शुभम चव्हाण राज्यस्तरावर

2014-12-15_104448
पातूर (प्रतिनिधी) : क्रिडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रिडा संकुल वाशिम येथे दि. 15/11/2014 रोजी शालेय किकबॉक्सींग च्या विभागस्तरीय स्पर्धा पार पडल्या होत्या. विभागस्तरीय किकबॉक्सींग स्पर्धेत तुळसाबाई कावल विद्यालयाचा विद्यार्थी शुभम दशरथ चव्हाण रा. ईलखी जि. वाशिम याने अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत 17 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक पटकावीत राज्यस्तरावर झेप घेतली आहे. मागील वर्षी सुद्धा सदर विद्यार्थ्याने राज्यस्तरावर मेडल पटकाविले होते. शुभम चव्हाणची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. प्राचार्य विजयसिंह गहिलोत, संस्थेच्या सचिव सौ. स्नेहप्रभादेवी गहिलोत, सेन्साय श्री अरुण सारवान, संत झुजीबाई, श्री हिरासिंग नाईक, श्री हरी राठोड, श्री मदन राठोड, श्री वसंत राठोड, सरपंच श्री प्रकाश पाटील, श्री अशोक उपसरपंच, किरण चव्हाण (म.पो.) संतोष चव्हाण (म.पो.) मनोहर राठोड सर आदीचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply