संत सेवालाल महाराज यांचा जयंतीचा कार्यक्रम बंजारा समाज बांधवांनी मोठय़ा थाटामाटाने साजरा करावा – प्राचार्य टि.व्ही. राठोड

कारंजा (प्रतिनिधी) – 15 फेबुवारी संत सेवालाल महाराज यांचा जन्मदिवस बंजारा समाज बांधवानी त्यांचा जन्मदिवस मोठय़ा थाटामाटाने साजरा करव्यात यावा त्यासाठी साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजनक रण्यात यावे त्यामध्ये भजन, किर्तन व सेवालाल महाराजांच्या पोथीचे वाचन व प्रवचन करण्यात यावे. महाराजांच्या पालखीची मिरवणुक दररोज सकाळी मुख्य रस्त्यावरुन काढण्यात यावी. मिरवणुकीच्या स्वगातासाठी रस्त्याची साफ सफाई करुन दारासमोर रांगोळी काढुन तोरणे पताका लावण्यात यावे. मिरवणुकीत प्रत्येक बंजारा समाज बांधवांनी सहभागी होऊन डोक्यात पांढरी टोपी, शेला व पांढरा ड्रेस परिधान करुन हातात बापुंचा पांढरा ध्वज घेऊन नाचत गाजत बापूच्या नावाची जयजयकार करावा. संत सेवालाल महाराज जयंतीचा कार्यक्रम प्रत्येक तांडय़ात व शहरात साजरा करण्यात यावा. जयंतीनिमित्ताने बंजारा समाज बांधवाना सांगावयाचे आहे की, बंजारा समाज बांधव जेव्हा एकमेकांना भेटताता तेव्हा एकमेकांचे स्वागत जयसेवालाल म्हणुनT. V. Rathod करावे. आपल्या चाली रितीचे जतन करुन बोली भाषा लोप पावणार नाही याबाबत बंजारा समाज बांधवानी खबरदारी घ्यावी. आपले न्याय व हक्कासाठी कएजुटीने लढावे. घरी बसुन न्याय व हक्क मिळणार नाही त्यासाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. जी चळवळ उभारीत असेल त्यांना सहकार्य व हिंमत द्यावे. प्रत्येक तांडय़ात संत सेवालाल महाराजांचे मंदीर उभारावे. प्रत्येकाच्या घरात दर्शनी भागात संत सेवलाल महाराज व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेबांचे फोटो असावे. त्यांच्या जयंती व पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी साजरा करण्यात यावा. त्यामुळे समाज बांधवांना संत सेवालाल महाराजांच्या उपदेशाची माहिती होईल व त्यांच्या पासुन प्रेरणा घेवुन चांगले जीवण जगण्याची संधी निर्माण घेऊन एक आदर्श नागरिक निमाण होईल .

2 Comments
  1. Avatar
  2. Avatar

Leave a Reply