संन्मानचिन्ह

माझा पहिला संमानचिन्ह माझ्या आई वडीलांना व सर्व परिवांना समर्पित..!!
गोर बंजारा संघर्ष समिती भारत, (संयुक्त)जय सेवालाल प्रतिष्ठाण मानपाडा यांच्या वतिने गोर बंजारा दवाळी मेरा या कार्यक्रमात जे मला संमानचिन्ह देऊन मला गौरविण्यात आल त्या बद्दल मि जय सेवालाल बंजारा प्रतिष्ठाण याच्या सर्व स्वयंसेवकाचे व पदाधिकाऱ्याचे खुप खुप आभारी आहे.
कारण जे काम करण्यासाठी मि पाउल उचलले आहे त्या कामामध्ये सर्व मिञ व माझा पूर्ण परिवार माझ्या पाठीसी आहे.माझा लहान बंधु गोर गजानंन डी.राठोड, माझी पत्नी सौ.योगिती राठोड, माझे मुल गोर अस्तीक,गोर विश्वजित राठोड,माझे काम म्हणजे गोर बंजारा संघर्ष समिती भारत, यांच्या संयुक्त पणे गोर बंजारा गरीब परिवारानां जुडो अन् जोडो अभियान व समाजाला खरा न्याय मिळुन देण्या साठी समाज जोडनी चे कामं चालु केलेली व वडिलाची स्वपन साकारत्मक विचारातुन मिळालेली चांगली प्रेरणा.या सर्व गोष्टी लक्षात घेऊ माझा लहान भाऊ गोर गजानंन डी.राठोड यांचा मि खुप आभारी आहे कारण तो माझ्या पाऊलावर पाऊन ठेऊन माझ्या( निस्वार्थी स्वयंसेवक म्हणुन आम्ही समाजाचे दुख सुख विचार असतो) कामाला हातभार लाऊन दोघे भाऊ सोबत जगण्याचे विचार करून सोबतीला राहणे हे आजच्या पिढिला शिकण्या सारखे आहे.कारण आजच्या पिढिमध्ये नाते काही काळापुरतेच दिसायला मिळतील.पण मिञहो रक्ताचे नाते व मैञीचे नाते हे दोन्ही खुप म्हत्वाचे असतात.ते कसे जपायचे ते आपल्यावर अवलंबुन आहे. कारण नाते हे मिञीचे नाते हैं जिवापाड प्रेम करणारे बाहेरची कामे अडलेली मिञ खुप जिव लाऊन करतात, मिञाला कामकरायची मिळालेली संधी कधी सोडनार नाही असे हे मिञ असतात म्हणुन जिवनात मैञीचे नाते पण खुप गरजेचे नाते आहे.रक्ताचे नाते दु:ख सुखात सहभागी होने वडिवोपार्जित संस्कार जपने व वडिलाचे विचार मनात घेऊन खांद्याला खांदा लाऊन कामे करने हे रक्ताच्या नात्याचें वैशिष्ट आहे.मिञ हो कुठले ही कामे करा.. त्या कामामध्ये ऐकात्मता,निष्टा असायला हवी..जर आपल्यात चांगले गुण असतीलतर कुठलीही व्यार्थ संगत तुम्हाला रोखु शकनार नाही.त्या साठी प्रत्येक वेळी मना मध्ये चांगले विचार करा..!! निस्वार्थाची कामे करा..!! त्या वेळेस समाजाला आपण शब्दरूपी दिलेली देणगी हिच आपली ताकत बनुन जगाच्या समोर येतं त्या वेळेस तुम्हची विचार सक्ती खुप पावरफुल बनते..!! विचार करा एकमेकाना सहकार्य करा.सामाजिक बाधिलकी जपा हेच ध्येय ठेउन समाज कार्यकरा..!!वरिष्टाशी निष्ठेने वागा,कनिष्ठाशी प्रेमाने वागा, हेच खरी संपत्ती आहे, १००० मिञ असल्याला म्हत्व नाही तर कुठला मिञा तुम्हास चांगला विचार देईल किंवा चागल्या विचारा असेल तोच खरा मिञ असतो..!!
जय सेवालाल..जय गोर..!!
हे लेख फक्त एक चांगल्या विचारतुन लिहलेल लेख आहे.चांगले विचार करूया समाजाला जोडुया..
जुडो अन् जोडो..
सौजन्य:- गोर कैलास डी. राठोड
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत,
संस्थापक/अध्यक्ष
जय सेवालाल बंजारा सेवा संस्था ठाणे महा.व
“याडीबाप वाचनालय”सावरगांव बंगला ता.पुसद जि.यवतमाळ..४४५२०९
मो.९८१९९७३४७७

image

Leave a Reply