संत श्री सेवालाल महाराज २८० वी जयंती उत्सव नियोजन बैठक संपन्न

चाळीसगांव :- दि.१५ फेब्रुवारी २०१९ रोजी सालाबादाप्रमाणे (वर्ष-४थे) संत श्री सेवालाल महाराज यांची २८० वी जयंती चाळीसगांव येथे साजरी करण्यात येणार असून पूर्वतयारी नियोजन बैठक पार पडली.

१५ फैब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वा. शासकीय विश्राम गृह, चाळीसगाव येथून पालखी मिरवणूकीस सुरुवात करण्यात येईल असे सर्वानुमाते ठरले आहे. तरी सर्व चाळीसगाव तालुक्यातील बंजारा बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन समिती तर्फे करण्यात आले आहे.

तसेच चाळीसगांव येथे झालेल्या बैठकीत डॉ.तुषार राठोड, रामदासभाऊ जाधव, सुभाषभाऊ चव्हाण, भावलाल राठोड सर, विजयभाऊ जाधव, नरेंद्र राठोड, डॉ.महेंद्रसिंग राठोड, adv.भारत चव्हाण, adv.वाडीलाल चव्हाण, संजय राठोड, अर्जुन पवार, सचिन राठोड, अशोक राठोड, गंगाराम राठोड, सुभाष राठोड, संदीप राठोड, योगेश्वर राठोड, राजू चव्हाण, भिमराव जाधव, नानु राठोड, विश्वजीत नायक, दादासाहेब चव्हाण, विलास जाधव, राहुल राठोड, शुभम राठोड इ. मान्यवर उपस्थित होते.

दि.-१५ फेब्रुवारी २०१९
वार – शुक्रवार
वेळ- सकाळी १०:०० वा.
ठिकाण – शासकीय विश्राम गृह,चाळीसगांव
संपर्क – ९५९५३६७६९१ , ७६२०१९२०१९