“सुशिक्षित वर्गाने बंजारा समाजाला खरेच धोका दिला काय”- प्रा.अरूण चव्हाण हिंगोली,

*सुशिक्षीत वर्गाने बंजारा समाजाला खरेच धोका दिला आहे काय ?*

एखाद्या शासकीय कार्यालयात, दवाखान्यात, पोलीस ठाण्यात, महापालिकेत वा अन्यत्र कोठे आपले काम असेल आणि ते आपणास विनात्रासाने लवकर करून घ्यायचे असेल तर आपण काय करतो ? आपण शोधतो की त्या कार्यालयात आपला कोणी मित्र किंवा ओळखीचा कोणी आहे काय ? जर नसेल तर आपल्या परिचितांना विचारतो का तेथे कोणी ओळखीचा आहे काय. असा ओळखीचा मिळाला नाही तर मग कोठुनतरी शोध काढतो की तेथे आपल्यापैकी म्हणजेच आपल्या जातीपैकी कोणी आहे काय? आपले काम करून घेण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करून आपल्या माणसाची म्हणजेच आपल्या जातीच्या माणसाची ओळख काढतो.त्याच्याशी संपर्क करतो. तो आपला माणूस त्याला शक्य असेल तेवढी मदत आपल्याला करतो( अपवाद वगळता ) त्याच्या स्वःताकडे काम असेल तर साहानुभूतीपूर्वक नियमांच्या अधिन राहुन मदत करतो. त्याच्याकडे ते काम नसेल तरी आपल्यासाठी वेळ काढून कधी फोनवर बोलुन तर कधी स्वत: येऊन आपल्या माणसाला मदत करण्याचा प्रयत्न करतो. यास कोणी अपवादही असतील पण सामान्यपणे असे अनेक कार्यालयात  घडते. हाच आपला मानूस आपल्या कार्यालयात नाइक साहेबांची जयंती साजरी करण्यासाठी पुढे असतो. आपल्या कोणत्या कर्मचार्यावर अन्याय झाला, त्याची बढती रोखली गेली, रोस्टर भरले गेले नाही तर, आरक्षणात डावलले गेले तर आवाज उठविण्यास पुढे असतो. कार्यालयीन वेळेनंतर जेंव्हा तो घरी येतो तेंव्हा हाच कर्मचारी आपल्या समाजातील राजकीय गटबाजीवर खिन्न होतो. जातीय कारणावरून होणार्या अन्याय अत्याचाराच्या घटनांबाबत संताप व्यक्त करतो. कधी कोणत्या कारणास्तव समाजाचा मोर्चा निघाला तर त्यात मनोमन का होईना पाठिंबा देतो. विद्यार्थी व युवकांसाठी कधी प्रशिक्षणशिबीरे घेतो. जयंतीच्या कार्यक्रमांना वर्गणी देतो. काही अपवाद असतीलही पण बंजारा  जनसमुहातील बहुसंख्य कर्मचारी व शिकला सवरला वर्ग त्याला जमेल त्या पद्धतीने समाजऋणांची परतफेड करण्याचा प्रयत्न करीत असतो हे नाकारता येणार नाही. मात्र सामान्य बंजारा समाजाच्या जनतेत या आपल्याच कर्मचारी / अधिकारी बांधवांबद्दल पराकोटीची द्वेषभावना राजकारणी नेत्यांनी पसरविली आहे.हल्ली तर या शिकल्या सवरल्या लोकांनीच नाइक साहेबांची चळवळ समाप्त केली असा आरोप या सुशिक्षीत बुद्धीजीवी वर्गावर आणि कर्मचारी अधिकारी वर्गावर लावला जातो. तुमचे चळवळीत काय
योगदान म्हणून त्याची हेटाळणी केली जाते. काय नाइक साहेबांच्या चळवळीचा मारेकरी खरेच सुशिक्षीत बुद्धीजीवी वर्ग आणि कर्मचारी / अधिकारी आहे ? सुशिक्षीत बुद्धीजीवी वर्गाने समाज चळवळीला काहीही योगदान दिले नाही काय ? सुशिक्षीत वर्गाने समाजाला धोका दिला हे म्हणणे कितपत योग्य आणि वस्तुस्थितीला धरून आहे ?

*प्रा.अरुण चव्हाण*
*हिंगोली*

~गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल
www.goarbanjara.com

image

Leave a Reply