह्या सरकराचे..जिव गेला तरी चालेल पण नाही आता ढोंगी सरकारासमोर झुकायचे” –  अँड. रमेश खेमू राठोड

“गोर-बंजारा समाजावर पुरे झाले आता अन्याय व अत्याचार ह्या सरकराचे..जिव गेला तरी चालेल पण नाही आता ढोंगी सरकारासमोर झुकायचे”

         माझ्या मित्र -बंधू -भगिनींनो, आपल्या अंगात रक्त आहे की पाणी,का बरे कोणाच रक्त खवळत नाही.कधी जागे होणार आहोत, आपल्या गोर बंजारा समाजाच्या काळजात हात घालण्याचे धाडस ह्या ढोंगी सरकाराने केला आहे.असेच आपण गप्प बसत गेलो तर ध्यानात ठेवा “गोर बंजारा समाजाची संस्कृति व आपल्या IDEALचे  IDEOLOGY संपविल्याशिवय राहणार नाही” आणि एक दिवशी हे कपटी सरकार आपल्या घरातूनच अपल्याला बाहेरचा रस्ता दखविल्या शिवाय राहणार नाही.हरित क्रांतीचे Father of Nation ला संपविण्याचे घाट हे सरकार करीत आहे आणि आपण मात्र तोंडात बोट घालून निमुटपणे सहन करत आहोत.

         प्रिय जन हो,गोर बंजराचे रक्त तुमच्यात खरच सळसळत असेल आणि सेवालाल महाराजाचे खरे भक्त आहोत असे जर मानत असाल व महापुरूष वसंतराव नाईक साहेबांवर झालेला अन्याय तुम्हाला खरच त्याबद्दल काही तरी वाटत असेल तर जनक्रांति साठी सज्ज व्हा.त्या शिवाय खोडसपणाचे राजकारण करणाऱ्या ह्या सरकाराचे आपल्यावरील अन्याय व अत्याचार थांबणार नाही.”शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्या शब्दाच अर्थ आपण कधी समजणार आहोत ? बंजारा समाजातिल नेते,आमदार,खासदार,मंत्री,धनवान,व स्व:ताला विद्वान समजणारे मंडळी झोपले तरी नाही ना.. ? हा एकच प्रश्न मला सतावत आहे..!

         सरकराला माझी एवढिच एक विनंती आहे की “राज्य करणे म्हणजे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणे नव्हे अथवा महापुरुषाचा अपमान करुन दृष्ट बुद्धिने एका समाजाला दुखविणे नव्हे..तर लोककल्याणकारी राज्य चालविणे व सर्व जाती धर्माच आणि महापुरुषांच नितांत आदर करणे हे आहे.”काही असो माझ्या मित्र बंधू आणि भगिनिंनो माझा उद्धेश समजाला भड़कविण्याचा मुळीच नाही तर एक होवून समाजावर होणारा अन्याय व अत्याचार ह्या विरोधात लोकशाही मार्गाने ह्या सरकारला धडा शिकविण्यासाठी सज्ज व्हावे हिच माझी माफक अपेक्षा आहे…..! जय सेवालाल..! जय गोर-बंजारा…!आपला मित्र बंधू:-अँड रमेश खेमू राठोड मोबाईल नंबर:- 9657040404/9689040404
प्रमुख प्रतिनिधि – गजानन डी. राठोड 

बंजारा न्यूज पोर्टल 

9619401377

WWW. GOARBANJARA.COM

Leave a Reply