संस्थान श्री भार्गवराम परशुराम तर्फे जाहीर आवाहन

श्री. सतिष एस राठोड ✍

  • चिपळूण :- राज राजेश्वर श्री. परशुराम यांचे मंदीर अखंड भारतामधील एक तीर्थक्षेत्र आहे. या भुमीला भगवान परशुरामांनी आपल्या वास्तव्याने पावन केले आहे. येथे अनेक पौराणिक, ऐतिहासिक घडल्या आहेत जसे की भगवंतांनी येथे गुरू द्रोणाचार्य, कर्ण अशा महापराक्रमी योध्दांना अस्रशस्रांचे शिक्षण दिले आहेत.
  • ऐतिहासिक म्हणायचे झाले तर श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी शिवाजी माहाराज व श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज येथे अनेक वेळा दर्शनाला येत असत. त्यानंतरच्या काळात पहिले पेशवे श्रीमंत श्री बाळाजी विश्वनाथ यांची नेमणूक याच ठिकाणी गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांच्या सांगण्यावरून झाली.
  • कोकणभुमीचे निर्माते भगवान परशुराम हे असल्याने अखंड कोकणात भगवंतांना राजाधीराज मानले जाते. सद्गुरू ब्रह्मेंद्रस्वामींनी त्याकाळी प्रत्येक सणाला राजेशाही थाटाची श्रींच्या पालखीची पध्दत सुरु केली होती.भगवंताच्या पालखी बरोबर चौघडे व शिंग वाजवून भालदार, चोपदार, मशालजी, अव्दागीर, चौरी बहाद्दर, मोर्चेल, पुजारी, आसा सर्व लवाजमा असायचा . या सर्व गोष्टींना एक आगळे वेगळेच स्वरूप त्याकाळी होते. अजुनही संस्थान ते स्वरूप तसेच राखण्याचा प्रयत्न करीत आहे.

दिवसागणीत येथे येणारे पर्यटक व भाविक भक्तगण ओढा वाढत आहे. राजराजेश्वराचे वैभव पहाण्यासाठी परशुराम जन्मोत्सवाच्या वेळी तसेच दसरा महाशिवरात्र आषाढी व कार्तिकी एकादशी या प्रमुख दिवशी भाविकांची प्रचंड गार्दी असते. अशा राजराजेश्वर भागवान परशुरामांना सुवर्ण किरीट असावा असा संस्थेचा मानस आहे. यासाठी संस्थेच्या वतीने असा संकल्प करण्यात इला असुन सन २०२० च्या अक्षयतृतीये पूर्वी म्हणजेच पुढील वर्षीच्या श्री परशुराम जन्मोत्वापूर्वी येथील तीनही मुर्तींना सुवर्ण किरीटाने सुसोभित करण्यात येईलवा श्रींची स्वारी सुवर्ण जडीत किरीटाने साकारली जाईल असा संकल्प आहे.

तसेच एका पत्रकाद्वारे संस्थानाच्या वतीने भाविकांनी या धार्मिक कार्यात सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भगवंतांच्या मुर्तीला २ किलो सोन्याचा किरीट व बाजुच्या काळ व काम यांच्या मुर्तींना प्रत्येकी १.५ किलो सोन्याचा किरीट करावयास लागणार आहे. याची अंदाजीत रक्कम रु. २ कोटी एवढी असेल.

भाविकांनी यथाशक्ति, यथामती दान करून सहकार्य करावे. हे दान आर्थिक स्वरूपात अथवा सुवर्ण स्वरूपात देखील आपण दान करू शकता. हे दान करण्यासाठी आपण खालील पत्यावर संपर्क साधू शकता किंवा या वेबसाईटला www.parshuramdevasthan.org भेट देऊ शकता.

  • ♦♦ पत्ता ♦♦

संस्थान श्री भार्गवराम परशुराम
श्री क्षेत्र परशुराम
ता. चिपळूण जि. रत्नागिरी

  • ♦♦ संपर्क ♦♦

व्यवस्थापक : शंकर कानडे
मो : ७७७४०२११००
सह व्यवस्थापक : जयदीप जोशी
मो : ७७७४०२१०९४
ईमेल : – [email protected]
बँक खाते :- संस्थान श्री भार्गवराम परशुराम
शाखा :- स्टेट बँक अॉफ इंडिया (चिपळूण)
खा. क्र :- ३०२७४५२८७९५
IFSC :- SBIN0000350

Leave a Reply