सतीश जाधव यांची औषध निर्माण अधिकारी पदी निवड

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा अंतर्गत 8 नोव्हेंबर 2014 रोजी घेण्यात आलेल्या औषध निर्माण अधिकारीच्या लेखा परिक्षेत गुणानुक्रमे प्राप्त ठरलेल्या यादी नुसार ही निवड करण्यात आली. Satish Jadhav-Banjara pukarह्या लेखी परिक्षेत 500 परिक्षार्थी बसले होते ह्या सर्वातुन सतिश जाधव यांची विमुक्त जाती ‘अ’ या प्रवर्गातुन औषध निर्माण अधिकारी या पदावर निवड करण्यात आली. जिल्हा निवड समिती नांदेड मार्फत दि. 12-12-2014 रोजी नियुक्ती पत्रानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी कळविले. सतीश जाधव हे सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी शंकर अमरू जाधव रा.अमरू नाईक तांडा मसलगा ता.भोकर यांचा मुलगा आहे. सध्या ह.मु.स्वामी समर्थ मंदिरा जवळ, मगनपुरा, नांदेड येथे आहे. सतीश जाधव यांच्या निवडीबद्दल सर्व मित्रमंडळी व सा.बंजारा पुकार परिवार तर्फे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply