स्व. उत्तमराव राठोड यांचा अखेरचा दिवस

किनवट येथे बळीराम पाटील महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमास नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. जनार्धन वाघमारे यांच्या बरोबर उपस्थित होते, पण या कार्यक्रमात साहेबांचे भाषण झाल्यानंतर त्यांना अस्वस्थपणा वाटू लागला, परंतु अशाच परिस्थितीमध्ये कुलगुरु डॉ. जनार्धन वाघमारे यांना सोबत घेवून मांडवीकडे निघाले. सरस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप द्यावयाचा होता. कमला नेहरु मुलींच्या वस्तीगृहामध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथम साहेबांनी कुलगुरुंचा थोडक्यात परिचय करुन दिला व दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देतांना म्हणाले, Sw. Uttamrao Rathodकमला नेहरु वस्तीगृह आणि सरस विद्यालय माझ्या पत्नीने (उमा माई) चालवित आहेत. डॉ. जनार्धन वाघमारे हे लातूर पॅटर्न राबवित आहेत. लातूर येथील जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत असतात. आपल्या शाळेतील विद्यार्थी सुद्धा गुणवत्ता यादीत यायला पाहिजे. पण कॉपी न करता उत्तीर्ण होण्याचा मंत्र यावेळी साहेब देवून गेले. शेवटी विद्यार्थ्यांना निरोप देता-देता उभे आयुष्य दीन दलित शोषित आणि अडत्या नडल्यांसाठी सावली देणारा हा वटवृक्ष अवेळी कोसळला आणि तमाम अनुयायी दुःख सागरात बुडाले. तांडा संस्कृतीमधून याही पुढे अनेक राजकारणी व समाजकारणी येतील, परंतु पुन्हा राठोड साहेब होणे नाही.

बी.के. राठोड,
सरस विद्यालय,
मांडवी ता. किनवट

Leave a Reply