समाजाला न्याय दया अन्यथा सर्वोच्च न्यायलय येथे जनहित याचिका दाखल करणार – अँड रमेश खेमू राठोड

भारत देशातील विविध ठिकाणी गोर बंजारा समाजावर होणारा अन्याय,अत्याचार,छळ,क्रूर हिंसा,अमानुष,आमानवीय छळवणूक तसेच पिळवणुक,जिवित हानी,वित्त हानी आणि दुजाभाव या संदर्भात माननीय जनरल रजिस्ट्रार सर्वोच्च न्यायालय भारत,माननीय मुख्य गृह सचिव भारत,माननीय मुख्य सचिव प्रधानमंत्री कार्यालय भारत,माननीय मुख्य गृह सचिव तेलंगाना राज्य,माननीय मुख्य गृह सचिव महाराष्ट्र राज्य,माननीय मुख्य गृह सचिव गोवा राज्य,माननीय मुख्य गृह सचिव कर्नाटक राज्य,माननीय मुख्य गृह सचिव राजस्थान राज्य इत्यादीना दिनांक 27/12/2017/रोजी कायदेशीर नोटिस पाठविण्यात आली आहे….! यदाकदाचित समिति नेमून तीन महिन्याच्या आत समाजाला न्याय व सबंधित दोषीवर कड़क कारवाई जर केली नाही तर सर्वोच्च न्यायालय भारत येथे जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे….! माझा उद्देश फ़क्त प्रवित्र राज्य घटनेंनी दिलेले आमचे हक्क व अधिकार तसेच स्वातंत्र्य-समता-बंधुत्व याची वागणूक व न्याय मिळाला पाहिजे.अन्यथा राज्यघटनेंची मौलिक अधिकारांची पायमल्ली व लोकशाहीचे मूल्यांची किम्मत राहणार नाही…..म्हणून आम्हाला न्याय दया,नाही तर सर्वोच्च न्यायलय येथे जनहित याचिका दखल करणार……!
आपला मित्र बंधू अँड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404

गजानन धावजी राठोड

प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव्ह

9619401377

Leave a Reply