संत सेवालाल महाराज यांची 276 वी जयंती उत्साहात साजरी

अंबाजोबाई (प्रतिनिधी) :15 फेब्रुवारी 2015 रविवार रोजी क्रांतीकारी युगपुरुष संत सेवालाल महाराज यांची 276 वी जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून संत सेवालाल बॉलीवुड फिल्ममध्ये संत सेवालाल महाराजांच्या वडीलांची भूमिका केलेले म्हणजेच भिमानायकांची भूमिका केलेले कलाकार डॉ. गणपत राठोड हे उपस्थित होते व अध्यक्ष म्हणून बंजारा समाजाविषयी आस्था असलेले ज्येष्ठ बंजारा विचारवंत किशन बंजारा उपस्थित होते. सुरुवातीस संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस हार व पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते पाच बंजारा युवकांवर भोग संस्कार करण्यात आले. त्यांना भोग लावण्याची पद्धत कृतीतून शिकवण्यात आली. यानंतर सामुदायीक आरदास विनंती करुन जयंती पहिला भाग पूर्ण करण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. गणपत राठोड यांनी संत सेवालाल यांच्या जिवनावर विस्तृत असे मार्गदर्शन केले. त्यात संत सेवालाल महाराजांचा जन्म, जन्मासाठी केलेली भिमानायक व धर्मणीयाडीची तपस्या, बंजारा समाजात एकत्रिकरण, संत सेवालाल महाराजांचे बोल इत्यादी गोष्टी सांगीतल्या. यानंतर अध्यक्षीय समारोपामध्ये किशन बंजारा यांनी संत सेवालाल महाराजांच्या समोरील अडचणी व त्या अडचणीवर केलेली मात, स्वकीयांकडून घेतलेली सत्वपरीक्षा उदा. चिंगर्याची चिंगरी इत्यादी गोष्टी सांगीतल्या. या कार्यक्रमाचे आयोजन अंबाजोगाईचे युवा नेते पवन चव्हाण व देविदास पवार, राम चव्हाण अनिल राठोड यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निळकंठ पवार यांनी केले व देविदास पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या शेवटी संत सेवालाल महाराजांचा आवडता भोग प्रसाद गव्हाचा शिर्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अंबाजोगाई व परिसरातील शेषराव चव्हाण (सुरक्षा रक्षक), संतोष राठोड (कृषी सहाय्यक), दत्ता राठोड (कार्यालयीन अधिक्षक), आत्माराम चव्हाण (कार्यालयीन अधिक्षक), साहेबराव पवार, ऍड. प्रकाश राठोड, प्रा, सुनिल राठोड, डॉ. विश्वजीत पवार, पंडीत चव्हाण, हॉटेल पलक अंबाजोगाईचे राजेंद्र जाधव, शेषराव आडे (कार्यालयीन अधिक्षक), बी.एस. राठोड (अभियांत्रिकी सहाय्यक), सुधाकर चव्हाण (व्यापारी), बाबुराव राठोड (अभियंता), जाधव शाम (ए.एस.आय.), वि.टी. पवार (सेवानिवृत्त पी.एस.आय.), विष्णु राठोड (अभियंता), राजेभाऊ जाधव (मांडवा तांडा), आडे किशोर, आडे श्रीकृष्ण, पवार अविनाश सोनपेठ, राठोड विशाल सिरसाळा, पवार राहुल आडस, जगन्नाथ राठोड बाराभाई तांडा, प्रदिप पवार कौडगाव तांडा, राहुल पवार, सचिन पवार, राम पवार, राहुल चव्हाण, संतोष पवार, चव्हाण विश्वनाथ रामनगर तांडा, अर्जून पवार परसोबा तांडा, जाधव बी.एच. उस्मानाबाद, चव्हाण विक्रम, राठोड प्रल्हाद आदी व वसंतराव नाईक आश्रमशाळेतील सर्व बंजारा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. थोडक्यात या संत सेवालाल जयंतीत बंजारा समाजातील सर्व वृद्ध, तरुण व युवकांमधील एकजूट ही विशेष बाब पहावयास मिळाली याचे सर्व श्रेय आयोजकांना जाते. ईतर बंजारा बांधव यातून प्रेरणा नक्कीच घेतील.

Leave a Reply