“संवाद एका समाजासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्याशी” – मा. नथ्थुजी गोपा चव्हाण सावरगांव बंगला ता.पुसद जिल्हा यवतमाळ

मित्र हो जय सेवालाल…
आज आपन ज्या व्यक्तिच्या संदर्भात लिहणार आहोत त्याचे सामाजिक कार्याबद्दल व त्यांची समाजासाठी दिलेली देणगी म्हणजे शब्द.
मित्र हो पैसा किंवा धन कधीही सिल्लक राहत नाही पण एकाद्याने खऱ्या मनाने दोन शब्द सांगितले तर खरोखर त्या शब्दातुन साकारलेली कामे आपल्या जीवनातील खरी औळख निर्माण करून देणारी असतात.
तसेच ज्या माणसा बद्दल मि तुम्हाला आज सांगणार आहे.यवतमाळ जिल्हा पुसद तालुक्यातील एक निपानी परीसरातील म्हणजे माळपटारावरील टांडा सावरगांव बंगला येशिल प्रतिष्ठीत नागरीक,विद्यार्थ्याचे खरे शिक्षक, युवकांचे सच्चे मार्गदर्शक, समाज चळवळीसाठी अहोरात्र धडपडनारे व मागासवर्गीयाचे खरे समाज सेवक म्हणुन नावास लौकिक असनारे आमचे नानासाहेब “लडीकार मा.श्री नथ्थुजी गोपा चव्हाण.
यांचा परिचय म्हणजे खुप सोप आहे ते निपानी गाव (सावरगांव बंगला) येथिल पहिले वार्ताहार व लढा समतेचा या साप्ताहिक पत्रिकेचे संपादक, आजच्या घडीला त्यांचा विमुक्त नायक हा साप्ताहिक पत्र खुप जोरदार चालत आहे.
मा.नाना साहेबा बद्दल त्याच्या कार्याबद्दल व त्याच्या चळवळी बदल आपण बोल आहो.
मा.नथ्थुजी गोपा चव्हाण एक धडपड करणारा सच्या कार्यकर्ता त्यांना विद्यार्थी वयातुनच लेखनाचे व सामाजिक कार्याचे आवड निर्माण झालेले असावे.
गेल्या 60 वर्षापासुन गावात सामाजिक बाधिलकीची जपवनुक करून समाज कार्य करण्यासाठी सर्वाधिक धावाधाव करणारे,शैक्षणिक कार्यात तर खुप महत्व देणारे, स्वता शाळेत जाऊन शिक्षकांना आपल्या परिने संवाद साधुन सर्वांना शिक्षणाचे म्हत्व देतांना मि स्वता पाहिलेल आहे.
त्यांचे कार्य त्यांनी दलित भटक्या विमक्त,चळवळी पासुन त्यांचे आज पर्यंत सर्वाशी वैचारीक नाते राहिले आहे.अतिशय गरीब हल्लाखीच्या परिस्थितीसी संघर्ष करून त्यांनी समाजा समोर एक आदर्श निर्माण केल आहे.
एका टांड्यात जल्माला आलेला हा खरा समाज सेवक मा.चव्हाण आपल्या जीवनात शाहू फुले आंबेडकर व बंजारा धर्मगुरू संत सेवालाल महाराज याच्या विचारांचे समाजात आज प्रचार करीत आहे.
मागासवर्गीय समाजाच्या उज्ज्वल विकासा करीता एक मात्र साधन आहे.ते विद्या,या अविद्येनी मागासवर्गीय समाजाची दुर्दशा केली आहे.त्यांनी विद्येला जवळ करून आपल्या कुटूंबा बरोबर गावातील बहुतेकाच्या मुलांना चांगल्या भावनेने सुशिक्षित केले  व त्यांना आपल्या पायावर उभे राहण्याचे अनमोल मंत्रच दिले आहे.मा.नथ्थुजी चव्हाण साहेबांचे पहिले पुस्तक”लेंगी नायक” हा पुस्तक समाजाच्या संस्कृतीला जपवनुक म्हणुन नविन पिढीला प्रेरणादायी ठरलेला.व दुसरा पुस्तक”लडी” या पुस्तकाच्या सहायांने त्यांने स्वताचे आत्मचरित्र लिहलेल आहे. त्याचे आत्मचरित्र म्हणजे एक पुरोगामी चळवळ आहे.हि चळवळ बंजारा युवकांनी खरोखर मनामध्ये घेऊन बंजारा साहित्यकार चव्हाण सरांच्या विचाराला स्वताच्या अंत करणा मधे स्वच्छ जागी साठवुन वाचन करून या आत्मचरित्रांने आपले
“लडीकार मा.नथ्थुजी चव्हाण”
यांच्या विचारांच्या अभावी सामाजिक चळवळीत सहभागी होऊन आपले जीवन उज्ज्वल करतील असे मला वाटते.
आमचे नाना साहेब(मा.चव्हाण) एक साधे सरळ व नम्र माणुस विचारांनी लेखक,कवि,पत्रकार,समाज सेवक,व कुशल शेतकरी, या सर्व भुमिका त्याच्या”लड़ी” या आत्मचरित्रातुन व्याक्त होतात.
माझ्या नानाजी नी असेच लिहीत रहावे व आम्हा विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी द्यावी.
हि संत सेवालाल चरणी प्रार्थना..
जय सेवालाल….
“शिका संघटीत व्हा व संघर्ष करा”
आपला सुभचिंतक..
आपल्या विचारातुन शिकलेला विद्यार्थी.

गोर कैलास डी.राठोड
सामाजिक कार्यकर्ता.

मु.पो.सावरगांव बंगला
ता.पुसद जि.यवतमाळ.
मो.9819973477

image

Gajanan D Rathod
Chief Editor – Banjara online news portal
www.goarbanjara.com
Mobile – 9619401377