सेवालाल फाऊंडेशन व्दारा आयोजित मच्छी कामगार बायोमाँट्रीक कार्ड वाटपाचे कार्यक्रम
|काल दि.22 जानेवारी 2017 रोजी कुलाबा मुंबई येथे बंजारा समाज ग्रुप सेवालाल फाऊंडेशन व्दारा आयोजित मच्छी कामगार बायोमाँट्रीक कार्ड वाटपाचे कार्यक्रम पार पडले.
कुलाबा येथिल रहिवासी व बंजारा समाजातील मच्छी कामगार खुप वर्षा पासुन वसाहत करतात व त्यांचा व्यावसाय मच्छी बंदरावरील मच्छीची हमाली करणे व मच्छी साफ करून त्यांना पाँकिग करणे होय. खुप वर्षापासुन हे कामगार कार्यरत असतांना त्यांना कौन्ही ही मदत म्हणून करण्यास तयार नव्होते पण कुलाबा येथिल सामाजिक कार्यकर्ते व सेवालाल फांऊडेंशन ट्रष्टचे कार्यकर्ते मा.गोविंद भाऊ राठोड,शंकरभाऊ राठोड,प्रभूभाऊ राठोड तसेच महिला कार्यकर्त्या कु.सोभाताई राठोड यांच्या खास प्रयत्नाने या मच्छी कामगारांना हे कार्ड उपलब्ध करुन दिली.
या कार्यक्रमा दरम्यान बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज व जेतालाल महाराज,सामकी याडी यांच्या कुळातील श्री यशवंत महाराज पोहरा उमरी गड यांच्या हस्ते कार्ड वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमांत प्रमुख उपस्थिति आँड.नरेश राठोड नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष,मा.नंदूभाऊ पवार जेष्ट सामाजिक कार्यकर्ता ठाणे,गोर कैलास डी.राठोड ठाणे,भास्करभाऊ राठोड ठाणे,मा.प्रकाशभाऊ आडे,मा.संतोषभाऊ चव्हाण कुलाबा,व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित.
सौजन्य:
गोर कैलास डी राठोड
सामाजिक कार्यकर्ता ठाणे,
व प्रमुख पत्रकार गोर बंजारा न्युज पोर्टल मुंबई
Tag: Sevalal Foundation Mumbai