शेतकरी (काळीज गोरगरीब शेतकर्‍याचं) कवि- भास्कर राठोड ठाणे

*शेतकरी*

(काळीज गोरगरीब शेतकर्‍याचं)

सत्ता आली
शहाणपण आले,
सांगता का सरकार
दिसले का तुमाले.

हमी गेलं आता
रब्बी भी गेले,
सत्तेचे लालची हमीभाव देतोच
आवकाळी आले.

कर्ज माफी मिळतेच
या आशेने तोंडात पाणी आले,
बघता बघता बँकच
लुटून नेले.

मुलं शाळेत जाते,
घेऊन कर्जाची कोरी पाटी,
वंचितच राहीले,
शासनाचे तिजोरीची होती उधळपट्टी.

पहिलेच नाही फिटले,
नवीन कोण देणार,
खाली झाली तिजोरी,
आता वसुली करणार.

नोट बंदीच्या नावाने
पहिलेच लुबाडले,
जनतेचा सेवक बोलूनी,
घोर आम्हा फसवले.

सत्ता परिवर्तनाच्या
नावाने, खोट्याचा बाजार,
भ्रष्टाचार मिटणार,
दिला हातात गाजर.

देवाच्या कृपेने सर्व
बरे होईल म्हणे,
सत्तेच्या नादात
काढताय एकमेकांचे उणे-दुणे.

आपसात लढवून
बनतोय धनी,
काळीज फाटलय
शिवून देईन का कोनी.

©
*भास्कर राठोड (भासू)*
*ठाणे /मुंबई*
*८१०८०२४३३२*

गजानन धावजी राठोड

प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव् न्यूज

9619401377

Leave a Reply