हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी करण्याचा शासनाचा निर्णय

Vasantrao Naik, Ex CM Maharashtra

हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा *१ जुलै हा जयंती दिन १९८९ पासून कृषीदिन म्हणून साजरा केला जात होता.* पण भाजपा सरकारने कृषीदिन बंद केला होता. मी काही दिवसांपूर्वी आ. राजेश राठोड यांच्याकडे एका लेखाच्या माध्यमातून एक जुलै हा दिवस पुन्हा कृषीदिन म्हणून साजरा करण्यात येईल असा प्रयत्न करण्याबाबत समाजाच्या भावना कळवलेल्या होत्या. फोनवरही त्यांच्याशी सविस्तर बोलणे झाले होते. त्याची दखल घेऊन त्यांनी सरकारपुढे दोन मागण्या ठेवलेल्या होत्या. त्या दोन्ही मागण्या सरकारने नुकत्याच मान्य केलेल्या आहेत. एक मागणी होती ती म्हणजे, १ जुलै रोजी पुन्हा कृषीदिन म्हणून साजरा करण्याची. आणि दुसरी होती वृक्ष लागवड आणि संगोपन अभियानाचे *वसंतराव नाईक वृक्ष लागवड व संगोपन अभियान* असे नामकरण करुन १ जुलै ते ३१ जुलै पर्यंत ही योजना राबवण्याची. *१ जुलै रोजी कृषीदिन* म्हणून साजरा करण्याबाबतचा शासन निर्णय समाजाच्या अवलोकनार्थ सोबत देत आहे. या निर्णयाबद्दल शासनाचे व विशेष करुन आ. राजेश राठोड यांचे समाजाच्यावतीने त्रिवार अभिनंदन .

फुलसिंग जाधव, औरंगाबाद, 8999098265

Tag : Ex CM Vasantrao Naik, CM Maharashtra, CM Uddhav Thackeray, Gor Banjara CM, 1 Julia Krushi Din, Maharashtra Agricultural Day

Leave a Reply