शितल राठोड हिचे 10 वी परीक्षेत 97 टक्के गुण घेऊन यशसवी

नांदेड (प्रतिनिधी) – मार्च 2015 मध्ये झालेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत शितल हनमंत राठोड हिने 97 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळवले अहो. ती संत गाडगे महाराज हायस्कूल लोहा येथे शिक्षण घेतलेली आहे.2015-06-21_141100प्रचंड जिद्द व प्रयत्नाचा जोरावर तिने यश मिळविले आहे. भविष्यात आपण मेडीकलला प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले आहे. तिच्या यशाबद्दल वडील हनमंत नामदेव राठोड (मा.शि.) आई कुसू राठोड, रंगनाथ राठोड (शिक्षक), हनमंत राठोड (शिक्षक), सुधाकर राठोड (तलाठी), प्रकाश राठोड (शिक्षक), सुभाष राठोड (शिक्षक), प्रकाश राठोड (तलाठी), अरूष राठोड (शिल्पकार), बाबाराव राठोड, लक्ष्मण राठोड, सुरेश राठोड, सचिनकुमार राठोड, बळीराम राठोड, रविकुमार राठोड व साप्ताहिक बंजारा पुकार तर्फे अभिनंदन करण्यात आले.