संत सेवालाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन देवस्थान गागोदे येथे अवतरली गंगा

शेट्टी राठोड (पेण प्रतिनिधी)- पेण रागयड जिल्ह्यातील संत सेवालाल व माता जगदंबा देवस्थान हे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यापासुन 8 कि.मी. अंतरावर आहे. सदर ठिकाणी बरेच भाविक भक्त कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या ठिकाणाहुन दर्शनासाठी येत असतात. सदर ठिकाणी दर सालाबाद प्रमाणे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. श्रावणमासात देखील भाविकांची सदर ठिकाणी उपस्थिती असते. परंतु सदर ठिकाणी येणार्या भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी व प्रसाद बनविण्यासाठी लागणारा पाणी जवळ असलेल्या गागोदे गांव येथुन दोन किलीटर अंतर पार करुन आणावे लागत होते. तसेच सदर ठिकाणी आजुबाजूच्या परिसरात खाजगी तथा सरकारी खात्यामार्फत बोअर वेल मारण्यात आले तथापि पाणी लागले नाही.
त्यामुळे सदर मंदिर परिसरात देखील पाणी लागेल का नाही ही शंका होती. परंतु सदर ठिकाणी येणार्या भाविकासाठी पाण्याची व्यवस्था करणेकामी संत संत सेवालाल चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. ईशर राठोड व त्यांची टीम यांनी सदर जागेतपाणीपुरवठा होण्यासाठी तज्ञाची मदतीने सर्व्हेक्षण करुन संत सेवालाल देवस्थान परिसरात दि. 02- 02-2015 रोजी बोअरवेल त्रोत आधारीत पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले व बोअरवेल ला अगदी उन्हाळ्यात देखील पुरेल एवढे पुरेसा पाणी लागले. सदरचे काम हे मा.आमदार धैर्यशीलदादा पाटील यांनी दिलेल्या आमदार निधी अंतर्गत करण्यात येत आहे. मंदिर परिसरात बोअरवेल ला पाणी लागल्याने उपस्थितांनी आनंद व्यक्त करुन संत सेवालाल महाराजांची विधीवत पुजा केली. मा. धैर्यशीलदादा व सेवालाल ग्रुप पेण चे आभार मानले.
संत सेवालाल चॅरीटेबल ट्रस्ट चे श्री. बबन राठोड, शेट्टी राठोड, धारासिंग राठोड, प्रकाश राठोड अलिबाग, नामदेव पवार, निळकंठ चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, गोविंद चव्हाण, रमेश पवार व सर्व पेण ग्रुप च्या सहकार्याने आतापर्यंत मंदीरासाठीची जागा, विद्युत पुरवठा व आता पाणी व्यवसथेचे काम मार्गी लावले असुन पर्यटन विकास खात्याकडे देखील रक्कम रु. 60 लाखाचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर पाठविल्याची माहीती श्री. बबन राठोड, सचिव यांनी दिली या कामामुळे सर्व स्तरातुन पेण ग्रुप चे कौतुक होत असुन त्यांचे आदर्श घेवुन इतरांनी ही समाजउपयोगी कार्य तथा समाज सेवा करावी असे मा.प्रताप राठोड मंडळ अधिकारी पेण, व मा. राधेश्याम आडे, अध्यक्ष, कोंकण विभाग यांनी उपस्थातंना आवाहन केले. तसेच या कामासाठी आमदार निधीतुन संत सेवालाल देवस्थानास निधी देवुन देवस्थानास पाणीपुरवठा व्यवस्था केलेने मा.आमदार महोदयांचे तमाम रायगड जिल्हा बंजारा समाजाकडून संत सेवालाल महाराज जयंती उत्सव दि. 15 फेबुवारी रोजी जाहीर आभार व धन्यवाद मानन्यात येणार असल्याचे श्री शेट्टी राठोड, अध्यक्ष बंजारा समाज पेण यांनी सांगितले असून सदर उत्सवास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
http://banjara.mdrop.in/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d/

Leave a Reply