श्री.संत सेवालाल महाराज जयंती निमित्त आंबिवली येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

श्री. सतिष एस राठोड ✍

  • कल्याण :- दि.२४ फेब्रुवारी-२०१९ रोजी संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती, मोहने-आंबिवली ता.कल्याण च्या वतीने श्री.संत सेवालाल महाराज यांच्या २८० ‘व्या जयंती महोत्सव निमित्त मोहने ता.कल्याण येथे भव्य बंजारा समाज मेळावा आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती, मोहने आंबिवली ता.कल्याणच्या वतीने करण्यात येत आहे.

  • ज्या समाजबांधवांना रक्तदान करावयाचे असेल त्यांनी तेजस्वी डायग्नोस्टिक सेंटर, बुद्ध विहार समोर, मोहने-आंबिवली (पूर्व). मा. कैलासभाऊ तंवर (सचिव) यांच्याशी 8286828642 या मोबाईल नंबरवर संपर्क करावा.
  • टिप:- रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आकर्षक प्रमाणपत्र कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते देण्यात येईल.
One Comment
  1. Avatar

Leave a Reply