समाजाकडून घेणारा नव्हे तर,देणारा कार्यकर्ता घडवायचा आहे-आत्माराम जाधव.

सोयगाव(प्रतिनीधी)- *राष्ट्रीय बंजारा टायगर्स ही संघटना निःस्वार्थपणे कार्य करत असुन या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता समाजाकडून घेणारा नव्हे तर,काहीतरी ‘देणारा’ कार्यकर्ता मला घडवायचा आहे.असे,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधे ७ शाखा उद्घाटन कार्यक्रम व बंजारा समाज मेळाव्याला मार्गदर्शन करताना सांगितले.*
*सोयगाव तालुक्यातील २ दिवसीय दौऱ्यामधील ‘पहिल्या दिवशी-निंबायती(रामपुरा तांडा),जंगला तांडा,वरखेडी तांडा’ येथे संघटनेचे ‘शाखा फलक अनावर करण्यात आले आणि ‘वरखेडी तांडा’ येथे भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली व शेवटी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याला उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले, यावेळी तांड्यातील विविध समस्यां स्थानिक कार्यकर्त्यांनी मांडल्या असता या समस्या आपण संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करु असे उपस्थित मान्यरांनी यावेळी ग्वाही दिली.*
*यावेळी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष-विरेंद्रजी रत्ने(चव्हाण) यांनी युवकांनी एकजुटीने एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी संघटनेला सहकार्य करावे.तसेच,संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव यांच्यासारख्या ‘तरुण व निःस्वार्थी नेतृत्वासोबत राहुन समाजकार्यासाठी तत्पर रहावे असे आवाहन केले.*
*संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस-अनिलभाऊ पवार यांनी तांड्यातील रस्ते,गटार,विज,पाणी,इ,मुलभूत समस्यांवर मंथन केले व या समस्या सोडविण्यासाठी समाजातील तरुण,तरुणी व बांधवानी जास्तीत-जास्त संख्येने “ग्रामसभेमधे” आपला सहभाग नोंदवावा.आणि या समस्या प्रशासनाकडून सोडवून घेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.*
*संघटनेचे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष-भारत राठोड यांनी तरुण युवकांनी अंधविश्वास सोडून विज्ञानाची कास धरण्याचे सांगितले.तसेच,समाजातील काही लोक ‘संत सेवालाल महाराज’ यांची चुकीची ‘प्रतिमा’ तयार करुन ‘विटंबना’ करत असल्याचे समाजबांधवांच्या निदर्शनास आणून दिले.संत सेवालाल महाराज हे ‘संत’ होते.त्यांनी आपल्या विचारांनी समाजाला चांगली ‘दिशा’ देण्याचे कार्य केले.मात्र,समाजातील काही लोकांनी त्यांना तलवारधारी बनवून संताऐवजी राजा किंवा लढवय्या/योद्धा दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याने आपण सेवालाल महाराजांची कुठली ‘प्रतिमा’ आपल्या घरांमधे लावावी यावर मंथन करण्यास सांगितले.*
*यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण व ठाणे जिल्हा उपाध्यक्ष-गजानन जाधव यांचीही भाषणे झाली.यावेळी या दोघांनी सांगितले की,’राष्ट्रीय बंजारा टायगर्स’ ही संघटना समाजामधे निःस्वार्थपणे कार्य करीत असल्याने या संघटनेमधे समाजातील विविध तरुण,तरुणी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असुन आपण देखील ‘राष्ट्रीय बंजारा टायगर्स’ या संघटनेमधे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि समाजाची निःस्वार्थी सेवा करावी असे आवाहन केले.*
*यावेळी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष-अमृतजी मेडकर,राष्ट्रीय महासचिव-वाल्मिकभाऊ पवार,प्रदेश उपाध्यक्ष-विलास राठोड,प्रदेश संघटक-जगदिशभाऊ राठोड,जळगांव जिल्हा सरचिटणीस-सिताराम पवार,जिल्हा सचिव-भरत पवार,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष-लखनभाऊ चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष-दिपक चव्हाण,जिल्हा सरचिटणीस-सुभाष राठोड,जिल्हा संघटक-लखन चव्हाण,जिल्हा सचिव-मनोज राठोड,तालुकाध्यक्ष-साईदास चव्हाण,तालुका उपाध्यक्ष-विनोदभाऊ चव्हाण,राणीदास चव्हाण,सुभाष जाधव,तालुका सचिव-परिक्षीत राठोड,सामाजिक कार्यकर्ते व चैतन्य साधक परिवार,सोयगाव अध्यक्ष-मा.बाबुदादा चव्हाण,मा.जुगराजभाई जाधव,यांच्यासह तांड्यातील असंख्य समाजबांधवांची उपस्थिती होती.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी-शाखाध्यक्ष-विठ्ठल जाधव,उपाध्यक्ष-अजय चव्हाण,सचिव-उमेश जाधव,कोषाध्यक्ष-अंकुश जाधव,कृष्णा जाधव,प्रसिद्धी प्रमुख-राजेश राठोड,संघटक-सुरेश जाधव,सह-संघटक-रमेश राठोड,सदस्य-विठ्ठल राठोड ,सतिष चव्हाण,भैय्या राठोड,समाधान जाधव,अरुण राठोड,विशाल जाधव,बाळू राठोड,प्रधान जाधव,लखन जाधव,राणीदास चव्हाण,जयहिंद चव्हाण,सुरेश राठोड,Sky राठोड ,विकास राठोड,गोवर्धन राठोड,बाला जाधव,ज्ञानेश्वर चव्हाण,नारायण राठोड,यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.*
*कार्यक्रमाचे सुत्रसंचालन-प्रदेशाध्यक्ष-मा.अशोकभाऊ चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन-मा.संजयभाऊ राठोड यांनी मानले.*
—————————————————
*प्रति,*
*मा.संपादक साहेब*
*दैनिक…………….*
*यांचे सेवेशी.*

वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकामधे प्रसिद्धीस द्यावी ही नम्र विनंती.

???? *आपला स्नेहांकीत*????
*मा.प्रविण चव्हाण*
*(प्रसिद्धी प्रमुख)*
*राष्ट्रीय बंजारा टायगर्स*
*सोयगाव तालुका*

????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

Tag Rastriya Banjara Tiger, Banjara Live News Network, Jai Sevalal, Lambadi, Lamani