‘संत सेवालाल’ चित्रपटाचे भारतभर मोफत प्रक्षेपन

Sant Sevalal Movie

मुंबई (प्रतिनिधी) : सर्व बंजारा समाज बांधवांना कळविणयात येत आहे की, संपूर्ण विश्वात वसलेल्या बंजारा समाजाचे एकमेव आराध्य दैवत जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांचे सत्य ठरलेले अमृतवचन, त्यांची क्रांतिकारी महिमा तसेच भव्य रुपेरी पडद्यावर होणारे त्यांचे दिव्य दर्शन या सर्वांची प्रत्यक्ष अनुभूती करुन देण्यासाठी येणार्या 15 फेब्रुवारी 2015 रविवार रोजी त्यांच्या 276 व्या जयंती उत्सवानिमित्त भारत देशातील खाली दिलेल्या 15 घटक राज्यांमधील 276 सिनेमागृहांमध्ये सी.के. पवार निर्मित ‘संत सेवालाल’ या पहिल्या बंजारा बॉलिवूड चित्रपटाचे 276 मोफत शो दाखविण्याचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, ओरिसा. तरी समाजातील कार्यकत्यांनी आपल्या जवळील सिनेमागृहामध्ये चित्रपटाचा फ्री शो स्पॉन्सर करण्यास सहकार्य करावे असे चित्रपट निर्माता सी.के. पवार, वसई, मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. अधिक माहितीसाठी मो. 09158559128, 09323543522