संत श्री सेवालाल महाराज २८० वी जयंती चाळीसगांव येथे साजरी

श्री. सतिष एस राठोड ✍

चाळीसगांव:- दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ रोजी चाळीसगांव तालुक्यात बंजारा समाजाचे क्रांतिकारी संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

  • दिनांक १४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफ चे ४४ जवान शहीद झाल्यामुळे जयंतीचे कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता शासकीय विश्रामगृह ते अग्रवाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट , घाट रोड पर्यंत शांततेत मिरवणूक काढण्यात आली.

  • जयंती व शहीद जावानांना श्रद्धांजली या दोघा गोष्टींचे समन्वय साधत कालच्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेता संपूर्ण कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने पार पाडण्यात आले.

  • मिरवणुकीनंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे औरंगाबाद येथील समाज प्रबोधनकार प्रा.श्री. हरिश्चंद्र राठोड सर यांच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी प्रबोधनपर व्याख्यान सादर केले. समाजाने अंधश्रद्धे पासून लांब राहून समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करावी हा संदेश देण्यात आला.

  • कार्यक्रमाच्या ठिकाणी तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.तुषार अप्पासाहेब राठोड यांनी केले.

  • कार्यक्रमाच्या ठिकाणी उत्तम राठोड (निवृत्त डीवायएसपी), रामदास जाधव,सुभाष चव्हाण, मच्छिन्द्र राठोड, अप्पासाहेब राठोड, डॉ.तुषार राठोड, देवेंद्र नायक, इंदल चव्हाण, चिंतामण चव्हाण, नामदेव जाधव, विष्णुकुमार जाधव, ओंकार जाधव, राकेश जाधव, नरेंद्र राठोड, दिनकर राठोड, सुभाष जाधव, हेमंत जाधव, संदीप राठोड, सुभाष राठोड,भीमराव जाधव, विशवजीत नायक, शुभम राठोड ,राहूल राठोड. तसेच नमोताई राठोड, मंगलताई चव्हाण, सुनीताई राठोड,व इतर महिला देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार साहेबराव चव्हाण सर यांनी केले.