“समाज घडविण्यासाठी हवे सकारात्मक विचार”

“विचारांचं सामथ्र्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची स्वतःची व् सामाजिक प्रगती लवकर होताना दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. सामान्यपणे आपलं आपल्या विचारांकडे लक्ष नसतं; किंबहुना विचारांच्या बाबतीत जेवढी सजगता असायला हवी तेवढी आपल्यामध्ये नसते. एखादी चांगली गोष्ट करताना मनात येणारा पहिला सृजनशील विचार पकडून ठेवता आला पाहिजे, तशी सवयच लावून घ्यायला हवी व तात्काळ कृतीच्या अंमलबजावणीची रूपरेषा ठरवली गेली पाहिजे. मनात येणाऱ्या पहिल्या विचारालाच नकारात्मक विचारांचे मळभ लाभले की कार्यसिद्धीला ग्रहण लागलंच म्हणून समजा. पाणी ज्याप्रमाणे उताराकडे वाहतं तसे बहुसंख्य वेळेला माणूस नकारात्मक विचार करताना दिसतो. आणि हेच समाजाच्या दृष्टीने प्रगतिस बाधा येते .बहुतेक वेळेला खालील प्रकारचे विचार कार्यप्रवण होण्यामध्ये आणि चांगल्या विचारांना प्रत्यक्षात सिद्ध होण्यामध्ये अडसर ठरतात. उदाहरणार्थ,

१)मी केल्याने काय फरक पडणार आहे?

२) मला जमण्यासारखं नाही ते.

३)मीच का म्हणून करू?

४)योग्य वेळ आल्यावर करू, आत्ताच काही घाई नाही.

५)लोक काय म्हणतील, हसणार तर नाहीत    ना?

६)पण योजना असफल झाली तर?

७)करायला हरकत नाही, पण मला नशीब कधीच साथ देत नाही.

वरील सात नकारात्मक विचार सोडले तर

समाज साथ साथ व् संघटित राहील.

पहिल्या विचारावर कार्यप्रवण होण्यामध्ये जरा काळ गेला की असे असंख्य विचार अडचणींचे डोंगर उभे करतात आणि चांगल्या विचाराची हत्या होते. थोर व्यक्तींच्या चरित्राचं परिशीलन केलं असता असं लक्षात येतं की, प्रतिकूल परिस्थितीतही केवळ सकारात्मक विचारांची साथ न सोडल्यामुळे ते असामान्य कार्य करू शकले.

सकारात्मक विचार केला तर समाजाची प्रगति कोणीही रोखु शकणार नाही. फ़क्त मी म्हणून नव्हे तर आम्ही म्हणून विचार व्हावे

—सुखी चव्हाण ,बदलापुर


सौजन्य: गोर कैलास डी.राठोड

बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल मुंबई,

website: www.goarbanjara.com

contact,9819973477

One Comment
  1. Avatar

Leave a Reply