“शस्त्र सामर्थ्येरो योद्धा हेमू भूकीया”

!! *वाते*

           *मुंगा*

                     *मोलारी* !!

…………………………………………

*शस्त्र सामर्थेरो योद्धा खेमू भुकिया*

************************

खेमू भुकिया नावाचा गोरं.!

महापराक्रमी योद्धा थोरं…!!

दाखविला तलवारीचा जोरं.!!!

याचं हिंदुस्थानात..!!१!!

तैसाचि लाखा बणजारा परमं.!

दाविले अचाट पराक्रमं…!!

गाजविले भारी रण संग्रामं…..!!!

देशभक्त थोरं…!!२!!

समतावादी संत सेवालालं..!

गोरं-कोरं यांची जोड़ली नाळं..!!

बहुजनाचा केला प्रतिपाळं….!!!

याचं देशातं…!!३!!

तरीही आम्हा गोरं बंजाराला..!

ऊचित न्याय नाही मिळाला…!!

कधी कळेल या शासनाला…!!!

पिड़ा गोर बंजारांची…!!४!!

पुर्वाश्रमिचे चोर गुन्हेगारं….!

विमुक्त घोषित करुनी केले ठारं..!!

अगतिकता वाढली बेसुमारं…!!!

या प्रतापी समाजाची..!!५!!

लदेणीच्या माधंयमातुन आधार दिला.!

दुष्काळातही हा देश पोशिला…!!

कुठ गेला तो आमचा इतिहास भला.?

का विसरता कळेना?.!!६!!

या समाजाचे दैन्य अपारं…!

लोकशाही असुनी मारामारं…!!

आयोग नेमुनी वारंवारं…!!!

फसविता आम्हाला..!!७!!

म्हणूनी म्हणती बापू भिमणीपुत्र.!

जागारे-जागा आतातरी गोर सुपुत्र….!!

अंगिकारा क्रांतिकारी लेखणीचे सुत्र!!!

ऊज्वल भविष्यासाठी..!!८!!

आठवा खेमू भुकियाचा प्रतापं..!

लाखा बणजारा सा-याचा बापं…!!

संत सेवालालाची कृपा अमापं…!!!

म्हणे भिमणीपुत्र..!!९!!

 सुरेश राठोड़  काटोल
सौजन्य:गोर कैलास डी राठोड 

गोर बंजारा ऑनलाइन न्यज पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य 

2 Comments
  1. Avatar
  2. Avatar

Leave a Reply