सेवाभायार बोल – बंजारा पुकार

मागील भागात आपण मोक्ष प्राप्ती या विषयी पाहिले. भगवे कपडे घालून मोक्ष प्राप्ती होत नाही. तर ज्याचे सदा सर्वदा ईश्वर चिंतन त्यास मोक्ष प्राप्ती होते. सिद्धी त्यांच्या पायावर येवून लोळते. स्वतः लक्ष्मी धावोनी येवून सेवा करते. असे सेवादास महाराज सांगतात. ज्याला कामिनी आवडते त्यास संत म्हणू नका असे सेवादास सांगतात. एके दिवशी नारदमूनी भगवंताशी विचारतात भगवंता तू राहातोस नेमक्या कोणत्या ठिकाणी. तेव्हा भगवंत स्वतः सांगतात. जो सतोषुनी भक्त आळविती मज एक चित्त तेथे मी स्वतः उभा असतो असे भगवंत नारदाला सांगतात. मी वैकुंठात राहत नाही. मी योगीच्या हृदयात राहतो. तेव्हा संत सेवादास धर्मिसातास सांगतात / ज्याचे चित्ती हरीचा ध्यास ! माळ त्याचे नसो कंटात तरी माळकरी तो श्रेष्ठ जगी. ज्याच्या गळ्यात माळ जरी नसेल व तो हरीचा सदा चिंतन करीत असेल तर तो माळकरी आहे. असे सेवादास सांगतात.

ज्याचे बोलणे आमृतापरी रसाळ / चित्ती श्रजयापरी गंगाजळ त्याप्रमाणे असेल तर त्याच्या गळ्यात माळ जरी नसेल तरी तो माळकरी विश्वमाने आहे. असे सेवादास धर्मिसातस सांगतात. व तु लवकर जेवन कर तु माळेसाठी कर्मठ होऊ नकोस, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्यागू नये ! पण, धर्मिसात सांगतो, माळ गळ्यात असल्याशिवाय मी जेवत नाही. माळ असल्यशिवाय अन्न सेवन करीत नाही. आपले जे नित्यनेम त्याशी त्यागू नये, आपण अनेकांच्या गोष्टी ऐकून कार्य आपले सोडू नये. असे सेवादास सांगतात. धर्मिसाताचे निर्धार पाहून सेवादास सांगतो. तु बालाजीचा थोर भक्त आहेस. तुझी किर्ती भुमंडळी गाजली आहे. तर बालाजी तुझ्या संकटाच्यावेळी देईल आणोनी. तर तु कष्टी होऊ नकोस. तेव्हा धर्मिसात सांगतो, श्रेष्ठ तुम्ही या भुमीवरती कृपाकरुनी मजप्रती / दर्शन घडव भवानीचा.

थोर अधिकारी आम्हा आपण कठीण येवढे नाही कर्म कृपा करुन भवानीचे दर्शन घडवा. तेव्हा सेवादास महाराज सांगतात कृपा करुन मला बालाजीचे रुप दाखव. तेव्हा धर्मिसात सांगतो. थोर अधिकारी तुम्ही भुमीवरी आहात. असे धर्मिसात सांगतात मी आपल्या सारखा आवतारी नाही. तुम्ही आवतारी पुरुष आहात. असे धर्मिसात सांगतो. तेव्हा सेवादास म्हणाले. जगात कोणते असे अशक्य आहे. चित्ती आठवता क्षणात येई ! बालाजी धावोनीया / परी अशक्य मजला गोण जगदंबेचे होई दर्शन ऐवढे करा माझे उद्धार होईल असे धर्मिसात सांगतात. तेव्हा सेवादास यांना खरे वाटले, तेव्हा सांगतो तुझी वृत्ती निरहंकारी आहे, सदभक्ताच्या नित्य हृदयात आराध्य दैवत राही नित्य, आठ विताची होई प्रगट वेळ सुद्ध लागत नाही. तेथे क्षणी जगदंबा आली धावोन सेवका दिले दर्शन तेव्हा सेवादास यांनी प्रेमाने चरण वंदीले.

तेव्हा भवानी सांगते सेवादास तुला असे कोणते विघ्न येते की, मला क्षण क्षणाला मला बोलवतोस कोणती ईच्छा धरनी तेवहा सेवादास भवानी मातेस सांगतात. बालाजीचे भक्त धर्मिसात तुषा लागली दर्शनाची, सौजन्य त्याची वृत्ती आहे. म्हणून त्याला तू दर्शन दे. तेव्हा भवानी वंदे सेवादास जरी दृढभक्ती त्याच्या मनात असली तरी त्याला गंगातीरी पाठवून दे असे सांगून भवानी गुप्त झाली. सेवादास वदे धर्मिसात आता गंगातिरी जावू चला. धर्मिसात जावून गंगातिरी एक शिळेवर बसविले. भवानी माता ब्रह्माणाचे रुप घेवून तयेठाई भवानी आली. फाटके कपडे नेसूनी धर्मिसात जवळ येवून उभी राहिली. आणि संभाषण करते, आणि विचारते, कसे काय बैसला आहेस, असे काम सोडून का बसला आहेस, काय संसाराचा विट आला म्हणूनी, की कार्य करुन थकलास म्हणूनी. तेव्हा धर्मिसात सांगतो भवानीसी व्यर्थ बैसलो नाही.

या ठिकाणी मला भवानीचे दर्शन घेण्यासाठी बसलो आहे. माझे चित्त आतुरले आहे. तेव्हा ब्राह्मणी भवानी सांगते हासोनी बसल्यास भलतेची खुष होऊनी पण, दर्शन घेण्यासाठी पुण्य अपार पाहिजेत. तुझ्या समोर उभी आहे, तरी तु ओळखत नाहीस देवा दैविकाला दर्शन झाले नाही, तर तुला दर्शन कसे घडेल. त o व् ह ा ध म ऊ स ा त सांगतो माते मला दर्शन दे तेव्हा भवानी माता आपले रुप बदलून विराट रुप धारण केली. ते विराट रुप पाहून धर्मिसात थरथरा कापू लागला आणि त्याच्या देहाची सुद्धी गेली. आणि भुमीवर पडला तेव्हा भवानी गुप्त झाली. धर्मिसाताचे दशा पाहूनी त्वरे बालाजी येती धावूनी कृपा दृष्टीने न्याहाळोनी निज भक्त उठविले. धर्मिसात शुद्धीवर आल्यावर बालाजीला पाहून डोळ्यानी पायात मिठी मारली. आणि सांगतो प्रमेश्वरा तुम्ही मला तारले नाही, तर मी यावेळी यमलयास गेलो होतो. भक्ताचे बीद्र वृत पाहून मला सांभाळीले प्रगटोनिया. मला जगदंबेने अचानक मला रुप विराट असे दाखवले ते पाहूनी माझ्या हृदयात दचकी भरली. तेव्हा बालाजी हासून सांगतो, भवानीची शक्ती महान आहे. आणि तु उगाच अहंपना त्रास भोगलास विनाकारण. त्या जगदंबेची थोरवी ! वर्णीता थकले वेदचारी शात्र पुराने मौनावली.

भवानीचे रुप अगम्य आहे. गुण अगम्य आहे. ब्रह्म विष्णु त्रिशुलधर त्याच्या हाताचे आहेत सुत्रधार असे अभय देवून बालाजीचे भक्त निघून जातात. तेव्हा सेवादास महाराज सांगतात. हजारो वर्श तप करुन दर्शन मिळत नाही. आणि तुला सहज दर्शन कसे मिळेल धर्मिसात म्हणे सेवका तुझी व्हा योग्यता आहे मला कळले, वर्णन करावे तेवढे कमी आहे. एके दिवशी धर्मिसात सेवादास यांना सांगतो. आता श्रावण मास आहे व वर्षाऋतू मास चालू आहे. आणि जन्मअष्टमीला बालाजीच्या मंदीरात उत्सव थाटात होतात. तेव्हा करीता तुम्ही उत्सवाला चला कृपाकरुन चला सगळ्या जनाना तुमचे दर्शन घेईल. पावन होतील पापी जन तेव्हा सेवादास धर्मिचा अग्रह पाहून येण्याची संमती दिली. आणि सोबत रामचंद्रसात यांना घेवून बालाजीच्या मंदीरात जातात. या मंदीरात शोभा चांगली आणली होती. यात्रा खूप भरलेली होती.

या जन्मअष्टमीच्या उत्सवावरुन आज बंजारा समाज बालाजी म्हणून दरवर्षी आपण गोकूळ अष्टमीचा उत्सव साजरा करत असावा असे मला वाटते. त्या ठिकाणी समुदाय खूप जमलेला होता. तेव्हा धर्मिसात म्हणतो. भाजी कशाची करावी. गोड करावी की, कशाची. पडत्या फळाची आज्ञा होता, संत सेवादास यांनी माव केली तत्वता. पायामाजी मासळीचा पाक निर्मला तात्काळ. हे पाहून धर्मिसातास खूप दुःख झाले. आणि म्हणू लागलो. संत सेवादासानी अन्नाचा नाश केला. मी समजत होतो सतपुरुष म्हणून आणले सार्थकास पण, कार्य त्यांनी अनुचित केले आहे. लोक उपाशी जातात आता हे वर्तमान लोकांना कळले आहे. कोणी प्रसादाला मासाहार म्हणून शिवत नाहीत. विनाशकाले बुद्धी विपरीत प्राप्त झाली. कैसी मजप्रत, बोलावून मंदीरास विघ्न मी स्वतः आणीले. अगोदरच मी विचार केला असतो. तर असे विपरीत घडले नसते. धर्मिसात सांगे सेवादास आणि तुम्ही मंदीरात विघ्न आनिले इतक्या लोकांच्या मुखीचा घास तुम्ही काढीले. असे करुन तुम्हा काय लाभ झाले सांगा. थोर पुरुष म्हणून मी तुम्हाला अनिले. त्याचे बक्षीस मला दिले. जगात अपवृत्ती वाढविली माफ करा मला कारण आपली योग्यता आम्हाला कळलीच नव्हती. आज मात्र आम्हाला स्पष्ट कळली. तेव्हा सेवादास सांगतात जो अज्ञानाला, सुज्ञापरी कार्य करतो. तो जगी आपल्या ज्ञान पचविण्यास समर्थ असतो. तेव्हा सेवादास यांनी भांडय़ातील भाजी आनायला सांगतात. तेव्हा ती भाजी मासळीचा न राहता वांगे बटाटे यांची झाली हे चमत्कार पाहून संत सेवादासाचे लोक चरण पकडतात.

हे प्रकार पाहून धर्मिसात प्रेमाने भरीत आणि नैवेध बालाजीना दाखवण्यात आले. अन्न निर्मानिया षडस अर्पिले. सर्व लोक पंक्तीस बसून जेवण करायला लागले तेव्हा तीन भक्त म्हणजेच 1) धर्मिसात 2) रामचंद्रसात 3) सेवादास फराळाचे आणून आपले फराळ आटोपिले. आणि परत छावणीला आले. आणि अचानक पाऊस सुरु झाला. काही दिवस झाले झडी लागली सवा दिवस जलभुमी चोहिकडे फिरायला तिळभर सुद्धा जागा नव्हती. भुमीवर चोहिकडे कहर झाले. सर्वजन त्रस्त झाले. इतक्यात छावणीत विघ्न आले. दुरवर एक वस्ती होती. व ती कांतारी असे आणि त्या ठिकाणी लोक राहत होती. पेढारी ते लोक लुटमार करीत होते. जसे एखादी पशु शिकारीसाठी टपून बसतो. तसे ते असे लुटारु महा हिंसक हे लोक राहात होते. आणि संत सेवादास गंगातिरी राहतो. आणि तो बंजाराचा थोर देवत आहे. आणि तो सोबत गोधन, सोबत पैसा 3 लाख रुपयाचा ऐवज आहे. असा सुगाव लागला निजामानी त्याचा सत्कार करुन संपत्ती दिली आहे. तर 3 लाख रुपये लुटमार करुन आनुया बै, गोधन, ऐवढे कार्य साधन्यास काही तोटा नाही. असे पेढारी विचार करीत होते. दुरजनाचा एँसा विचार ! जगदंबेशी कळले समग्र भक्त कैवारी अंबा सत्वर ! कष्ठ निजांगे सोशितसे उठोनिया सत्वरीत आली भवानी छावणीस आणि संत सेवादास यांना जागृत करते. आणि सांगते झोप कशी लागली तुला असे भवानी म्हटल्याबरोबर देवीला पाहून सेवादास पायावर मिठी मारतो. आणि सांगतो. माते एवढय़ा रात्रीला काय कारण घडले की, तु आलीस. तेव्हा सांगे भवानी सेवादास कठीण प्रसंग आहे. तुझ्यावर तु गंगापार करुन उद्या येथून निघून जा. तेव्हा सेवादास सांगतो माते असे कोणते विघ्न जगन्माते आम्हावरही. तेव्हा भवानी माता सांगते.

सेवादास, या भागात राहाती पेढारी ती तुम्हाला लुटावयाशी येत आहे. आणि ते लोक फार दुष्ट आहेत. ते तुमचे घात सुद्धा करु शकतात. ते पापपुण्य जानत नाही, ते भुमीवरील राक्षस आहेत. असे एकोनी सेवादास हात जोडूनी ईश्वराचे थोर विदान संकट धाडियलो आम्हावरी. सतत पाऊस चालू आहे. गंगा महापुरानी भरलेली आहे चोहिकडे पाणीच पाणी आहे. चिखल भयंकर आहे. एँशी समयी संकट तारी जगदंबे भवानी तेव्हा भवानी सांगे सेवादास. दुःख अनुमात्र नाही तुला. भक्त तारावया संकटी ! उभी असे मी, काळजी करु नकोस. तेव्हा सेवादास यांना अभय मिळाले आणि आनंद वाटला. आणि सेवादास सांगतात माते तुझी थोरवी कैसे वर्णवी मी बुद्धीहीन आहे.

आणि आता सेवादास सर्वांना बोलवतात तोच धर्मिसात, रामचंद्रसात ही आले धावून तेव्हा सेवादास त्यांना असनावर बसवतात आणि सांगतात. आपण या ठिकाणी तिघे भक्त आहोत करीता आपआपल्या सामर्थ्यावर संकट ऐवढे निवारुया आपण तिघेही थोर भक्त अहोत. जर आपण दुष्टाला जर दंड नाही दिला तर आपली अपर्किती जगात होईल. लोक पाहूनी हासतील तरी आपली सर्व शक्ती एकवटोनी राहू. कोणतेही काम करत असताना एँक्य असल्याशिवाय काम होत नाही. ज्या मानसाकडे भगवंतानी तुला दिलेली आहे. निपुणता दिलेली आहे, ती आपण भगवंताच्या कामी वापरावी. मी मोठा आहे. मी विद्वान आहे, असे न समजता आपल्याला भगवंतानी दिलेली शक्ती, दिलेली निपुनता, भगवंतासाठी वापरावी असे सेवादास सांगतात.

तेव्हा धर्मिसात म्हणतो सेवादास काही चिंता करु नकोस पाणीच भुमीवर पडणार नाही असा उपाय मी योजीतो. भगवंत बालाजीचा मला वरदान आहे, तर जल वृष्टीसी थांबविन मी. तेव्हा रामचंद्रसात सांगतो माझ्यावर कान्होबाची कृपा आहे. बुद्ध करुनी पेढारियाशी संकट आपले निवारीन दोन कार्यची चिंता नाही आता, पण गंगाभरुन चालली आहे. पलीकडे कसे जावे. सेवादास सांगतात कठीण काळ आहे. तो कार्य भवानी माताच करेल. कारण आपण त्याचे लेकरे आहोत. त्यानेच जानविले संकट तीच निवारले आपआप असे सेवादास सांगतात. कृमशः

बंजारा पुकार – मोबाइल एप्प