वसंत व्याख्यानमाला – वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारी संघटनेच्या वतीने

वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारी संघटनेच्या वतीने  रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या वसंत व्याख्यानमाला व गुणवंत विद्यार्थी, आधुनिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी , शासकीय सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी व पीएच.डी प्राप्त प्राध्यापक यांचा सत्कार सोहळा नुकताच अकोला येथे संघटनेचे अध्यक्ष अमर राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्री व समाजाचे नेते मा . ना .श्री संजयभाऊ राठोड , दैनिक सकाळ चे माजी आवृत्ती संपादक  श्री सुहास कुळकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.   यावेळी आपल्या उदघाटनपर भाषणात ना.संजय राठोड म्हणाले की, वसंतरावजी नाईक साहेब हे आपल्या राज्यात फार मोठे व्यक्तीमत्व होऊन गेले असून त्यांच्या महानतेवर माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याने  बोलणे म्हणजे एखाद्या लहानशा उपग्रहाने सूर्याचे कौतुक केल्यासारखे होईल, एवढे महान व कर्तबगार ते होऊन गेलेत. आज जो विकसित व प्रगत महाराष्ट्रात दिसतो आहे त्याचे संपूर्ण श्रेय नाईक साहेबांनाच आहेत व म्हणूनच आपण त्यांना महानायक म्हणतो असेही ते म्हणाले.                            याप्रसंगी त्यांनी संघटनेच्या व संघटनेचे अध्यक्ष अमर राठोड यांच्या कार्याचा गौरव करून समाजातील सर्वांनी अशा प्रामाणिक कार्य करणार्‍या संघटनेसोबत जुडावे अशी सादही उपस्थितांना घातली. आपली संघटणा समाजहिताचे उत्कृष्ट कार्य करीत असल्यामुळे मी सदैव आपल्यासोबत असल्याचे आश्वासक विचारही त्यांनी मांडले.         याप्रसंगी प्रमुख वक्ते, दैनिक सकाळ चे माजी आवृत्ती संपादक श्री सुहास कुळकर्णी यांनी नाईक साहेबांना थोर मानवतावादी ,शांततावादी व विकासाचे महामेरू संबोधीत नेतृत्व कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वसंतरावजी नाईक साहेब होते  ! या शब्दात महानायकाचा गौरव केला. याप्रसंगी ना.संजय भाऊ राठोड यांचे हस्ते महाराष्ट्रात संघटणेचे सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या बीड जिल्ह्य़ाचा व तालुक्यातून चाळीसगाव तालुक्याचा व संघटनेच्या अधिकाधिक प्रमाणात सभासद नोंदणी व संघटणेचे मुखपत्र साप्तहिक विमुक्त नायकाचे जास्तीत जास्त प्रसार करणार्‍या सर्व श्री रवि राठोड धारणी, राजकुमार जाधव अमरावती, सुखदेव राठोड चाळीसगाव,  प्रेम राठोड कन्हान,  उत्तम राठोड बीड, कुंदन शेरे नागपूर व सुरेश चव्हाण पातूर यांना संघटनेचे स्मृती चिन्ह,  प्रशस्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन ना. संजय भाऊंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.                                            याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री अमर राठोड यांनी महानायक वसंतरावजी नाईक साहेब हे महाराष्ट्राच्या वाट्याला निसर्गाने दिलेली फार मोठी देणगी होते व म्हणूनच या थोर नेत्याचे नवीन पिढीला कायम स्मरण राहावे म्हणून संघटनेने गत पाच वर्षापासून महानायकांचे जीवन व कार्यावर आधारित वसंत व्याख्यानमाला सुरू केली असून मोठमोठे वक्ते आपल्या समोर आणण्यात येत असून यापुढेही ही परंपरा कायम राखली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करतांनी त्यांनी भारतीय शिक्षण व  जागतिक पातळीवर शिक्षण याचा तुलनात्मक  आढावा मांडत विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांचा संघटनेचे स्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र, महानायक ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.                     महानायकांच्या प्रतिमेच्या पुजनाने व द्वीप प्रज्वलनाने या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विचारमंचावर संघटणेचे कोषाध्यक्ष डॉ अरविंद आडे, उपाध्यक्ष अधिक्षक अभियंता श्री रंगनाथ चव्हाण, मोहन जाधव,  बी.के. राठोड,   संघटनेचे सरचिटणीस प्राचार्य जे. डी. जाधव, संघटन सचिव डाॅ सुगनचंद राठोड, राजू चव्हाण ,जिल्हाअध्यक्ष शरद चव्हाण, डाॅ विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. जे.डी.जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. प्रा.रमेश राठोड. व डी.के. राठोड यांनी सूत्रसंचालन तर जिल्हा अध्यक्ष शरद चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. सदर काय॔क्रमाला संघटनेचे जिल्हा अध्यक्ष/सचिव/उपाध्यक्ष / कार्याध्यक्ष,  वाशीम, हिंगोली,बीड,   परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, अमरावती, नागपूर,  भंडारा, गोंदिया, यवतमाळ, बुलढाणा आदी जिल्हय़ातील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.                                               कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सहसचिव प्रा.विजय चव्हाण,  प्रेमदास राठोड,रामचरण राठोड व अकोला जिल्हा युनिटचे प्रा.रमेश राठोड, माणिक चव्हाण,  डी . के. राठोड, सुधाकर जाधव,संतोष राठोड,  शंकर चव्हाण, के . के. जाधव, उमेश चव्हाण, उमेश आडे, रणविर पवार, राजु आडे व अकोला युनिट च्या सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनीअथक परिश्रम घेतले. (विस्तृत वृत्त आगामी विमुक्त नायकमध्ये ).