सवाईराम राठोड यांच्या ‘अमृत महोत्सव’ आठवणीची शिदोरी तर त्यांचे आत्मचरीत्र ‘आव्हान’ प्रेरणादायी पुस्तक

2015-06-03_154032

वाशिम (प्रतिनिधी) – येथील प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ. संदेश राठोड यांनी त्यांचे वडिल सवाईराम राठोड यांचा ‘अमृत महोत्सव’ चे कार्यक्रम आयोजन केले होते. सवाईराम राठोड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मी अतिशय गरीब भटकंती करणार्या गुटूंबातील मुलगा माझे असे कुटूंब की ज्याला कोठे राहाण्याचा ठिकाणा नाही अशा गरीब कुटूंबात माझा जन्म झाला माझा जन्म झाला तेव्हा माझे कुटूंबीय आई-वडिल हे शेलगाव ता. बार्शिटाकळी जि. अकोला येथे स्थिरावले आणि मला वयाच्या साडेनऊ वर्षांचा असताना पहिल्या वर्गात टाकले शिक्षण घेता घेता येणार्या अडचणी त्या अडचणी वर मातकरत दहावी उत्तीर्ण झालो आणि (एस.टी) मध्ये लिपिक पदावर कार्यरत झालो. समोर आणखिन शिक्षणाची जिद्द असल्यामुळे नौकरी करत करत बी.ऐ.चे शिक्षण घेतले ह्या सर्व गोष्टी लोकांच्या मनाला स्पर्श करत होती आणि त्यांच्या ह्या आठवणीची शिदोरी लोकांनी अतिशय मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती. नंतर सवाईराम राठोड यांच्या ह्या जिवनावर आधारित आव्हान ह्या आत्मचरित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे आव्हांन पुस्तक म्हणजे युवापिढीला अतिशय प्रेरणादायी पुस्तक ठरणार आहे. ह्या आत्मचरित्र पुस्तकात सवाईराम राठोड सांगतात की, जिद्द आणि मनात लगन असेल तर माणुस कोणत्या हि परिस्थितीचा सामना करुन यश प्राप्त करु शकतो आणि जो माणुस कोणत्याही परिस्थितीचा सामना न डगमगता करु शकतो तो एक दिवस उंचशिखरापर्यंत पोहचत असतो. सवाईराम राठोड यांच्या ह्या अमृत महोत्सव कार्यक्रमास मा. मखराम पवार, मा.आ. हरिभाऊ राठोड, मा.डॉ. टि.सि. राठोड, दिलिपराव जाधव तसेच बंजारा समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती व बंजारा समाज मोठय़ा संख्येने उपस्थित होता.

Leave a Reply