१९९५ मध्ये शिवसेना-भाजपा युती झाली नसती तर आम्ही इथंपर्यंत पोहोचलोच नसतो – देवेंद्र फडणवीस

■ मातोश्रीच्या बाहेर उभं रहायला मिळालं तरी भारी वाटायचं

(श्री. सतिष एस राठोड) ✍

■ कलर्स मराठी’ या वाहिनीवरील ‘ठाकरे यांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते, बाळासाहेबांची नागपूरच्या सभेची मला खूप उत्सुकता असायची. नागपूरला सभा होणार हे आम्हाला कळाल्यानंतर सभेच्या ४ दिवस आधी आणि सभेच्या ४ दिवस नंतर आम्ही त्यावर चर्चा करत होतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणामुळे आम्हाला प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले व अशा आठवणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उजाळा दिला.

■ त्यावेळी मी खूप छोटा कार्यकर्ता होतो त्यामुळे त्यांची भेट मिळण्याची कोणतीच शक्यता नव्हती, असे ते म्हणाले. निवडणूक जिंकू किंवा हरू पण त्यांच्या भाषणाने चैतन्य निर्माण व्हायच्या. मी त्यावेळी खूप छोटा कार्यकर्ता होता. त्यामुळे त्यांची भेट मिळण्याची कोणतीच शक्यता नव्हती, असे ते म्हणाले. तसेच १९९५ मध्ये जर शिवसेना-भाजपा युती झाली नसती तर आम्ही इथंपर्यंत पोहोचलोही नसतो, असे फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले. त्यावेळी ‘मातोश्री’च्या बाहेर उभा राहायला मिळालं तरी आम्हाला भारी वाटायचं असेही म्हणाले.

Leave a Reply