श्री.पंजाब चव्हाण ( याडीकार) साहितकार व विस्तार आधिकारी पुसद यांनी लग्न पत्रिकेतुन दिला स्वच्छ भारत आभियानाचा बहुमोल संदेश

*गांवाचे जरी उत्तम नसलें।तरि देशाचे भविष्य ढासळले*
*ऎंसे मानावे जान त्याने भले।हृदया माजी।।”*
  संत तुकडोजी महाराजांनी रचिलेल्या ग्रामगीतेतील पहिल्याच अध्यायातीलही ५० वी ओवी. गाव चांगले असेल तरच देशाचे भविष्यही चांगले होते,  असा त्यांचा संदेश. गावच्या विकासा साठी संतानी आपापल्या परिने प्रयत्न केले.त्यातील च संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराजांचे योगदान महत्वाचे मानले जाते .

    श्रमातून भक्ती करा.गाव चांगले ठेवा .त्यामुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल, ही शिकवण त्यांनी युवकांना देण्याचा प्रयत्न केला. सदयस्थितीमध्ये ग्रामीण व शहरी भागात अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छते अभावी उदभावणाऱ्या रोगांमुळे पिडीत असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे ज्यांचे आरोग्य मान, पर्यायाने जीवन स्तर उंचावण्यासाठी शासनही प्रयत्नशील आहे . (उदा. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, स्वच्छ  भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना वगैरे) यामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय व सातत्यापूर्ण उत्स्फुर्त सहभाग कार्यक्रमात करुन घेण्याची प्रभावी तरतूद कार्यक्रम अंलमबाजवणी करण्यासाठी शासन ही प्रयत्नशील आहे.

   गाव हागनदरी मुक्तीचा संकल्प आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडवणिस.यांनी महाराष्ट्र राज्य 2019 पर्यंत हागनदारी मुक्तीचा संकल्प केला आहे.

सामाजिक व पर्यावरण सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेवून आपली आई,बहिणी, पत्नी, मुलगी यांनी उघड्यावर शौचासला न जाता ,घरी आपल्याकडेच शौचालय बांधण्याचा आग्रह करावा.

  सुखी संसाराच्या वाटेवर मुलांमुलींचे हे पहिले हे पहिले पाहुल या शुभ प्रसंगी सर्व पाहुणे त्यांनी  मंडळीला केलेली विनंती *आपले नातेवाईक उघड्यावर शौचास जानार नाही.याची दक्षता घ्यावी.सर्वांना शौचालय बांधून मा.पंतप्रधान व मा.मुख्यमंत्री यांचे स्वप्न पूर्ण करुया….*

 हा संदेश आपल्या मुलीच्या लग्न पत्रिकेतुन 1500 लोकापर्यंत पोहचवलेला आहे. आपण प्रतेकाने हा संदेश 100 व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा आग्रह केलेला आहे.

Panjab chavan


  *मा.पंजाब चव्हाण साहेब आम्ही आपल्या या उपक्रमाचे स्वागत करतो….*
  *चला तर स्वच्छ, सुंदर व निरोगी भारत घडवू या*

*सौजन्य*-कैलाश डी.राठोड

           प्रा.दिनेश एस.राठोड

*वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ*

प्रमुख प्रतिनीधी.

रविराज एस. पवार

8976305533

 www.GoarBanjara.com

Leave a Reply